Tuesday, May 15, 2012

कृतज्ञता कशी असते ? कशी असावी ?

कृतज्ञता कशी असते कशी असावी याबद्दल वाचनात आलेली एक कथा येथे नमूद करावीशी वाटते -
एका नदीच्या पवित्र तीरावर एक अंजिराची बाग होतीत्या बागेतील अंजिराचा ताजा मेवा खाण्यास हजारो पोपट येत व बागेतच राहात. या पोपटात एक पोपट फारच सुंदर होता. एका अंजिराच्या झाडावर तो सदैव असायचा. दरवर्षी या अंजिराची मधुर फळे खाईगंगेचे निर्मळ पाणी पिई व मोठया संतोषाने असे.
परंतु सर्वच दिवस सारखे नसतात. काही वर्षे गेल्यावर त्या वृक्षाचे सौंदर्य व सामर्थ्य नष्ट झाले. तो अंजीरवृक्ष वाळत चालला. त्या झाडास पाने फळे येतनाशी झाली. शेवटी राहता राहता सुकलेले शुष्क खोड मात्र राहिले. अंजिराच्या झाडात पुष्कळ ढोल्या होत्या व त्यातून भूस बाहेर पडत असे.
तो तांबडया चोचीचा सुंदर हिरव्या पंखाचा पोपट कोठे होतातो पोपट आपल्या जुन्या मित्रास चिकटून राहिला. ज्या झाडाने पूर्वी आपणास सुंदर अंजीर दिले त्या झाडाला त्याच्या शेवटच्या दिवसांत पोपटाने सोडले नाही. तो झाडाची वाळलेली साल व ढोलीतून गळणारा भुसाच खाई व गंगेत उतरून तृषा भागवी.
त्या पोपटाची निष्ठा देवाने पाहिली. एका हंसाचे रूप धारण करून भगवान ब्रह्मदेव त्या अंजीरबागेत आले. हंसरूपी ब्रह्मदेव पोपटास म्हणाले, ''शुका,जेथे सुंदर फळे वगैरे असतात तेथे पाखरे राहताततू वेडयासारखा या वाळलेल्या खुंटावरच का बसून राहतोस?''
पोपट म्हणाला, ''हे हंसाहा वृक्ष व मी दोघे बालपणापासून मित्र-मित्र आहो. हा वृक्ष अंगात शक्ती व सौंदर्य असेपर्यंत माझे पोषण करी - मला अंजीर देई. यावज्जीव ज्याने मजवर प्रेम केलेत्याला मी कसा सोडूमी कृतघ्न कसा होऊमी येथेच मरेन पण उडून अन्यत्र जाणार नाही.''
ब्रह्मदेवास आनंद झाला. त्याने आपले स्वरूप प्रगट केले व आपल्या कृपेने त्या वाळलेल्या झाडास पानेफुले आणलीण तो वृक्ष सुंदर दिसू लागला. मरेपर्यंत तो पोपट त्याच झाडावर राहिला.
सारांशपशुपक्षीसुध्दा कृतज्ञता व प्रेम दाखवतात मग विचारशील मनुष्याने किती थोरपणाने वागले पाहिजे बरे?

Friday, April 27, 2012

Punha Hasa

१. चिनी कुत्र्याचे नाव काय ?
हे हुंग ते हुंग
२. भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल?
हिंदुस्तान लिव्हर
३. नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
४. रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
उभा का बस की
५. हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
६. अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
वर्षा अ खेर
७. हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
ओला होईल
८. ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली
९. त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली
१०. लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली
११. जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात
ती वेळ कुठली असते ?
घड्याळ दुरुस्त करण्याची
१२. 2 चिमण्या असतात
.
.
.
.
.
.
.
.
त्यातली एक म्हणते "चिऊ"
.
.
.
.
.
.
.
दुसरी काहीच म्हणत नाही!
.
.
.
.
.
.
का?
.
.
.
.
.
.
कारण दुसरी चिमणी Factory ची असते.
१३. एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????
कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहेना....

Thursday, March 29, 2012

माझ्यासोबत काम करणारी एक मुलगी सॉरी,कलिग

परवाचीच गोष्ट. माझ्यासोबत काम करणारी एक मुलगी (सॉरी, ऑफिसातली कलिग म्हणायला हवं. नाहीतर ह्यांच्या स्टेटसला आणि डिग्निटीला धक्का पोचतो) जेवायला बसताना हातात कसलातरी पांढऱ्या रंगाचा पुडा घेऊन आली. मी तिला सहज विचारलं, "काय गं, हा पुडा कसला?" त्यावर ती म्हणाली, "Hey, these are tissues, paper napkins!" "इतके? कँटिनमधल्या सगळ्या लोकांचे हात पुसणार आहेस की काय?", मी.

"Hmpfh..." - एक लाडिक अन् रागीट कटाक्ष - "I don't like to keep my hands oily all the while... आमच्या मेडला कित्तीदा सांगून ठेवलंय, don't use so much oil. पण तिला कळतच नाही! She just doesn't understand, you see?"
मी मनात म्हटलं, "बिच्चारी मेड, आता ही बया इंग्लिशमधून बोलल्यावर त्या बिचारीला काय कळणार? डोंबल!" पण हे माझ्या 'कलिग'ला सांगून काही फायदा नव्हता. कारण तिला मग बया म्हणजे कोण आणि डोंबल म्हणजे काय ते सांगावं लागलं असतं.
पुन्हा गंमत अशी की तिने काही सगळे 'पेपर नॅपकिन्स' वापरले नाहीतच. (खरंतर थोड्याशा चिडक्या आणि औपरोधिक सुरात) मी तिला उरलेल्या कागदांचं काय करणार असं विचारल्यावर म्हणते, "पँट्रीबॉय पिक करून डस्बिन मध्ये थ्रो करेल... डोंट वरी..."
काही दिवसांनी तिचा 'फास्ट' होता. मला म्हणाली, "ममाने 16 सोमवार्स करायला सांगितले आहेत. आज थर्ड आहे. माझ्यासोबत मॅक्डीमध्ये चल ना!" मी चमकलो. म्हटलं की ही 'मॅक्डी'मध्ये जाऊन काय करणार? त्यात मी डबा आणला होता.
"मॅक्डीमध्ये घरून आणलेलं काही खाता येतं का?"
"Yucks! So fool of you! इतके दिवस IT मध्ये असून तू इतका कसा रे बॅकवर्ड? Do you think McD's is a place like that? जाऊ दे. बकअप, मी खूप हंग्री आहे. Rats are running in my stomach like mad!!!"
"पण माझ्या डब्याचं काय करायचं?"
"तुझा टिफिन जाऊ दे बॅगमध्ये... वीऽल सी दॅट लेऽटर. मी तुझा लंच स्पॉन्सर करते."
तरी मी डबा घेऊनच निघालो. म्हटलं जाता जाता माय्क्रोवेववर गरम करूयात. संध्याकाळपर्यंत टिकेल. म्हणजे रात्रीच्या जेवणाचा प्रश्न मिटला.
तिचा 'फास्ट' असल्यामुळे तिने फ्रेंच फ्राइज़ (ह्याला मराठीत बटाट्याचे काप म्हणतात!) घेतले आणि मला बरीच भूक असल्यामुळे मी शाही फ्रँकी (ही म्हणजे आपली गुंडाळी पोळी... फक्त, मैद्याची) घेतली. मग तिकडच्या वेटरने अत्यंत अदबीने सॉस आणून दिला. इतकी अदब पाहून मला एकदम गुदमरल्यासारखं झालं. (आम्हाला आपली 'हाटेला'तल्या फडका मारणाऱ्या पोऱ्याची सवय. असे ब्रँडेड टी-शर्ट आणि स्वच्छ टोपी घालून चकचकीत ट्रेमध्ये काही 'पेपर नॅपकिन्स' आणि सॉस देणारी माणसे पाहिली की मला मी स्वतः इतका गबाळा वाटतो की विचारू नका.) माझी ती फ्रँकी खाऊन होत आली होती. ती आपली एकेक फ्रेंच फ्राय इतक्या नाजूकपणे तोंडात टाकत होती की तो हात तितक्याच नाजूकपणे आपल्या हातात यावा असं क्षणभर मला वाटून गेलं. पण तेवढ्यात आपण कोण आहोत, आपली ऐपत काय ह्याची जाणीव होताच, तिने एखाद्या झुरळाला जितक्या तत्परतेने झटकून द्यावे तितक्याच तत्परतेने मी तो मोहक विचार माझ्या मनातून झटकून टाकला...
मी तिला सहज म्हटलं, "ह्या शाही फ्रँकीचा ऐवज तसा बराच असूनही माझी भूक काही भागली नाही. आणि तुझं ह्या ४०-४५ फ्रेंच फ्राइज़ वर कसं निभावणार?"
"What is ऐवज?"
"ऐवज म्हणजे..." - मला पण प्रश्न पडला की 'ऐवज' ह्या शब्दाचं हिला कळेल असं काय भाषांतर करता येईल? - "ऐवज म्हणजे क्वांटिटी... ही शाही फ्रँकी तशी भरपूर होती तरी मला अजून थोडी भूक आहे आणि तुझं एवढ्याशा फ्रेंच फ्राइज़वर आवरलं?"
"Hey, it's more than enough... and man, today is my fast... ते काय आज्जीबाईसारखं स्वीटपटेटो वगैरे खात बसू काय? So many calories it gives!"
मला वाटलं की ह्या अशा कलरफुल मुलीने थोडंसं कॅलरीफुल खायला काय हरकत आहे. अंगापिंडाने थोडी तरी भरेल... (डोक्याने कधीही भरणार नाही याची खात्री आहे.)
जरा वेळाने आम्ही परत हापिसात जायला निघालो. सहज म्हणून तिला बिल विचारलं, "Why do you care? मी दिलेत ना!"
"अगं, तसं नाही. परत मी कधी एकटा किंवा दुसऱ्या कोणासोबत आलो जेव्हा मला बिल द्यायचं असेल तर साधारण अंदाज पाहिजे ना!"
"बरं! तुझी शाही फ्रँकी होती 105 ची आणि फ्रेंच फ्राइज़ होते 35 चे..."
माझी तर छातीच दडपली. १०५ रुपयांत एक गुंडाळी पोळी? आणि बटाट्याचे ४५ काप ३५ रुपयांचे? ह्या पोरीला आपण मस्तपैकी पेणचे पोह्याचे, बटाट्याचे आणि नाचणीचे पापड खायला घालूयात आणि विचारुयात की हे पापड बरे की तुझे फ्रेंच फ्राइज़? पण आपलं अशा (फ्रेंच फ्राइज़ वगैरे) बाबतीतलं मागासलेपण तिला दिसू नये म्हणून मी गप्प बसलो.
ऑफिसात आल्यावर विचार करत होतो, माणसाच्या हाती पैसा आला की सगळ्या जुन्या आणि तथाकथित 'मागास' गोष्टींशी त्याची नाळ तुटते का? पण झटक्यात एक गोष्ट लक्षात आली... अरे! मी पण ह्याच मुलीच्या ऑफिसमध्ये हिच्याच एवढा पगार घेतोय. आणि माझी तरी नाळ मी अजून शाबूत ठेवली आहे...

This work is licensed under a Creative Commons license.

Sunday, December 25, 2011

प्रोग्रामर्स साठी मराठी म्हणी - Programmers sathi MHANI

१) एक ना code, भाराभर bugs
२) Code चांगला वाटला, म्हणून copy-paste करू नये
३) मरावे परी bugs रूपी उरावे
४) आपलाच code आणि आपलेच bugs
५) आपला तो program, दुसऱ्याचं ते copy-paste
६) इकडे code तिकडे release
७) Project आला होता, पण deadline आली नव्हती
८) Engineer ची खोड lay-off शिवाय जात नाही
९) अतीशहाणा त्याचा code रिकामा
१०) Logic थोडे "printfs" फार
११) Developer मागतो ’A’ rating, Manager देतो ’D’
१२) Code कळला तरी bugs मिळत नाहीत
१३) Bonus नको पण workload आवर
१४) स्वतः coding केल्याशिवाय output दिसत नाही
१५) दुसऱ्याच्या कोडातल्या warnings दिसतात, पण स्वतःच्या कोडातले errors दिसत नाहीत
१६) दिसतं तस नसतं म्हणूनच client फसतं
१७) जो Google वरती विसंबला, त्याची deadline बुडाली
१८) कुठे manager ची Honda-city आणि कुठे programmer ची activa
१९) इकडे keyboard तिकडे mouse
२०) Promotion ही गेलं, increment ही गेलं, हाती आली pink-slip
२१) Developer जातो जिवानिशी, manager म्हणतो आळशी
२२) Release सरो, client मरो
२३) Developer मेला workload ने आणि manager मेला tracking ने
२४) अडला manager, client चे पाय धरी
२५) Developer ने डोळे मिटून code ढापला, म्हणून manager ला कळायचं राहत नाही
२६) Code सलामत तो outputs पचास
२७) Release गेला आणि bug-fix केला
२८) Manager चा feedback, वाकडा ते वाकडाच
२९) Manager पुढे दिली PPT, आणि कालची meeting बरी होती
३०) Job सलामत, तो increments पचास
३१) Fresher च्या program ला printf पासून तयारी
३२) Deadline पाहून coding करावे
३३) उतावळा client, on-site posting
३४) उचलला phone आणि लावला कानाला
३५) बुडत्याला Google चा आधार
३६) ज्याचा लिहावा code, तो म्हणतो माझंच credit
३७) आलीया deadline, लिहावा program
३८) हपापाचा code गपापा
३९) मूर्ख manager पेक्षा शहाणा client बरा
४०) झाकला code सव्वाशे lines चा
४१) चार line चा code आणि बारा line च्या comments
४२) ज्याच्या हाती code, तोच programmer
४३) चार दिवस manager चे, चार दिवस developer चे
४४) कोडात नाही तर output कुठून येणार
४५) ऑफिसात राहून HR शी वैर करू नये
४६) ऐकावे manager चे, करावे client चे
४७) आयजीच्या code वर बायजी हुशार
४८) आधीच increment, त्यात profit sharing
४९) Results झाकले म्हणून deadline यायची राहत नाही.
५०) Reports मोठे, results खोटे
५१) programmer सोडून reviewer ला सुळी
५२) programmer च्या शापाने HR मरत नाही.
५३) manager चा cubicle असावा शेजारी
५४) intern ची धाव Google पर्यंत
५५) HR तारी त्याला कोण मारी
५६) हा code आणि हा client
५७) Google वाचून error गेला
५८) Google वरचा code, चालला तर चालला, नाहीतर delete केला
५९) Error नाही त्याला डर कशाला?
६०) Developer च्या मनात lay-off
६१) Coding येईना hard-disk तोकडी
६२) Code आहे तर compiler नाही, compiler आहे तर code नाही
६३) हातच्या printout ला laptop कशाला
६४) Client ला manager साक्ष
६५) Bug रामेश्वरी अन fix सोमेश्वरी
६६) लहान तोंडी मोठा seminar
६७) Review चा code आणि release चा code वेगळा असतो
६८) Project गेला आणि report राहिला
६९) आपलेच bugs आणि आपलेच fixes
७०) कठीण code येता Google कामास येतो.
७१) एक project बारा भानगडी.
७२) code थोडी अऩ सोंग फार.
७३) काखेत कळसा आणि Google ला वळसा

Thursday, December 22, 2011

आणखी हसा ! मराठी Whats App Jokes !!!

हवालदार दारुड्याला : अरे ए कुठे चाललास असा रात्रीचा ? दारुडा : मी भाषणाला चाललोय. हवालदार : भाषणाला ? कुठे ? दारुडा : दारुचे वाईट परिणाम या विषयावर भाषण ऎकायला. हवालदार : तुला रात्री बारा वाजता कोण भाषण ऎकवणार ? दारूडा : मी घरी पोचल्यावर माझी बायको
///////////////////////---------------------//////////////////////////////////////////////
सायबर म्हणी
१) रिकाम्या मॉनिटरला स्क्रीनसेव्हर फार !!!!!
२) आपलाच किबोर्ड नि आपलाच माऊस !!!!!
३) सेलेरॉन गेले पेंटीयम आले !!!!!
४) विंडोज दाखव नाहीतर इंस्टॉलेशन कर !!!!!
५) उचलला पॉईंटर अन् लावला आयकॉनला !!!!!
६) मॉनिटर आणि सी.पी.यू. यांच्यात चार बोटांचे अंतर असते !!!!!
७) माऊसला मॉनिटर साक्ष !!!!!
८) फोर-एट-सिक्सच्या कळपात सेलेरॉन शहाणा !!!!!
९) लॅपटॉपचे बिर्‍हाड पाठीवर !!!!!
१०) आपला तो "पीसी" दुसर्‍याचं ते "मशीन" !!!!!
११) व्हायरसच्या मनात एंटीव्हायरस !!!!!
१२) स्त्रीचं वय,पुरुषाचा पगार अन् कॉम्प्युटरचा स्पीड विचारू नयेत !!!!!
१३) बडा सी.पी.यू. पोकळ डेटा !!!!!
१४) अडला कॉम्प्युटर यु.पी.एस चे पाय धरी !!!!!
१५) मनी वसे ते मॉनिटरवर दिसे !!!!!
१६) नावडतीचा पी.सी.स्लो !!!!!
१७) हार्डडिस्क सलामत तो सॉफ्टवेअर पन्नास !!!!!
१८) चार दिवस हार्डडिस्कचे चार दिवस सी.डी.चे !!!!!
१९) (नेट्वर्किंगमध्ये) सेलेरॉनशेजारी पेंटीयम बांधला, स्पीड नाही पण व्हायरस वाढला !!!!!
२०) सीडींचा बाजार, व्हायरसांचा सुकाळ !!!!!
२१) वरून पेंटीयम आतून फोर-एट-सिक्स !!!!!
२२) हार्डडिस्कमध्ये नाही ते फ्लॉपीत कोठून येणार !!!!!
२३) घरोघरी मायक्रोसॉफ्टच्याच विंडो !!!!!
२४) सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर !!!!!
२५) हा मदरबोर्ड नि हा प्रोसेसर !!!!!
२६) मंदाळ डॉट-मॅट्रिक्सला खडखडाट फार !!!!!
२७) यथा ऑपरेटर तथा कॉम्प्युटर !!!!!
 
///////////////////////---------------------//////////////////////////////////////////////
मुलगी : अगं आई, गावात Bollywood वाले आलेत.
आई : नको घरात ये. ते वाईट असतात.
मुलगी : अगं, हिरो इमरान हश्मी आहे.
आई : अरे देवा !! मग आजीला पण घरात घे !!
///////////////////////---------------------//////////////////////////////////////////////
चिंगीचा बाप : काय जावई बापू , तुम्हाला हे शोभते का ?
६ वर्षात ६ पोरे म्हणजे लय नाय का...
बंड्या : तुम्हाला मी आधीच सांगितले होते,
... गरीब असलो तरी तुमच्या पोरीला खाली पेट ठेवणार नाय म्हणून
///////////////////////---------------------//////////////////////////////////////////////
गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?
बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..
गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ?
बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."
///////////////////////---------------------//////////////////////////////////////////////
सिगारेट म्हणजे : चैतन्य धूप ज्याने
शरीरूपी मंदिरातील आत्मरूपी परमेश्वराची पूजा केली जाते .
आणि कॅन्सर रूपी प्रसादाचा लाभ देवून जाते
आणि अश्या पूजेने आत्मा लवकरच परमात्म्याला मिळतो.
///////////////////////---------------------//////////////////////////////////////////////
आजपासून बंद..!!
एकदम बंद...!!
.
आज मला कळालेय
.
.
सरदारजी शहाणा असतो
म्हणून बंद
.
सरदारजी वर विनोद एकदम बंद..!
///////////////////////---------------------//////////////////////////////////////////////
"ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार....!"
1) "बघतोस काय ? मुजरा कर .....!"
2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
3) "बघ माझी आठवण येते का ?"
4) ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''
5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
6) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
7) तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
8) 'अहो, इकडे पण बघा ना...'
9) "हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".
10) थांब लक्षुमी कुंकू लावते!
11) तुमचे लक्ष आमच्याकडे का?
12) "लायनीत घे ना भौ"
13) चिटके तो फटके!
14) राजे तुम्हि पुन्हा जन्माला या
15) अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
16) १३ १३ १३ सुरूर !
17) "नाद खुळा"
18) "हाय हे असं हाय बग"
19) आई तुझा आशिर्वाद.
20) "सासरेबुवांची कृपा "
21) "आबा कावत्यात!"
22) पाहा पन प्रेमाणे
23) नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.
24) "हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"
25) अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.
26) हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...
27) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..
28) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.
29) गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
30) हेही दिवस जातील
31) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा
32) घर कब आओगे?
33) १ १३ ६ रा
34) सायकल सोडून बोला
35) हॉर्न . ओके. प्लीज
36) "भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"
37) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)
38) तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं
39) माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा

40) बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये--
सुसाईड मशिन
मिसगाईडेड मिसाईल
मॉम सेज नो गल्स
41) एका ट्रक च्या मागे लिहले होते:
राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
42) एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल"
खाली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
43) अजस्त्र डंपरच्या पाठीमागे
उगीच हॉर्न वाजवू नये, तुला चिरडायला एक सेकंद पुरेल
44) एका टेम्पोच्या मागे..
आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद...!
///////////////////////---------------------//////////////////////////////////////////////
दोन प्रेमी एकाच प्लेट मध्ये शेवपुरी खात होते....
एकमेकांच्या डोळ्यात पाहत मुलगी लाजून म्हणाली "असा काय पहातोयस रे?"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा- " थोड थोड खा ना भिकारे
10:47 AM सदाशिव पेठ, पुणे
बेल वाजली
'मावशी, सुनील आहे का?'
...
'हो, आहे ना. आत्ताच घरी आलाय, गरम गरम
उपमा खातोय. तुला पण भूक लागली असेल ना?'
'हो ना'
.
.
'मग घरी जाऊन काही तरी खाऊन का येत नाहीस? :P :P :
///////////////////////---------------------//////////////////////////////////////////////
व्हॅक्युम क्लिनर सेल्समनचा जॉब लागल्यापासून संता उत्साहात होता,
भिमाकाकुंच्या घरात शिरला आणि ती काही बोलण्याच्या आतच खिशातुन एक पिशवी
काढुन त्यातले शेण जमिनीवर टाकल आणि म्हणाला : मॅडम ह्या व्हॅक्युम
क्लिनरने हे जमिनीवरचे शेण ५ मिनीटात साफ होईल नाही तर मी स्वत: ते खाऊन
टाकेन.
भिमाकाकुं (उत्साहात) : तु ते शेण पावाबरोबर खाणार की चपातीबरोबर?
संता (दचकून) : का ?
भिमाकाकुं : कारण आता लाईट गेले आहेत...
 
///////////////////////---------------------//////////////////////////////////////////////