Wednesday, February 15, 2017

फक्त विनोद - Only Jokes



पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो

"कळावे"

पण याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही.

खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा

१) प्रिय,

तू ज्या रस्त्याने जात आहेस

तो खूप डेंजर आहे.

वळावे........😉

२) मित्रा,

तुझ्या प्रेयसीचा भाऊ

तुला फटकवायला येत आहे.

पळावे..........😉

३) प्रिय,

तुझ्या आवडीच्या भजीसाठी

अडीच किलो कांदे पाठवित आहे.

तळावे..........😉

४) प्रिय मित्रा,

मी फोर व्हीलर घेतली

जळावे........😉

५) प्रिय,

तुझ्या आवडीचा स्पेशल

गायछाप तंबाखू पाठवित आहे.

मळावे...........😉

६) प्रिय आई,

तुला नको असलेली पोरगी घरात सून म्हणून आणणार आहे.

छळावे..........😉

७) मित्रांनो,

इतक्या उदाहरणानंतर तरी माझा मुद्दा बरोबर आहे हे तुम्हाला

कळावे..........😉

आणि तुम्ही हसुन हसून

लोळावे......😉

मेसेज आवडला तर दुसऱ्या नंबर वर

वळवावे......

रिपीट झाला असेल तर

वगळावे......😉


😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



चावी विसरल्याने मी बायकोबरोबर बाहेर मुलांची वाट पहात बराच वेळ उभा होतो. 

.

.

.

.

शेजारच्या घरातून मस्त चहाचा वास आला.....😉

.

.

.

.

मी हिला म्हणालो...  "तुझे....गुढघे दुखत असतील नाही ?"😉

.

.

.

.

.

.

.

.

.

शेजारच्या घराला आतुन कडी लावल्याचा आवाज आला !!!😉

.

.

.

.

.

स्थळ : अर्थातच पुणे ..

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

😉

हा मॅसेज वाचा गालातल्या गालात हसा 😉😉😉😉

Dedicated to married friends

टी व्ही समोर बसून

उगाच चँनेल चाळत होतो...

बायकोने विचारले-

टी व्ही वर काय आहे ?

मी म्हणालो भरपूर धूळ!

.........आणि भांडण जोरात सुरु झालं !

😉😉😉😉😉😉😉😉

लग्नाच्या वाढदिवशी

गिफ्ट काय हवं ?

विचारलं तेव्हां म्हणाली-

"असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत

तीन सेकंदात पळेल!"

मी वजन काटा दिला!

......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
😉😉

रविवारी फिरायला जाऊया का ? विचारलं...

"मला महागड्या जागी घेऊन चला" म्हणाली

मी तिला पेट्रोलपंपावर नेलं !

......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
😉😉

आरशात प्रतिबिंब पाहून

काळजीत पडून म्हणाली-

"काय मी भयंकर दिसतेय... ?

तुमचं मत काय आहे ? "

मी म्हणालो "तुझा चष्म्याचा नंबर.. परफेक्ट आहे..."

......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
😉😉

मी विचारलं -

"वाढदिवसाला कुठे जाऊ या ?"

ती म्हणाली "जेथे खूप दिवसात मी गेलेले नाही !"

मी तिला स्वयंपाक घरात नेलं!

......... आणि भांडण जोरात सुरु झालं..

😉😉
😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

आजचा सुविचार

आपली पत्नी ही आपली अर्धांगिनी असते.

तिला आपली अर्धीच माहीती द्या !!

अनेक त्रास कमी होतील

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

प्रश्न :- "नारी" म्हणजे काय?

उत्तर :- "शक्ती".

प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?

उत्तर :- "सहनशक्ती"..!!

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?

उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते.

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?

उत्तर :- फायर ब्रिगेड.

प्रश्न :- का बरं?

उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं. आग विझवण्याचं नाहि  

सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले

यावरून काय बोध घ्यायचा?……

.

यम आणि मृत्य देखील

तुम्हाला तुमच्या बायकोपासून

वाचवू शकत नाही…

तेव्हां शांत रहा, बायकोवर प्रेम करा

कारण …

… दुसरा उपाय नाही…म्हणुन हा मॅसेज वाचा गालातल्या गालात हसा

 😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

मुलगी फेसबुक वर स्टेटस टाकते.

"हॅलो फ्रेन्ड्स,  मी मावशी झाले"

बंड्याने खाली कॉमेंट टाकली.

"कोणत्या हाॅस्पिटलला??किती पगार आहे?"

"Blocked"

बंड्याचा प्रामाणिक प्रश्न.. माझं काय चुकलं??!

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

काल उसाच्या गाड्यावर रस पिताना

Heart-Attack ने मरता-मरता वाचलो

.

.

जेव्हा एक पोरगी इम्प्रेशन मारण्यासाठी इंग्रजी मध्ये बोलली

.

.

प्लिज गिव मि बारिक मिठ..

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

बंड्या बदाम विकत असतो..

एका कस्टमर ने विचारलं बदाम खाल्ल्याने काय होतं ??

बंड्या - डोकं चालतं

कस्टमर - कसं ?

बंड्या - एक सांग १ किलो तांदळात किती तांदुळ असतात ?

कस्टमर - माहीत नाही ..

बंड्या - हे घे बदाम खा,, आणि आता सांग १ डझन केळात किती केळं असतात ??

कस्टमर - १२

बंड्या - बघितलं का,चाललं ना डोकं ..!

कस्टमर - २ किलो दे यार,लय भारी चीज आहे
सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज ओरडून म्हणाले. .

अगं या उटण्याचा उग्र वास येतोय...
पत्नी:-अरे देवा..देवा...देवा....काय बाई तुमचा हा वेंधळेपणा....मी काल दोन  पुड़्या आणल्या होत्या....

एक  उटण्याची व दुसरी  हिंगाची ..तुम्हाला अंघोळीसाठी  उटण्याची  पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही  हिंगाची  पुड़ी उचलली....अन फासली सगळ्या  अंगाला. ..

काय म्हणावं बाई तुमच्या  वेंधळेपणाला..अरे देवा...कसं होईल या संसाराचं. .? काय  म्हणावं या वेंधळ्या  माणसाला. ...!!!!

पती - अग अग...तो  हिंगाचा उग्र वास मी सोसतोय....

तू कशाला एवढं टेंशन घेतेस?

पत्नी- अहो, तुमच्या त्या उग्र  वासाचं  जाऊ द्या हो.....

इथं माझी भाजी उटण्याने बिघडली त्याचं काय?..

*तात्पर्य....बायका  स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात..*

बिच्चारा हिंगाळलेला नवरा...



😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



रण्या : (बायकोला) आज टिफिन मधे काय भरलस....???

बायको : फार्म फ्रेश चिली रेड टोमेटोस विथ इंडियन पील्ड मीडियम कट पोटैटोज़ विथ फ्राय  ऑईल राईस

रण्या ः वाउ   काहितरी

नविन डिश दिसतेय 

ऑफिसला जाऊन बघितलं तर

फोडणीचा भात होता😉😉

घ्या,अजुन करा शिकलेली मुलगी

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

Punekar rocks

पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो.

लेखक:

कसे वाटले? नाटकात काही बदल आवश्यक आहेत ?

जोशी काका :

नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते त्या ऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.

लेखक : का ?

जोशी काका :

म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

:एक बाई देवाला विचारते

देवा स्रियांना मंदिरात प्रवेश का नाही देत?

तर देव उत्तर देतो

तुम्हाला एक देव दिलेला आहे

" नवरदेव "

काय त्रास द्यायचा तो त्यालाच द्या मला त्रास देवू नका

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

नवरा बायको रस्त्याने चालले होते.✌

समोरुन गाढव येत होते.

बायको(हसून)😉: आहो तुमचे पाहुणेे आलेत नमस्कार करा की.

नवराः नमस्कार सासरेबुवा.

      😉
बायको कोमात नवरा जोमात

           नादच खुळा...!

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

गण्या : काय रे तुझे आणि वहिणी चे भांडण मिटले का???

मन्या : हो..गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे..

गण्या : हो का.?

मग काय म्हणाल्या रे वहिणी...!

मन्या : कॉट च्या खाली लपु नका, या बाहेर....

मारणार नाही मी

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

बंडयाच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतात.

सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका प्राण्याचे,

नुसतेच पाय दाखवून बंडयाला तो प्राणी ओळखायला सांगतात.

बंडया: काय ओळखू येत नाय.

इन्स्पेक्टर: मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं?

बंडया: माझे पाय बघा आणि तुमीच सांगा.

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

पोट धरून हसा..

दत्तुचि आई :  वीस वर्ष मला            

           काहीच मुलबाळ नव्हतं .

गन्याची आई : अगं बाई गं !

           मग काय केल हो तुम्ही ?

दत्तुचि आई : काही नाही !

          मग मी २१ वर्षाची झाले ,

         बाबांनी माझं लग्न लावून दिलं आणि वर्षभरात दत्तू झाला !!!

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

नदी किनारी जोडपे बसलेलेे असते

प्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे

प्रियकर : तोच ग ....

२५पैसा १ मिनीट

प्रेयसी : मर मेल्या मोबाईल मधेच

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉


पर्श्या ने कधीच गुटखा नाही खाल्ला...

.

.

तरी पण तो सल्या आणि लंगड्याच्या आधि मेला
Moral:- प्रेम is खरतनाक than गुटखा 

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

सरदार इंटरव्यू देने गया,

बॉस ने पूछा तुम कितने भाई बहन हो

सरदार: 5

बॉस: उन में तुम्हारा नंबर कौनसा है ?

सरदार: एयरटेल

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



लोक म्हणतात कि एक दिवस

दारू  पिल्याने सतत सवय

लागते.

एकदम चूक

आम्ही लहान पणा पासून

अभ्यास  करतोय

लागली का सवय ?

याला म्हणतात Control. 

खुलता कळी खुलेना....

आमचा बोनस काय मनासारखा मिळेना

.

.

वैतागलेला कामगार

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



बायकांची सरकारला विनंती :

मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर आता fair & lovely ला जरा मनावर घ्यावे,

6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले पण रंग काही गोरा झाला नाही .

एक वैतागलेली काळी परी

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

😉 एक भयंकर जोक 😉

प्रियकर - मी तुझ्या बरोबर लग्न नाही करू शकणार...

प्रेयसी - का ?

प्रियकर - घरचे विरोध करतात...

प्रेयसी - घरी कोण कोण आहेत ?

प्रियकर - बायको आणि दोन मुले...

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

बर झाले ‪

‎लग्नासाठी‬ आरक्षण नाहीये

नाही तर

‪OPEN‬ ‪‎वाले‬ ‪‎

बिनलग्नाचे‬ मेले असते

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात... बहिण किचनमध्ये असते.  तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहिण त्याला विचारते.,

बहिण : मुलगा कसा आहे?

भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला

फिल्मचा हिरो वाटतो....

बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?☺

भाऊ : "फँड्री

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

मानलेली बहीण,

मानलेला भाऊ,

मानलेले आई - बाबा, काका - मामा मावशी,

ही मानलेली नाती चालतात....

तर मानलेली " बायको " यात काय

प्रॉब्लेम?



भावाचा मित्र भावासारखा असतो

बहिणीची मैत्रीण बहिणी सारखी

..................

तर बायकोची मैत्रीण

बायकोसारखी का नाही ??

हरी ओम् 

.😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉


  जो येतो तो ग्रुप हालवतो

जो येतो तो ग्रुप हालवतो

च्यायला आता मी ग्रुपच

अम्बुजा सीमेंट चा बनवतो.

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

एगदा सर बंड्याला प्रश्न विचारतात     

सर :  कॉस थिटा ÷ साईन थिटा =?

बंड्या : पणदूर तिट्टा

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या.

ज्या,

सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या

" सर आज तुम्ही Homework चेक करणार होता ना??

लास्ट बेंच मित्रमंडळ..

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

गुरुजी - हॉस्पिटलमधल्या ➕ चिह्नाचा अर्थ सांग पाहू.

बंड्या - उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट..!

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



मार्टिन ल्युथर किंगने सांगितले

"तुम्ही उडू शकत नसाल तर पळा.

पळू शकत नसाल तर चाला.

चालू शकत नसाल तर रांगा.

पण पुढे सरकत राहा."

.

.

एका मालवणी माणसाने विचारले,

.

"तसा नाय पन एवढी वडातान करून जावचां खय हा?

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



पोरगी पोरग्याला:

"तुझी स्माइल काय गजब हायं..

दात कशे चमकुन रायले बे इतके...? 

पोरगं लाजून... ☺

"माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..!"

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



मुलगा मुलीला प्रपोज़ करताना

.

.

.

.

.

.

मुलगा: प्रिये तू महान आहेस

माझ मन तुज्याकड़े गहान आहे

.

.

मुलगी: सोन्या तू अजुन लहान आहेस

माझ्या पायात वहान आहे माझ्या नादि लागलास तर समोरचे

Hosptial तुझ्यासाठी छान आहे


😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



मास्तर:तुझा जन्म कोणत्या वारी झाला?

बंड्या:मंगळवारी,

बंड्या:मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला?

मास्तर:रविवारी

बंड्या:गप बसा राव मास्तर…

रविवारी सुट्टी असती.

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



.प्रेमात आत्महत्या करू नका

.

.

जर मुलगी  नाही म्हणलि..

तर एखदा टॉवर पहा त्याच्यावर चढ़ा..

आणि विचार करा..

गाव लई मोठ आहे ....

दूसरी बघु...

खाली उतरा आणि कामाला लागा...

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



प्रियकर - मी आज तुझ्या घरी गेलेलो...... मलावाटत नाही आपले लग्न होईल

 प्रेयसी - का? काय झाले? तू माझ्या आईलाभेटलास का ?.

.

.

.

.

.

.

.

प्रियकर - नाही तुझ्या बहिणीला भेटलो.........आयला काय दिसते यार

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



सरदार - डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,

झोपून उठल्यावर झोप येत नाही ,

काय करू?

डॉक्टर- रात्री उठून उनात बसत जा, सगळे ठीक होईल :)

 

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



काही लोकं आपल्याच नाकात

आपलेच बोटं घालून गरागरा फिरवितात,

नाकातून बोट काढतात

आणि

बोटाकडे अश्या नजरेने पाहतात

जणू काही नाकातून एखादा मोतीच

बाहेर आलाय...!

 😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



एक पागल आइने  में खुद को देख कर सोचने लगा यार इसको कहीं देखा हूँ।

काफी देर टेंसन में सोचते सोचते-----

धत्त तेरी की ये तो वही है जो उस दिन मेरे साथ  बाल कटवा रहा था,,

सरदारजी पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली -

सरदारजी - साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत

पोलिस - कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे?

सरदारजी - साहेब ... टेलिफोनवाले... म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं..

ती भडकली,

तीने त्याला धू धू धुतला..

अगदी लोळवला..

तो कपडे झटकत उठला..

आणि म्हणाला..

तर मग मी नाही समजू का..?

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



गमतीदार कविता :

.

.

.

गेलो होतो रानात ,

उभा होतो ऊन्हात,

दिसली क्षणात,

भरली मनात,

... ... म्हणून बोललो कानात,

दिली ना गालात.आता पुन्हा

नाही जाणार त्या रानात.!

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



बायको-आहो आज पुन्हा तुम्ही

दारू पिऊन आलात का.

टाइम बघा किती झाला??

.

नवरा-बारा ला पाच कमी..

.

बायको-आता सात वाजले

आनि तुम्ही बारा ला पाच

म्हणता

जास्तच चढली वाटतं तुम्हाला..

.

.

नवरा-मी कुठ चूकीच

बोललो..

बारा ला पाच कमी म्हंजे किती

सातच ना

 बेवड्यांचा नाद करायचा नाय

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉




हिंदीचे शिक्षक : "टेबलपर चाय किसने गिराई ?" हे आपल्या मातृभाषेत कसं सांगाल ?

.

विद्यार्थी (विचार करत) : गुरुजी..... मातृभाषेत म्हणजे आईच्या भाषेतच ना ?

.

हिंदीचे शिक्षक (समजावत) : हो..... अगदी बरोबर..... मग सांग आता.....

.

विद्यार्थी (आठवत) :"तेच म्हटलं मेला धडपडला कसा नाही इतक्या वेळात.....  गधडा एक गोष्ट नीट करेल तर शपथ..... अगदी बापाच्या वळणावर गेलंय कार्टं..!
😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉


एक डॉक्टर पेशंटच्या मागे धावत

असतो..

रस्त्यात एक माणूस विचारतो,"काय

डॉक्टर त्याच्या मागे का धावतंय ?

डॉक्टर सांगतो, "च्या आयला,

दरवेळी मेंदूचं ऑपरेशन करायला येतो ,

.

.

.

.

.

.

.

आणि केस कापून

झाल्यावर पळून जातो..

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

सकाळी एका पतीने आपल्या पत्नी  ला उठवलं.....



:- डार्लिंग चला उठा.. आपण योगा क्लास ला जावूया... 

:- का हो.. मी तुम्हाला एवढी लट्ठ दिसते की काय..?

:- तसं नाही गं.. योगा हे निरोगी राहण्यासाठी... आपल्या फिटनेस साठी छान असतं..😉

:- म्हणजे मी अनफिट आहे... आजारी आहे.. असं म्हणायचंय तुम्हाला..

:- जावू दे.. नसेल उठायचं तर...

:- याचा अर्थ काय.? तुम्ही मला आळशी समजता की काय..?

:- हे बघ, तुझा गैरसमज होतोय..

:- अरे देवा..

म्हणजे मला अक्कलच नाही.. इतकी वर्ष झालीत आपल्या लग्नाला.. आणि तुम्हीं म्हणताय मी तुम्हाला समजूं शकले नाही... माझा गैरसमज होतोय..

:- अगं मी तसं म्हणालो काय..?

:- म्हणजे.... मी खोटं बोलत आहे तर..

:- ओके ओके... जाऊ दे..

सकाळी सकाळी वाद कशाला..

:- मी वाद घालते ?

मी वाद घालते.. ?

तुम्हाला वाटतयं मी भांडखोर आहे...?

:- ठीक आहे... मी ही जात नाही फिरायला... योगा कैन्सल..

:- बघितलत, मुळात तुम्हाला जायचंच नव्हतं.. फक्त माझ्या डोक्यावर खापर फोडायचं होतं...

:- बरंय.. मी एकटाच जातो.. तू झोप आनंदात... 

:- जा जा..

एकटेच जा..

तसंही तुम्ही एकटेच सगळी मौज करता..

कधी माझी फिकिर केलीय का तुम्ही... 

:- आता माझं डोकं गरगरतंय... चक्कर येतेय मला...

:- येणारच... स्वार्थी आहात तुम्ही.. नेहमी स्वत:पुरताच विचार करता नां..!

बायकोच्या आरोग्याची अजिबात काळजी नाही तुम्हाला...!

चक्कर येणारच..!



पती  मौन..

पत्नी झोप.. 

पती (मनाशीच) च्यायला माझं चुकलं कुठे....



😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



=================

सर्व पत्नीप्रेमी पतींना समर्पित.. 

=================

"पत्नीने नव-याला' न सांगता नवीन "सीम" घेतले.

नव-याला "सरप्राईज' द्यावे, या हेतूने ती "किचन" मध्ये गेली.

तेथून नवीन नंबर वरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली,

"हाय डिअर, कसा आहेस..?"

"नवरा ( दबक्या आवाजात) नंतर बोलतो, आमच "येडं" किचन मधे आहे...

बायकोने लाटण तुटेपर्यंत  मारला

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



सासु म्हणते

माझी थोरली सुन पाचशेची

तर

धाकटी सुन हजाराची नोट आहे

दोन्ही काही कामाच्या नाही.



त्यावर सुनेच उत्तर ....

                              

माझी सासू म्हणजे अगदी अस्सल दोन हजाराची नोट आहे हो..

              

पण कधी रंग बदलेल ह्याची खात्रीच नाही.....

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



भारतात १००० मुलांच्या प्रमाणात फक्त ९४३ मुली आहेत.

म्हणजे ५७ मुलं लग्नाशिवाय राहतात.

हीच ५७ मुलं पुढे जाऊन

.

.

.

अटलबिहारी, अब्दुलकलाम, रतन टाटा, नरेंद्र मोदी बनतात !

उरलेले ९४३,

कुकरच्या ३ शिट्या झाल्या कि

गॅस बंद करतात.
😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

.

टिचर - कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा !

.

गण्या - आलिया भट्ट...

.

टिचर - माकडा ! वर्गाच्या बाहेर हो  !

.

मक्या - ओ मॅडम, बोबडा आहे तो...

.

त्याला ' आर्यभट ' म्हणायचंय !

.

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

एकबार पप्पू डबल डेकर बस में चढ़ गया!

कन्डक्टर ने उसे उपर भेज दिया।

थोड़ी ही देर में पप्पू भागता हुआ नीचे आया..

कंडक्टर:”क्या हुआ?”

पप्पू : “साले मरवाएगा क्या? उपर तो ड्राईवर ही नही है।”



😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात,

तेव्हा त्या मुलाची बायको तिच्या  बंडूवर ओरडत असते.

आजोबाः सूनबाई का आराडतीयास पोरावर....洛樂

सूनबाईः बघाना मामांजी बंडू नुसतच कोलगेट खातोय...

आजोबाः बंडू नुसत कोलगेट खायाच नसत,

चपाती संग खायाच असत..

सूनबाई,  दवाखान्यात 

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

 नवीन 

दोन  वेडे  मित्र

पहीला : तुझा जन्म कधी

   झाला ?

दुसरा : सोमवारी झाला....

आणि  तुझा ?

पहीला :  रविवारी.

दुसरा : छे ! शक्य  नाही

रविवारी  सुट्टी असते.

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



 नवरा - हल्ली तुझे उपवास नसतात का ?

लग्नाआधी बरेच करायचीस ना ??!

 बायको - हो ना. सोळा सोमवार करून तुमच्याशी लग्न झालं आणि

माझा विश्वासच उडाला उपासांवरचा !
😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉


 बायको- तुम्हीं मला लग्नापूर्वी सिनेमा, खंडाळा, गणपतीपुळे. .. कुठे कुठे फिरायला घेऊन जायचा.

आणि आत्ता...कुठेच नाही नेत.....

 नवरा- निवडणुक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पाहिलाय का. ??

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



तीन वेडे एका पलंगावर झोपलेले असतात   . . .  . . .   

पहिला - खूप अडचण होत आहे   

दूसरा - हो ना

तीसरा - मला पण

तीसरा खाली जाऊन झोपतो

दूसरा - ए .  . . . . .

येडपट .   . . ये वर आता जागा झाली .  . . . . . . .

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय?

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…. जी व्यक्ती तुम्हाला वेळेवर तंबाखू देते

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

मिटिंग मध्ये बॉसच्या जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात”

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



बायका फार नशीबवान असतात कारण

त्यांना बायका नसतात

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नवे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



अॅक्टीवाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर “बुलेट” चा आवाज येतो म्हणे….

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉





बाबा : आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल?

मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच?

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉

लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



I-Phone 7 हा लगातार सातवा असा फोन आहे जो आपल्याकडं नाहीय

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



मुलगी : तुझी आठवण येतेय

मुलगा : अजून पगार झाला नाही

मुलगी : अच्छा चल बाय

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकिच्या मुलीच्या प्रेमात पडला असेल तर त्याला अडवू नका

कारण अक्कल बदाम खाल्ल्याने नाही धोका खाल्याने येते

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या. ज्या सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या

– सर आज तुम्ही गृहपाठ चेक करणार होता ना?

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



“बघून घेईन” म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा “घेऊन बघतो” म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



आजची महत्वाची बातमी : भारी पावसानं पुण्यामध्ये जबरदस्त नुकसान

10-12 जणांची गायछाप भिजली

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



काय दिवस आलेत… चौथी पाचवीची पोरं प्रेमाच्या गप्पा मारतायंत..

आणि तरुण पोर pokemon पकडत फिरतायंत

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न – पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कशा मिळतात??

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



सर्वच आईवडिलांचा सर्वात सुंदर डायलॉग – डोकं तर खूप आहे त्याला पण तो अभ्यासच करत नाही

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



ज्यांचे पुण्य अपार असते … त्यांच्या बायकोचे माहेर किमान ३०० किलोमीटर दूर असते

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मर खान येउद्यात

हवा फक्त त्याचीच होते जो झोपून नागीण डान्स करतो.

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



भारत सरकारचा नवीन नियम

ज्यांचा मोबाईल कँमेरा २ मेगा पिक्सेल आहे अशांना दारिद्र रेषेखालील घोषित करण्यात येईल

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



एक माणूस मच्छिवालीला : ए मावशी या सुरमई मध्ये गाबोळी (अंडी) आहेत का?

मच्छिवाली : ए बाबा, मच्छि वजन करून देतात, सोनोग्राफी करून नाही

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



आयुष्यात कधी पाय डगमगला, कधी पडलो पण हिम्मत नाही हरलो

पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला, “वेटर, अजून एक खंबा आन”

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



तुम्हाला माहित आहे काय पॉपकॉर्न कढईत ठेवल्यावर उड्या का मारतात?

स्वतः गरम कढईत बसून पहा, मग आपोआप समजेल

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे

पुरुषांचे काय…. बायका दिसल्या की खुश होतात

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्ष नक्की वाढतील

पण लक्षात ठेवा की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरुणपणातली नव्हे

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



बासुंदीचा फुल फॉर्म सापडला : बाई सुंदर दिसते

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



ATM मधून 2000 रुपये निघताना इतका आवाज होतो की असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय…

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस आणि जो कधी चुकतच नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस

😉😉😉😉😉😉😉😉👇👇👇👇👇😉😉😉😉😉😉😉😉



सगळेच विनोद हे WhatsApp वरील Forwards आहेत त्यामुळे श्रेय नकोय आम्हाला तुम्ही फक्त मोकळेपणाने हसा म्हणजे सार्थक होईल.... आणि यात काही हिंदी विनोद आहेत पण हसण्याची भाषा असत नाही....


Tuesday, November 15, 2016

आत्ताच्या बँकेबाहेरच्या पुणेरी पाट्या

#आत्ताच्या_बँकेबाहेरच्या_पुणेरी_पाट्या

टेन्शनच्या आणि धावपळीच्या वातावरणात #पुणेरी_टोमणे कडून थोडा गमतीने दिलासा देण्याचा प्रयत्न. एन्जॉय!

1. हि कोणाच्याही तिर्थरूपांची बँक नसून सर्वांनी लायनीत उभे राहून आत येणे
2. "तुला माईत्ये का मी कोने?" म्हणणाऱ्यांना नोटा बदलून मिळणार नाहीत.
3. दादागिरी करणार्यांना जुन्या 500 च्या नोटा दिल्या जातील.
4. फॉर्म नीट भरा, दादा, तात्या, अण्णा, यांना आम्ही ओळखत नाही, कारण आम्ही आत्ता बाप आहोत.
5. अरेरावी करू नये, कोणीही तुमच्या मदतीला येणार नाहीत कारण जुना नोटा कामाच्या नाहीत.
6. उगाच पाणी वाटप वगैरे कार्य करुन मते ओढण्याचा प्रयत्न करू नये, आणि गर्दी वाढवू नये,आम्ही पाण्याने भरलेला माठ आणि पेला ठेवला आहे. लोकं आपापली घेतील.
7. विनाकारण कोणी केमेरे चालू करून लोकांना तुमचे काय मते? काय वाटतंय नोटा बंद झाल्यावर वगैरे लोकांचे इंटेर्विव्यु घेत बसू नये, सरकार ने फायनल निर्णय घेतलाय, आता कोणी काही हि बदलू शकत नाही... #नोटांशीवाय
8. घाई करू नये, हि बँक आहे लोकल ट्रेन नाही.
9. कॅशिअर सोबत फालतू वाद घातल्यास केशिअर ला झोपायला सेपरेट बेड ची सोय आहे, विचार करून बोला.
10. आम्ही तुमचे सेवक आहोत, नोकर नाही.
11. हे पुणे आहे, सभ्य भाषेत अपमान करायची इंडायरेक्ट पद्धत आहे.
12. नोट हि लक्ष्मी आहे, त्यामुळे तिच्यासोबत इथे सेल्फी काढत बसू नये...
13. थोडा उशीर होत असलेतरी भाईगिरी न करता लायनीतच थांबावे, इथे आजूबाजूला पोलीस आहेत, आणि तुमच्याकडे 500-1000 व्यतिरिक्त दुसऱ्या नोटा नाहीत.
14. गर्दी असल्याने वेळ लागणारच, तरी कृपया सारखं पिचिक पिचिक आवाज काढू नये... घरी पैसे साठवायला आम्ही सांगितलं न्हवते.
15. हा परीक्षा हॉल नाही, तरी, इतरांचा फॉर्म पाहून भरू नये.
16. अजून किती वेळ लागेल वगैरे फाजील प्रश्न विचारू नये,
कारण त्याचे उत्तर आम्हालाही माहित नाही.
17. इथे गाडी पार्क केली तर चालेल का वगैरे पांचट प्रश्न विचारू नये.
18. ATM चालू आहे का हे पाहण्यासाठी ATM च्या बाहेर लाईन आहे का ते पाहावे.
19. सरकार कडून मिळालेलेच फोटो भिंतीवर लावले आहेत, तरी आमच्या यांचा फोटो नाहीये वगैरे वाद घालू नये.
20. "शी बाबा" म्हणून उकडणे थांबत नाही, तुमच्या इतकंच आम्हालाही उकडते आहे, आणि आहेत तेवढे सगळे फॅन्स चालू ठेवलेत.
21. आमच्याकडे ज्या नोटा अव्हेलेबाल आहेत त्याच आम्ही देऊ शकतो, आमचा स्वतःचा नोट छापायचा कारखाना नाही.
22. सर्वांच्या नोटा दिसायला सारख्याच आहेत, त्यामुळे विनाकारण, तुझी बघू... तुझी बघू करत वेळकाढू पणा करून गर्दी वाढवू नये.
23. आपली संस्कृती आणि आई वडिलांची शिकवण हि आपण गर्दीत वयस्कर लोकांशी कसे बोलतो यवरूनही समजून येते.
24. उगाच मोठ्या मोठ्या राजकर्त्यांनी बँकेत येऊन लोकांना कित्ती कित्ती त्रास होतोय याची चाचणी करत बसू नये, मोठा निर्णय आहे, थोडा त्रास तर होणारच.
25. "अत्तापर्यंत किती काळे पैसे बँकेत जमा झाले ओ???"
हा प्रश्न विचारू नये. कारण आम्ही एकही काळ्या रंगांची नोट घेत नाही.
26. "काका जरा पटापट करा ना" म्हणून आम्हाला सल्ला देऊ नये, आम्ही माणूस आहोत आणि मशीन नाही.
27. 1000 च्या नोटा बंद करून 2000 ची नोट का? असले फाजील प्रश्न आम्हाला विचारू नये. त्यासाठी रात्री कुठलाही न्यूज चॅनल लावून भांडणे पहात बसावे.
28. दारावर उभ्या असणाऱ्या शिपायाशी भांडू नये, त्याच्याकडे भरलेली बंदूक आहे.
29. घुसखोरी केलेल्या बांग्लादेशवासीयांनी आता आमचे काय होणार वगैरे प्रश्न विचारून आमचा वेळ वाया घालवू  नये, घुसायाच्या आधी आम्हाला विचारले होते का?
30. आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत,  निशिंत रहावे
31. किती हि गर्दी असेल तरी ही दुपारी 1 ते 4 बँक बंद.........
............ राहणार नाहीत, काळजी नसावी.

आता लगेच हि पोस्ट कॉपी करून त्यात पुणे खोडून इतर शहरांचे नाव टाकून तुमच्या पेजवर टाकू नये, कारण काही गोष्टी पुण्यालाच सूट होतात...

आणि

आशा आहे की लायनीत उभे असताना हे वाचून थोडेतरी मन गर्दीतून वळले असेल...

#पुणे३०

ता. क.
Whatsapp वर आलेली पोस्ट कॉपी करून ब्लॉग वर टाकलेली आहे तेव्हा उगीच चौकशी वगैरे करू नये.

Friday, August 14, 2015

बाप ! - तेव्हा पुरुषाचा बाप होतो.

बाप...

बायको "गोड बातमी" सांगते ते ऐकून
टचकन डोळ्यात पाणी येते
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
नर्सने ओंजळीत ठेवलेला काही पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याची जाणीव करून देतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो....
बायकोबरोबर जागवायच्या रात्री डायपर बदलणे आणि पिल्लाला कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात व्यतीत होउ लागतात,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके नीरस वाटून संध्याकाळी पावलांना घराची ओढ लागते,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
"लाईन कोण लावणार" म्हणत सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून तासंतास इमानदारीत उभा रहतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
ज्याला उठवताना गजर हात टेकतात तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
खऱ्या आयुष्यात एका झापडित कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरोबरच्या खोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
स्वतः कमीजास्त शिकला असला तरी पोराला "नीट अभ्यास कर रे" असे पोट तिडकिने सांगू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
आपल्याच कालच्या मेहनतीच्या जोरावर आपला आज मजेत जगणारा अचानक पोराच्या उद्यासाठी आपलाच आज कॉम्प्रोमाइज करू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
ऑफिसात अनेकांचा बॉस बनून हुकुम सोडणारा शाळेच्या POS मध्ये वर्गशिक्षिकेसमोर कोकरु बनून, कानात प्राण आणून तिच्या इंस्ट्रक्शन्स अज्ञाधारकपणे ऐकतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
आपल्या अप्रेझल आणि प्रमोशनपेक्षासुद्धा तो शाळेच्या साध्या यूनिट टेस्टच्या रिझल्टची देखिल जास्त काळजी करू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
आपल्या वाढदिवसाच्या ट्रीट पेक्षा पोराच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत तो गुंगुन जातो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
गाडीतून सतत फिरणारा तो पोराच्या सायकलची सीट पकडून सायकलच्या मागे धावू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
आपण पाहिलेली दुनिया, केलेल्या चूका पोराने करू नयेत म्हणून प्रिचिंग सुरु करतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
प्रसंगी पोराच्या कॉलेज अडमिशनसाठी पैशाची थैली सोडतो किंवा याचनेकरिता "कॉन्टेक्ट्स" समोर हात जोडतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
"तुमचा काळ वेगळा होता, आता जमाना बदलला, तुम्हाला काय कळणार नाही. This is generation gap!" असे आपणच केव्हातरी बोललेले संवाद आपल्यालाच ऐकू आल्यावर आपल्या बापाच्या आठवणीने हळवा होऊन मनातल्या मनात त्याची माफी मागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
पोरगा शिकून परदेशी जाणार, मुलगी लग्न करून परक्या घरी जाणार हे दिसत असून त्याकरिता स्वतःच प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा पुरुषाचा बाप होतो....
पोर मोठी करताना आपण कधी म्हातारे झालो हे लक्षात येत नाही आणि लक्षात येते तेव्हा उपयोग नसतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
कधी पोरांच्या संसारात अडगळ बनून,
कधी आपल्या म्हातारीबरोबर वृद्धाश्रमाची पानगळ बनून,
अगदीच नशीबवान असला तर नातवंडांसमवेत चार दिवस रमून...
कसेही असले तरी भावी पिढीला भरभरून आशीर्वाद देत कधीतरी सरणावर चढतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो...!!!!

तमाम बापांना शुभेच्छा!


WhatsApp वर वाचनात आले आणि आवडले म्हणून शेअर केले आहे . लेखकाचे नाव कळल्यास श्रेय देण्यात येईल

Wednesday, July 29, 2015

मी हे वधूपक्षाच्या लग्नंघराबद्दल म्हणतोय.…


 
 मी हे वधूपक्षाच्या लग्नंघराबद्दल म्हणतोय.… 
बापाच्या आयुष्यातला खरंतर हा सगळ्यात आनंदी प्रसंग. कार्यालयातून परत आल्यावर भावनिक त्सुनामी येउन गेल्यानंतरची परिस्थिती घरभर असते. बरेचजण सुट्ट्या नसल्यामुळे परस्पर कार्यालयातून स्टेशनवर पळालेले असतात. सामान घेऊन गाड्यांबरोबर माणसंही घरी येतात. थकवा ओसरला की निघायच्या दृष्टीने रिटायर्ड लोकांनी दोनचार दिवसानंतरची जायची रिझर्वेशंस केलेली असतात.…. !

मागे राहिलेले दहाबारा पाहुणे, घरभर अस्ताव्यस्तं पडलेलं सामान, रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेली प्रेझेंटस, बाहेर लावलेल्या लाईटच्या माळांचा निस्तेज प्रकाश, प्रत्येकाच्या चेह-यावर मानसिक आणि शारीरिक थकव्याचा हलकासा पफ फिरवल्यासारखा थर, कुणालाही भूक नसते पण दुपारीच जेवण झाल्यावर परतलेली, कमी दमलेली एखादी अनुभवी वयस्कं आत्या, काकी मुगाच्या डाळीची खिचडी ग्यासवर चढवते, 'पोह्याचे पापड कुठेत गं? सांग फक्तं, मी काढते ' विचारत तिच्या दृष्टीने नुसत्याच मिरवणा-या पाहुण्या मुलीला/सुनेला 'ताक घुसळतेस पटकन?' अशी आदेशवजा विनवणी करते. सुनेला त्रास न देता सापडल्याच तर दहाबारा सांडगी मिरच्या तळून ठेवते.…. !

उद्या सकाळी जाणारे पाहुणे आपापलं सामान गोळा करतात, सकाळी घालायचे कपडे, रिझर्वेशंस वरती काढून ठेवून टूथब्रश सकाळी सापडेल अशा नेमक्या जागी ठेवतात. आजीच्या चेह-यावर लग्नाकरता एवढ्या लांबून मुद्दाम आलेल्या माणसाबद्दलचं कौतुक ओसंडून वहात असतं. परत भेट होतीये न होतीये म्हणून ती मायेने चिवडा लाडूच्या दोन पुड्या त्यांच्या हातात कोंबते. गाड्यांचे, कुणीकुणी गेल्या दोन दिवसात खर्च केलेले पैसे आठवणीने दिले जातात. सुतकात असल्यासारखे सगळेजण ऊनऊन खिचडीचे दोन घास पोटात घालतात, लग्नं कसं झालं, फोटो, दागिने यावर हलक्या आवाजात निरुत्साही चर्चा होते. अशावेळी सगळं पटापट आवरलं जातं. बापाचा हात न वाजलेल्या फोनकडे सारखा जातो. एकदाचा उत्साहानी फसफसलेला, आनंदी फोन येतो, सगळा ताण रिलीज झाल्यासारखा बाप 'मिरची फारच तिखट आहे' म्हणत तांब्यानी वरून पाणी पित डोळ्यातलं मागे सारतो.…. !
नमस्कार होतात, ओट्या भरल्या जातात, दिलं घेतलं जातं. आठवणी निघतात. डोळे ओले होतात, पुसले जातात, तोंडभरून आशिर्वाद मिळतात, दिले जातात, कानशिलावर बोटं मोडली जातात, परत लवकरच भेटण्याचे वायदे होतात, नातवंडांचे, माहेरवाशीणीचे गाल आजीच्या पाप्यांनी ओलसर होतात. दोनतीन दिवसात सुगी संपल्यावर पाखरं नाहीशी होतात तसा एकेक पाहुणा परततो. मग उरतो तो फक्तं नि:शब्द एकांत. मग आजी शहाण्यासारखी कोचावर सुखानी लवंडते.….!☺

शेवटच्या पाहुण्याला स्टेशनवर सोडून आलेला बाप 'मला भूक नाहीये गं, पडतो जरा' म्हणत बेडरूममधे जातो. मुलीचं कपाट उघडतो, घरी आल्यावर लागतील म्हणून तिनी ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवतो. लागूनच असलेल्या बेडवर बसतो आणि ओंजळीत तोंड धरून आवाज न करता धबधब्यासारखा फुटतो.……… !

मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको आई होते आणि त्या फक्तं वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरते.…. !

लक्षात ठेवा -
बाप हा सावली देणाऱ्या वृक्षा सारखा असतो आणि कोणताही वृक्ष आपल्या फळा कडून कसलीही अपेक्षा कधीच ठेवत नाही. तो फक्त त्या फळाला वाढवून सर्वाधिक गोड कसे बनवता येईल या साठीच जगात असतो.

 Source: Whats App

Monday, July 27, 2015

गटारी - वेगवेगळ्या राशींचे नवरे आणि त्यांच्या बायकांच्या प्रतिक्रिया

गटारी - वेगवेगळ्या राशींचे नवरे आणि त्यांच्या बायकांच्या प्रतिक्रिया

आता लवकरच गटारी येईल.या गटारीची पार्टी करू असा मित्रांचा फोन आल्यावर वेगवेगळ्या राशींचे नवरे आणि त्यांच्या बायकांच्या प्रतिक्रिया बघा .....

मेष.. ..यांचा धडक बाणा
हे बघ बंडूचा फोन होता.आम्ही गटारी पार्टी करतोय.अडवण्याचा प्रयत्न करू नको...
बायको ....वृश्चिकेची चंडिका ...  मी कशाला अडवू?पण गटारात तोंड बुडवून आल्यावर अंघोळ करा म्हणजे झालं

वृषभ......अग बंडूचा फोन होता गटारी पार्टी आहे जाऊ ना?
कन्येची पत्नी.......म्हणजे तिथे सग्गळं होणार ना पिणं वगैरे.. ...
पति(वैतागून)हो आम्ही सगळे हाॅर्लिक्स पिणार आहोत

मिथून.....अग बंडूचा फोन....
मिथूनेचीच पत्नी....गटारी पार्टी ना??
खुशाल जा.पण उतरल्याशिवाय घरी येऊ नका

कर्क......अग त्या बंड्याने फोन करून बोलावलेयनाही म्हणणे ठीक नाही.काय करू?
पत्नि.....कर्केचीच.....नाईलाज आहे.पण जा पण तुम्ही पिऊ नका

सिंह. ..हे बघ बंडूचा फोन आलाय आणि आम्ही पार्टी करणार आहोत
पत्नी.....वृश्चिकेची...जा की मग दारू ढोसा वाट्टेल ते करा.पण तरंगत घरी आल्यावर मी दार उघडणार नाही


कन्या.... अगं बंडूकडे आम्ही पार्टी करतोय.
मिथुनेची चतुरा पत्नी....जा जा एक दिवस मजा करा
(असे तोंडाने म्हणताना नव-याची गाडीची किल्ली हळूच काढून घेते.

कुंभ.....गटारीला बंडूकडे मदिरा प्राशनाचा कार्यक्रम आहे
पत्नी....कुंभेचीच.....खुशाल जा या क्षणभंगूर जीवनातले असे आनंदाचे क्षण चुकवू नका

मीन.....अग ए गटारीला बंडूकडे पार्टी आहे जाऊ ना
वृषभेची पत्नी.....जा तर.पण परत येताना आपल्याच घरात या
गेल्या वेळेस किरकिरे काकूंच्या घराची बेल वाजवून गोंधळ उडवला होतात

तूळ...  बंडूकडे गटारी पार्टी आहे.मला बोलावलेय
मेषेची पत्नी... जा पण येताना भान ठेवा.गेल्यावर्षी बंडूभावजींचा लेंगा घालून घरी आलात बावळटासारखे

वृश्चिक......हे बघ बंडूकडे पार्टीला चाललोय
वेडपटासारखी सारखा फोन करू नको
तुळेची पत्नी....बरं तूम्हीच उतरल्यावर फोन करा

धनू......मूड नव्हता माझा पण ड्रींक्स पार्टीला नाही कसं म्हणणार
सिंहेची पत्नी ....काहीही करा तुम्हाला घाणीत तोंड बुडवायचेच असेल तर मी काय करणार??

मकर.......बंडू अतिशय दुःखी आहे म्हणून आम्ही जमतोय
मिथुनेची पत्नी....ढोसून दुःख हलकं करून झालं की या घरी  मग पूजा करते तुमची!!