मी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more
Thursday, November 19, 2009
Tuesday, November 17, 2009
Olakh
गेल्या आठवड्यापासून मेली माझी दाढ दुखू लागली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी दाताच्या डॉक्टरची पायरी चढले. रिसेप्शनमध्ये बसले होते, तर सहज नजर डॉक्टरांच्या डिग-यांच्या सटिर्फिकेटांवर गेली. त्यांचं पूर्ण नाव वाचून मी तर गारच पडले. नंदकिशोर प्रधान... म्हणजे आमच्या शाळेतल्या वर्गाचा हीरो. गोरा गोरा, उंचापुरा, कुरळ्या केसांचा राजबिंडा मुलगा. आता खोटं कशाला सांगू, माझ्यासकट त्या वर्गातली प्रत्येक मुलगी मरत होती नंदूवर. या वयात छातीची धडधड वाढलीच माझ्या...
... आत गेले आणि नंदूला पाहून चाटच पडले. डोक्यावरचे केस मागे हटले होते. लहानपणचे गोबरे गाल आता फुगून गोल गोल झाले होते. पोट सुटलं होतं. निळे डोळे चष्म्याआड झाकले गेले होते. तरीही त्याचा रूबाब कायम होता.
त्याने मात्र मला ओळखलं नव्हतं. तपासणी झाल्यावर मीच त्याला विचारलं, 'लहानपणी तुम्ही आपटे प्रशालेत होतात का?'
' हो.''
' दहावी कधी झालात? सिक्स्टी सिक्सला का?'
' अगदी बरोबर! पण, तुम्हाला कसं कळलं?'
' अहो, तुम्ही माझ्या वर्गात होतात,' सांगताना मी चक्क लाजलेच... !
... तर तो टकल्या, ढापण्या, ढोल्या, थेरडा नंद्या विचारतो कसा, “कोणता विषय शिकवायचात तुम्ही मॅडम!!!”
Tuesday, November 3, 2009
Hitchintak
हितचिंतक |
---- |
एकदा मी माझ्या तंद्रीत चाललो होतो.एका वळणाशी येऊन पुढचे पाऊल टाकणार तोच मला आवाज आला,"थांब!! एक पाऊलही पुढे टाकू नकोस.वरची बाल्कनी तुझ्या डोख्यावर पडेल".मी थांबलो,अन काय आश्वर्य खरेच वरुन एक आख्खीच्या आख्खी बाल्कनी माझ्या पुढ्यात पडली.मी मागे वळून पाहिले,तिथे कुणीच नव्हते.आजूबाजूसही लोकं अपघात पहायला पुढे धावली होती.त्यात कुणीही माझ्याकडे पाहत नव्हता. असेच काही दिवस गेले.मी रस्त्याने चाललो होतो.हातात हिने खरेदी केलेल्या कपड्यांच्या पिशव्या होत्या.ही बरीच मागे आपली पर्स सांभाळण्यात गुंतली होती.मी रस्ता क्रॉस करणार तोच मला पुन्हा त्यादिवशीचा आवाज ऐकू आला,"थांब,एक पाऊलही पुढे टाकू नकोस.एका ट्रकचा ताबा सुटलाय अन तो लाल दिवा तोडणार आहे".अन खरंच काही क्षणातच माझ्या समोर एक ट्रक भरधाव वेगाने सिग्नल तोडून गेला. |