Tuesday, November 15, 2016

आत्ताच्या बँकेबाहेरच्या पुणेरी पाट्या

#आत्ताच्या_बँकेबाहेरच्या_पुणेरी_पाट्या

टेन्शनच्या आणि धावपळीच्या वातावरणात #पुणेरी_टोमणे कडून थोडा गमतीने दिलासा देण्याचा प्रयत्न. एन्जॉय!

1. हि कोणाच्याही तिर्थरूपांची बँक नसून सर्वांनी लायनीत उभे राहून आत येणे
2. "तुला माईत्ये का मी कोने?" म्हणणाऱ्यांना नोटा बदलून मिळणार नाहीत.
3. दादागिरी करणार्यांना जुन्या 500 च्या नोटा दिल्या जातील.
4. फॉर्म नीट भरा, दादा, तात्या, अण्णा, यांना आम्ही ओळखत नाही, कारण आम्ही आत्ता बाप आहोत.
5. अरेरावी करू नये, कोणीही तुमच्या मदतीला येणार नाहीत कारण जुना नोटा कामाच्या नाहीत.
6. उगाच पाणी वाटप वगैरे कार्य करुन मते ओढण्याचा प्रयत्न करू नये, आणि गर्दी वाढवू नये,आम्ही पाण्याने भरलेला माठ आणि पेला ठेवला आहे. लोकं आपापली घेतील.
7. विनाकारण कोणी केमेरे चालू करून लोकांना तुमचे काय मते? काय वाटतंय नोटा बंद झाल्यावर वगैरे लोकांचे इंटेर्विव्यु घेत बसू नये, सरकार ने फायनल निर्णय घेतलाय, आता कोणी काही हि बदलू शकत नाही... #नोटांशीवाय
8. घाई करू नये, हि बँक आहे लोकल ट्रेन नाही.
9. कॅशिअर सोबत फालतू वाद घातल्यास केशिअर ला झोपायला सेपरेट बेड ची सोय आहे, विचार करून बोला.
10. आम्ही तुमचे सेवक आहोत, नोकर नाही.
11. हे पुणे आहे, सभ्य भाषेत अपमान करायची इंडायरेक्ट पद्धत आहे.
12. नोट हि लक्ष्मी आहे, त्यामुळे तिच्यासोबत इथे सेल्फी काढत बसू नये...
13. थोडा उशीर होत असलेतरी भाईगिरी न करता लायनीतच थांबावे, इथे आजूबाजूला पोलीस आहेत, आणि तुमच्याकडे 500-1000 व्यतिरिक्त दुसऱ्या नोटा नाहीत.
14. गर्दी असल्याने वेळ लागणारच, तरी कृपया सारखं पिचिक पिचिक आवाज काढू नये... घरी पैसे साठवायला आम्ही सांगितलं न्हवते.
15. हा परीक्षा हॉल नाही, तरी, इतरांचा फॉर्म पाहून भरू नये.
16. अजून किती वेळ लागेल वगैरे फाजील प्रश्न विचारू नये,
कारण त्याचे उत्तर आम्हालाही माहित नाही.
17. इथे गाडी पार्क केली तर चालेल का वगैरे पांचट प्रश्न विचारू नये.
18. ATM चालू आहे का हे पाहण्यासाठी ATM च्या बाहेर लाईन आहे का ते पाहावे.
19. सरकार कडून मिळालेलेच फोटो भिंतीवर लावले आहेत, तरी आमच्या यांचा फोटो नाहीये वगैरे वाद घालू नये.
20. "शी बाबा" म्हणून उकडणे थांबत नाही, तुमच्या इतकंच आम्हालाही उकडते आहे, आणि आहेत तेवढे सगळे फॅन्स चालू ठेवलेत.
21. आमच्याकडे ज्या नोटा अव्हेलेबाल आहेत त्याच आम्ही देऊ शकतो, आमचा स्वतःचा नोट छापायचा कारखाना नाही.
22. सर्वांच्या नोटा दिसायला सारख्याच आहेत, त्यामुळे विनाकारण, तुझी बघू... तुझी बघू करत वेळकाढू पणा करून गर्दी वाढवू नये.
23. आपली संस्कृती आणि आई वडिलांची शिकवण हि आपण गर्दीत वयस्कर लोकांशी कसे बोलतो यवरूनही समजून येते.
24. उगाच मोठ्या मोठ्या राजकर्त्यांनी बँकेत येऊन लोकांना कित्ती कित्ती त्रास होतोय याची चाचणी करत बसू नये, मोठा निर्णय आहे, थोडा त्रास तर होणारच.
25. "अत्तापर्यंत किती काळे पैसे बँकेत जमा झाले ओ???"
हा प्रश्न विचारू नये. कारण आम्ही एकही काळ्या रंगांची नोट घेत नाही.
26. "काका जरा पटापट करा ना" म्हणून आम्हाला सल्ला देऊ नये, आम्ही माणूस आहोत आणि मशीन नाही.
27. 1000 च्या नोटा बंद करून 2000 ची नोट का? असले फाजील प्रश्न आम्हाला विचारू नये. त्यासाठी रात्री कुठलाही न्यूज चॅनल लावून भांडणे पहात बसावे.
28. दारावर उभ्या असणाऱ्या शिपायाशी भांडू नये, त्याच्याकडे भरलेली बंदूक आहे.
29. घुसखोरी केलेल्या बांग्लादेशवासीयांनी आता आमचे काय होणार वगैरे प्रश्न विचारून आमचा वेळ वाया घालवू  नये, घुसायाच्या आधी आम्हाला विचारले होते का?
30. आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत,  निशिंत रहावे
31. किती हि गर्दी असेल तरी ही दुपारी 1 ते 4 बँक बंद.........
............ राहणार नाहीत, काळजी नसावी.

आता लगेच हि पोस्ट कॉपी करून त्यात पुणे खोडून इतर शहरांचे नाव टाकून तुमच्या पेजवर टाकू नये, कारण काही गोष्टी पुण्यालाच सूट होतात...

आणि

आशा आहे की लायनीत उभे असताना हे वाचून थोडेतरी मन गर्दीतून वळले असेल...

#पुणे३०

ता. क.
Whatsapp वर आलेली पोस्ट कॉपी करून ब्लॉग वर टाकलेली आहे तेव्हा उगीच चौकशी वगैरे करू नये.