११ मित्रांचे किस्से
ओळखा पाहू 👇
1) सकाळी सकाळी बायको चा हसरा चेहरा बघा. दिवस मस्त जातो.*
** मग बायको कुणाची पण असो.
😊😂😂
2) पुण्यातील सोसायटीच्या बाहेर लागलेली पाटी
अतिथि देवो भव
परंतु देवांना नम्र विनंती आहे की
त्यांनी आपापली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेर पार्क करावीत...
😂😂😂😂😂
3) मुलगा- मी तुमच्या मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम करतोय
पुणेरी वडील - मग आता काय पेन्शन मागायला आलायस ??
😬🤦🏻♂😬😂😂😂
4)
एक छोटा विनोद...
बायको :- मी दोन तासासाठी बाहेर जात आहे... तुम्हाला काय हवंय..?
नवरा :- मला तेच हवंय...
😄😄😄🤣🤣
5) काल मी लिफ्टने वर जात होतो,
त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला .. !!
मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले:
"दुसरा की तिसरा?"
बाईंनी रागाने म्हटले
"आत्या आहे मी याची."
😆😆😆😆😆😆
6) काल एका जुन्या मित्राला चार पाच वेळा कॉल केला पण त्याने उचललाच नाही।
मग आज मी एक मेसेज पाठवला ...
"आपल्या वर्गातील 'श्रेया' आठवते ना. ती आज सकाळी भेटली होती. तुझा नंबर विचारत होती. देऊ का ??"
सकाळपासून किमान 15 वेळा फोन केला पठ्ठ्याने. .
मग मी पण उचलला नाही.
😆😷 😀😄😄😀
7) पुणेकर v/s पुणेकर
पहिला पुणेकर - तुम्हाला आमरस देऊ की बासुंदी ?
दुसरा पुणेकर - घरात एकच वाटी आहे का ?🤔🤔😃😂🤣😆
8) याला अपमान म्हणावं की प्रेम? 🙊
नवऱ्याने, बायकोला विचारले: “तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??”
बायको: “दोन्हीही नाही…. मला तुम्हीच आवडता!”
😂😂😂
9) रामायण मालिका बघतांना राक्षसिणीला पाहून मुलाने विचारले : ही कोण ?
मम्मी म्हणाली : आत्या.
पप्पा म्हणाले : मावशी.
मग काय रामायण संपले आणि महाभारत चालू झाले
10) सध्या करोना म्हटलं की लोकांना लगेच काळजी घ्या म्हणण्याची इतकी सवय लागलीय की प्रत्येक पोस्टवर न वाचता काळजी घ्या ठोकून देताहेत.
मी पोस्ट टाकली होती...
कोरोनामुळं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला बायको सोबत दीर्घकाळ राहता आलंय!
माझ्या या पोस्टला शंभर-सव्वाशे जणांनी "काळजी घ्या" असा सल्ला दिला.
😃😛😛😛 🤭
11) तो बायकोला म्हणाला,
"You are my strength."
बायको त्याला म्हणाली,
"It means other women are your weakness?"
आता वाकड्यात शिरायचे म्हटल्यावर काय?
😃😃😃