1)जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
- नारायण मूर्ती
2)यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणारनाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
-- विश्वनाथन आनंद
3)नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.** *
-- धीरूभाई अंबानी
4)पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवलातर वाढायला मदत करतो. *
-- जे. आर. डी. टाटा
5)फोटोग्राफरच्य ा एका"क्लिक'मुळे जगणे चिरकाल होते.***
-- रघू राय
6)चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.*
- बिल गेट्स
7)मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. *
- कल्पना चावला
8)कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.*
-- बराक ओबामा
9)माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याचीतयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
-- आयझॅक न्यूटन
10)मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा"माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.
-- सर्वपल्ली राधाकृष्णन*
मी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more
Wednesday, June 12, 2013
Tuesday, April 23, 2013
Friday, March 1, 2013
Wednesday, February 20, 2013
Subscribe to:
Posts (Atom)