Saturday, May 10, 2014

मोबाईल आणि इंटरनेट च्या युगात असा दिवस कधी उजाडेल ? : एकदा वाचा आणि विचार करा.

मोबाईल आणि इंटरनेट च्या युगात असा दिवस कधी उजाडेल ? 


रोजसारखीच सकाळ झाली
रोजचे व्हॉट्सअप तुणतुणले
न उघडताच कळले , ग्रुप्सवर
"गुड मॉर्निंग" किणकिणले
मी पाहिलं नाही
फोन उचलला ...
व्हॉट्सअप काय.. मोबाइलही
नसलेल्या एका मावशीशी
बोललो ,
वयाने थकलेल्या
तिच्या थरथरत्या आवाजात
मायेची पिंग किणकिणली
" काळजी घे गं" तिला म्हटलं
माझ्या डोळ्यात पाणी तरळलं..
का ...? . कळलं नाही
फेसबुक क्लिककडे सवयीने
हात गेला
फेस फिरवून मी तो दुसरीकडेच
नेला
शेजारच्या काकांकडे डोकावलो
त्यांचा "फेस" कित्येक दिवस
पाहिला नव्हता
त्यांना तब्येत विचारली..
ते शुगर आणि डॉक्टरवर अथक बोलत राहिले..
जाता जाता म्हणाले..
सांभाळ रे.. किती धावपळ
करतोस..!
मी नकळत वाकलो ...
पायाला हात ..
का ?... कळलं नाही
दिवसभर व्हॉट्सअपवर
सरदारचे जोक्स येत राहिले
आणि .. "मस्ट शेअर पोस्ट"नी
तर व्हॉट्सअप भरून वाहिले..
अजिबात उघडले नाही
स्क्रीनवरच केले ,
पाहिले न पाहिले
सकाळ संध्याकाळ
जेवलास का.. निघालास का ...
म्हणत माझ्या काळजीचा वसा
घेतलेल्या आईला स्वत:हून फोन लावला" काय रे .. काय झालं ... "
तिचा स्वर कापरा झाला ,
तेव्हा कळलं
कामाशिवाय करतच नाही तिला
फोन !
अपराधी वाटून मी बोलत राहिलो..
बोलतच राहिलो..
ती तृप्त होईपर्यंत !
शेवटी तीच म्हणाली ...
अरे देवा.. गॅसवर दूध आहे.. ठेवते रे
दूध नाही.. पण
काहीतरी नक्कीच ऊतू गेलं ...
काय ...? कळलं नाही ...
संध्याकाळ झाली ...
घरी आलो लवकर
फेसबुक ट्विटर चिवचिवत होतंच
पण आजूबाजूला चिवचिवणाऱ्या
माझ्या चिमण्या बाळांशी
चक्क गप्पा मारत बसलो
त्यांच्याशी खेळले.. खूप हसलो!
त्यांचा तो चिवचिवाट
खूप खूप गोड वाटला
का ... कळलं नाही..
रात्री बायको जेवण वाढत होती
फोन दिसणार नाही इतका दूर ठेवला
कढी खूप झक्कास होती..
भुरका मारत प्यायलो..
नुसतंच " लाइक " नाही तर
कमेंट करून टाकली ...
बायको गोड हसली
या आधी कधी अशी हसली होती.. ?
आठवलं नाही ...
अंथरुणावर पडलो तेव्हा ...
उशाजवळच फोन !
दिवसभरात माझं
एकही शेअर नाही..
की पोस्ट नाही
तो काय बोलणार.. आता !
कुणाचेही लाइक येणार नव्हते
कुणीही कमेंटणारही नव्हते
कुणाच्या रिप्लायचीही वाट
बघायची नव्हती
आजचे " लाइक्स "
आजचे " कमेन्ट "
आजचे " रीप्लाय "सारे माझ्या
डोळ्यात होते..
त्यांना जपत मी डोळे मिटले ...
बऱ्याच दिवसांनी ...
त्या रात्री खूप छान झोप लागली.

Sunday, May 4, 2014

मराठी दैनिक सूची : List of Marathi ePaper Web sites

मराठी दैनिक सूची


मराठी वर्तमानपत्र वाचकांसाठी मराठी दैनिकांची यादी. खाली दिलेल्या वर्तमानपत्र लोगोवर क्लिक करा व आपल्या आवडत्या वर्तमानपत्राच्या वाचनाचा मराठीतून आनंद घ्या.
Explore the list of Marathi Newspaper (ePaper) Web sites in Maharashtra.

deshonnati.digitaledition.in

divyamarathi.bhaskar.com

dainikekmat.com

indiapress.org

dailykesari.com

loksatta.com

maharashtratimes.indiatimes.com

www.marathwadaneta.com

navshakti.co.in

epaper.pudhari.com

epunyanagari.com

www.saamana.com/

www.esakal.com/

tarunbharat.com

dainikaikya.com

batmya.com

elokasha.com

epaper.lokprabha.com

lokprashna.com

marathwadaneta.com

dainikmurder.net

navakal.org

parshvabhoomi.com

eprabhat.net

prahaar.in

beedreporter.com

saamsatta.com

esanchar.co.in



epaper.lokmat.com


List of Marathi ePaper Web sites. All logos listed above are properties and copy right of their respective newspaper owners. This web site list is given for the easy search of all Marathi newspapers on one page