Friday, May 20, 2011

मराठी माणसा आता तरी तू मराठीतून बोल...

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी माणसा आता तरी तू मराठीतून बोल...

इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...

प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या...

माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड...

भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका
मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका

मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण
मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण...

ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा...

सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी
मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!

Saturday, April 2, 2011

hasaaaa

एकदा टाटा मोटर्स चे काही अधिकारी "नॅनो" बद्दलचा प्रतिसाद पाहण्यासाठी पुण्यात सर्व्हे घेत असतात. फिरत फिरत ते सदाशिव पेठेत तात्यांच्या घरी येतात.

अधिकारी : नमस्कार ! आमच्या "नॅनो" बाबतीत आपले काय मत आहे ?
तात्या : मला तुमच्या ह्या "न्यानो" गाडीचं नाव अगदी सार्थ वाटतं..
अधिकारी : का बरं ?
...तात्या : तुमचे सेल्समन म्हणतात " न्या ".. आणि आम्ही म्हणतो " नो " !

----------------
एक आदमी: संता के बेटा से, पापा घर पर हैं?

संता का बेटा, स्प्राइट पीते हुए, आपको मम्मी से मिलना है ना, ...
मम्मी घर पर है। सीधी बात नो बकवास..


----------------
पक्क्या : तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे तेरी खुशबू हे पेहचान लुंगा..

चिंगी : आई शप्पथ, मला आधीपासूनच शंका होती कि तू तर साल्या कुत्राच आहेस...


----------------
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?"
इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला."
सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...
हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. ह...ी मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!"


----------------
काल मला १० जणांनी खूप मारला..
संता : मग तू काय केलास?
बंता : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..
संता : मग?
बंता : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं.....


----------------
परीक्षा सभागृहातील सर्वात चांगली गोष्ट कोणती?

हे एकच ठिकाण आहे कि जिथे तुम्ही मुलीला मोकळेपणाने बोलू शकतो.

" जरा दाखव कि "
...
आणि बरयाचवेळा ती दाखवतेही.... :P :D :D



----------------
गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?

बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..

गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ?
...
बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."



----------------
इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट

हिंदी मा म्हणते शुभ रात्री

मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर
...
आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता..


----------------
पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते....

बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय......

पक्क्या : अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते...


----------------
संता : काल मी माझ्या बायको ला driver बरोबर सिनेमाला जाताना पाहिलं

बंता : अरे मग तू पण तिच्या मागोमाग जायचास ना सिनेमाला, म्हणजे काय ते तुला कळल असतं...
...
संता : अरे बर झालो नाही गेलो ते, तो सिनेमा मी आधी पहिला होता..


----------------
मंग्या कानात बाळी घालून फिरत होता,
चंद्या : कानात बाळी? हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू केलीस?
मंग्या : अरे बायको माहेरी जाऊन आल्यापासून..
चंद्या : म्हणजे वहीनीनी माहेरून तुझ्यासाठी बाळी आणली की काय ?
मंग्या : नाही रे गाढवा !!! ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली, आता माझीच आहे सांगितलं म्हणून झक मारत घालावी लागतेय..



----------------
मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे...?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.


----------------
बहिण : मुलगा कसा आहे?
भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो...
बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?
भाऊ : "पा".


----------------
मल्लिकाकडे एक नवीन नोकर कामाला लागतो, त्याला सकाळी मल्लिका किचन मध्ये दिसते, ती मिक्सर चालवत असते,
नोकर : काय म्याडम काय बनवता आहात?
मल्लिका : काही नाही रे कपडे धुते आहे.


----------------
नवरा : तू मला आत्ता कुत्रा म्हणालीस?

बायको लक्षच देत नाही,

नवरा पुन्हा विचारतो.
...
काहीच उत्तर नाही.

तो पुन्हा विचारतो.

बायको : नाही म्हणाले पण आता भुंकणे थांबवा जरा!!


----------------
क्क्या : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस?

मंग्या : अरे बहिणीशी रे ...

पक्क्या : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय ?
...
मंग्या : बहिण तुझी आहे....


----------------
बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला 'बाबा' म्हणून हाक मारू नकोस चंद्या.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,
बाप : काय लागला निकाल?
चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक...


----------------
बंड्या चिंगीच्या बाबाना जाउन भेटतो...
बंड्या : मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो ..
चिंगीचे बाबा : कधी पासून .
बंड्या : गेल्या पाच माहीन्या-पासून
चिंगीचे बाबा : हे शक्य नाही ...
...बंड्या : मग अजुन चार महीने थांबा ... तुमची खात्रीच पटेल...


----------------
आजोबा : पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.
पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा.
आजोबा : का रे.. ???
पिंट्या : अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी....


----------------
संता : अरे यार बंते, हा sent message काय प्रकार आहे ?
बंता : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही..
sent message म्हणजे perfume वाला message...