Tuesday, September 27, 2011

आणखि काहि चो-या

पांडू हवालदाराने चार शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले पाहून इन्स्पेक्ट र प्रधान हतबुद्धच झाले. त्यांनी विचारले,''काय रे पांडू, हा काय प्रकार?''

''अहो, या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार केला.''

इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्रश्ान् पडून इ. प्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला. पहिल्या पोराला विचारलं,''तुझं नाव काय आणि हवालदारानं पकडलं तेव्हा तू नेमकं काय करत होतास राणीच्या बागेत?''
...
पोरगा निरागस चेहऱ्यानं म्हणाला,''माझं नाव नन्या. मी सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकण्याचा प्रयत्न करत होतो.''

आता दुसरा मुलगा.''माझं नाव मन्या. मीही सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत होतो.''

तिसरा मुलगा.''माझं नाव विन्या. मी पण सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत होतो.''

चौथा मुलगा स्फुंदत स्फुंदत पुढे आला आणि म्हणाला,''माझं नाव
शेंगदाणे

------------------------------

राम आणि रावणाचं घमासान युद्ध सुरू असतं.
राम रावणावर ब्रह्मास्त्र सोडणार एवढ्यात रावणाला रामाच्या शेजारी एक व्यक्ती दिसते.
ते पाहून रावण आपली सश्त्र खाली ठेवतो
आणि तिथून निघून जायला लागतो.

... राम: काय झालं?

रावण: काही नाही... मी निघतो.

राम: ए पण काय झालं सांग ना. ...

रावण: काही नाही यार बास झालं.

राम: अरे असं काय करतोस? काय झालं ते तर सांग. . . .

रावण: काय राव तू पण... एवढ्या लहान सहान गोष्टींसाठी रजनीकांतला बरोबर आणायची काय आवश्यकता होती?.

///////

गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते ......

त्यात एक कुत्रा हि नाचत होता....

लोकांनी विचारले " तू का खुश आहेस ? " .........

त्यावर कुत्रा म्हणाला " वीज येईल तर खांब पण लागतील ना