Saturday, January 5, 2013

चितळ्यांची बाकरवडी


‎"चितळ्यांची बाकरवडी" 




ऐकीव पण इंटरेस्टिंग…चितळ्यांचं कुमठेकर रस्त्यावरील दुकान. वेळ रात्री आठ वाजता म्हणाजे दुकान बंद होण्याची.
मालक चितळे स्वत: कुलूप लावायच्या तयारीत..त्याच क्षणी एक माणूस बंद होणार्‍या शटरच्या खालून जवळपास लोळणघेत आत घुसला…चितळ्यांनी त्याला आडवायचा प्रयत्न केला पण तरीही तो चिवट माणूसशेवटी घुसलाच.
चितळ्यांनी खवळून त्याला काय पाहिजे म्हणून विचारलं…” बाकरवडी..” अपेक्षित उत्तर आले.
”किती वाजले घड्याळात…? आठ वाजले ते दिसत नाही. का घड्याळ चुकीची वेळ दाखवतंय..तसं असेल तर बाकरवडी ऐवजी घड्याळ घ्या… ” चितळे त्याच्यावर वतागले.
” मला बाकरवडी हवीय..”" मिळणार नाही.. दुकान बंद झालेय… उद्या या..”" बाकरवडी..”" शक्य नाही… आता बाहेर पडा आधी… “चितळ्यांचा संताप अनावर झाला. 
तो माणूस बाहेर पडत नाही हे बघूनचितळ्यांनी शटर ओढले आणि तो माणूस आणि चितळे स्वत: दुकानात कोंडले गेले.
दोन मिनिटांनी आतला वाद वाढला तशी बाहेर गर्दी जमा झाली.गर्दी वाढतच गेली तसे वादही वाढले. मग आतून मारामारीचे,आपटाआपटीचे आवाज ऐकायला येऊ लागले.. काहीतरी फुटल्याचे आवाजआणि माग कुणाचातरी जोरात ओरडण्याचा आवाज…गर्दी अवाक होऊन बघत होती.इतक्यात शटर परत किलकिले झाले आणि तो माणूस जिवाच्या आकांतानेबाहेर पडला आणि पळायला लागला…
मागोमाग चितळे बाहेर आले. चिडलेले, घामेजलेले पण तरीही चेहर्‍यावर एक समाधान घेऊन…” काय झालं हो…?”
गर्दीतून कुणीतरी विचारले.” बाकरवडी पाहिजे होती… आठ वाजल्यानंतर आत आला ..आणि नाही म्हटले तर हातघाईवरच यायला लागला…मग दाखवले चौदावे रत्न… आठ वाजता बाकरवडी मागतो म्हणजे काय…वेळेचे भान आहे की नाही..”" कोण होता हो…?” गर्दीतील उस्तुक प्रेक्षकाने विचारले…” होता कुणीतरी मद्रासचा भामटा … “शिवाजी गायकवाड” म्हणून… “चितळ्यांनी शटर ओढून कुलूप लावले आणि ते घराकडे निघाले…! ;-p ;-p ;-p

No comments:

Post a Comment