Sunday, March 8, 2015

जागतिक महिला दिन साजरा करताय ? तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटुन घेऊ नका.



उद्या कदाचित तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटुन घेऊ नका. कारण ती काहीच चुकीचं विचारत नाही.
विचार करायला लावणारा ,
ह्रदयाला भिडवणारा.......
तिचा फक्त एकच प्रश्न .......
देह माझा ,
हळद तुझ्या नावाची .
हात माझा ,
मेहंदी तुझ्या नावाची .
भांग माझा ,
सिंदूर तुझ्या नावाचा .
माथा माझा ,
बिंदिया तुझ्या नावाची .
नाक माझे ,
नथ तुझ्या नावाची .
गळा माझा ,
मंगळसूत्र तुझ्या नावाचे .
मनगट माझे ,
(बांगड्या) चुडा तुझ्या नावाच्या .
पाय माझे ,
जोडवी तुझ्या नावाची .
आणि हो.....
वडीलधा-यांच्या
पाया मी पडते ,
आणि ......
अखंड सौभाग्यवती भव ।
आशिर्वाद मात्र तुला.
वटपौर्णिमेचे व्रत माझे ,
आयुष्याचे वरदान तुला .
घराची काळजी घ्यायची मी,
दरवाजावर नावाची प्लेट तुझी.
नाव माझे ,
पण त्यापुढे ऒळख तुझी .
इतकच काय .......
ऊदर माझे ,
रक्त माझे ,
दूध माझे,
आणि मुलं ?
मुलं तुझ्या नावाची .
माझं सगळच तर,
तुझ्या नावाचं......
तक्रार नाही ...
प्लिज रागाऊही नकोस,
अत्यंत नम्रपणे
एक प्रश्न विचारतेय..
एवढच सांग.....
तुझ्याकडे  काय आहे का रे,
माझ्या नावाचं ?


°°°आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी°°°
°°°तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी°°°
°°°अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते°°°
°°°स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते°°°
°°°अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का°°°
°°°तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का°°°
°°°कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे°°°
°°°वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे°°°
°°°भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने°°°
°°°स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे°°°
°°°साडी मस्त शोभतीये आज--मनमोकळी दाद दे°°°
°°°सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने°°°
°°°मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे°°°
°°°वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे°°°
°°°वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे°°°
°°°पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे°°°
°°°झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे°°°
°°°जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे°°°
°°°हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे°°°
°°°नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे°°°
°°°अशी काहीशी साथ दे°°°
°°°मित्रत्वाचा हात दे°°°

आज ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतातील महिला ज्यांनी जगभर आपल्या क्षेत्रात भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करून भारतीय महिलांचा ठसा उमटवला त्यापैकी काहींचे कर्तुत्व खालील छायाचित्रामधून देत आहोत. हि सर्व संधर्भ छायाचित्रे MKCL (महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ) यांच्या टीमने त्यांच्या साठी संकलित केलेली आहेत त्याबद्दल MKCL चे धन्यवाद.









या सर्व महिलांना तसेच तमाम स्त्रीत्व आणि त्यांच्या महान कार्याला आमचा मानाचा मुजरा आणि सादर प्रणाम.

No comments:

Post a Comment