सहज गंमत...
बायकांकडून नवऱ्यांना संबोधण्या बाबतचा इतिहास तुम्ही वाचलाच पाहिजे.....
न्या. रानडे यांच्या घरी एकदा कोणी गृहस्थ आले. न्यायमुर्ती घरी आहेत का? विचारलं.
रमाबाई म्हणाल्या, *"खुंटीवर पगडी दिसत नाहीये.”*
त्या माणसाला काही कळलं नाही. त्याने परत विचारलं.
रमाबाई म्हणाल्या, *“जोडेही दिसत नाहियेत."*
तरिही त्याला कळलं नाही त्याने पुन्हा तेच विचारलं.
रमाबाई म्हणाल्या, *"कोपऱ्यात काठीही दिसत नाहिये."*
*ते घरी नाहियेत हे सांगण्याची ही त्या काळची पद्धत झाली.*
नावाने सोडाच पण *"हे"* वगैरे उल्लेखही केला जात नव्हता त्या काळी.
*का. पु. स. (काळ पुढे सरकला)* ..... नवर्याचा उल्लेख *"इकडुन येणं झालं"*, तिकडुन सांगणं झालं *"इकडची स्वारी”* असा होऊ लागला.
मऱ्हाटी शिणुमात *"एक माणुस रागावलंय जणू आमच्यावर"* असा लडिवाळपणा करु लागला.
*का. पु. स.* ..... नवर्याचा उल्लेख *अहो, माझे यजमान, माझे मिस्टर असा होऊ लागला*.
*का. पु. स.* ..... नवर्याला चारचौघांच्यात *अहो*, तर *एकांतात लाजत लाजत अरेतुरे* सुरु झालं.
याशिवाय *खाशा स्वाऱ्या, घरधनी, कारभारी, मालक, पप्पुचे पप्पा, बंटीचे बाबा, अहो नारायण* हा एक समांतर प्रवास चालु होताच .....
*का. पु. स.* ..... नवर्याचा उल्लेख *रितसर नावाने किंवा माझा नवरा* असा होऊ लागला.
*का.पु.स.* ..... नवर्याचा उल्लेख *बंड्या, खंड्या, निल्या, मित्या* असा यायाकारी होऊ लागला.
*का. पु. स* ...... *सिरिअल्स* मधुन आणि कुठे कुठे प्रत्यक्षातही *शोना, बच्चु,पिलु,डार्लिंग, बेब, Hb, हब्बी, हब्बुडी* असा होऊ लागला.
या सगळ्याला मागे टाकील असा एक अति लडिवाळ उल्लेख हल्ली वरचेवर आढळायला लागलाय तो म्हणजे *नवरू* .....
अगदी नारू म्हटल्यासारखं वाटतं आणि, *"नारुचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा"* किंवा *"पाणी गाळा नारू टाळा"* अशा भिंतीवर लिहिलेल्या जाहिराती डोळ्यासमोर तरळायला लागतात.😀
पण सर्वात धडकी भरवणारी हाक म्हणजे.. *अहो..ऐकलत का* याला अजुन तोड नाही.
असा हा नवरे जमातीचा इतिहास.......
🙏🙏
एका माणसाने शेतक-याच्या बायकोला "नवरा घरी आहे का?"
अशी विचारणा केली. बायको रमाबाईंची फॅन.
तिने सांगितले "बैल शेतातून अजून परतला नाही".
☹️😀
भन्नाट आहे हे 😁😁
ReplyDeleteMarathiVarsa हि एक मराठी लोकप्रिय ब्लॉग वेबसाइट आहे. अधिकृत माहिती साठे एकदा आवश्यक भेट द्या
ReplyDelete