Showing posts with label Pune and Paatya. Show all posts
Showing posts with label Pune and Paatya. Show all posts

Thursday, January 29, 2015

१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या

१०१ पुणेरी पाट्या

हा विषय पुण्यातल्या लोकांसाठी नवीन नाही.
दुकान, सोसायटी, हॉटेल, चौक , कट्टा,रिक्षा, ट्रक, एवढेच काय पाया-या चढण्याचा जिना असो कि अगदी सार्वजनिक मुता-ऱ्या व शौचालये वा एखादे घराचा दरवाजा असो. खास पुणेरी तिरकस शैलीतील पाट्या म्हणजे एक संशोधनाचा विषय ठरू शकतो.
पाट्या लिहिण्याची एक खास पुणेरी शैली आहे. पाटीमधून आपल्याला जो संदेश द्यायचा आहे तो तर पुणेकर देतातच पण वाचणा-याला आपल्या तिरकस व खोचक वाक्यामधून विचार करायला लावतात. पुणेकर महानगर पालिकेला सुद्धा पाटीमधून संदेश देत असतात.



अस्वच्छता करणारे , सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे,कचरा टाकणारे, अन्न वाया घालवणारे याबद्दलचा आपला राग पुणेकर पाटीमधून असा व्यक्त करतात.
दुकाने , हॉटेल (माफ करा उपाहारगृहे) ,कार्यालये हे तर पुणेरी पाट्या लावण्याचे खास ठिकाण. पार्किग कुठे व कुणी करू नये, चोकशी कुठे करावी ? करावी कि करू नये ? याचे मार्गदर्शन कारण-या काही पाट्या.
मंगल कार्यालयात येणा-या स्त्रीयांना दागिन्यांची काळजी घेण्याची सूचना देणारी पाटी पुणेकरांची दक्षता दाखवते तर दुसरी पाटी वाड्याच्या जागी इमारती बंधना-या बिल्डरला सज्जड द्मसुद्धा देते.
मोकळ्या जागेत गप्पा मारणारे,नो पार्किंगमध्ये पार्किंग करणारे इतकेच काय पण पत्ता विचारणारे , दुसर-याच्या दारातील पण आपल्या दारात वहाण काढणारे पाहुणे व आपल्याच घरी दुध टाकणारा दुधवालासुद्धा पाटीतून सुटत नाही.
सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणारे, टेनिस कोर्टवर बूट न घालताना खेळणारे, फोटो खराब आला म्हणून तक्रार करणारे, दोघात एक मिसळ खाणारे , गार्डन व मंदिरात कुत्रा घेऊन येणारे हे सर्व पाट्यांचे लक्ष ठरतात.
पुणेरी पाट्या फक्त पेठामधूनच दिसतात असे नाही. कित्येक पुणेरी रिक्शावालेसुधा आपल्या गिराहीकाला हळू गप्पा मारणे ,सुटे पैसे देणे ,अश्लील चाळे न करण्याबद्दल पाटीमधून सुचवत असतात आणि वरून आम्हाला आरशात दिसतेय हे नमूद करायला ते विसरत नाहीत.
पुणेकर महानगर पालिकेला सुद्धा पाटीमधून संदेश देत असतात. मग महापालिकेने रस्ता दुरुस्त केला नाही तर पुणेकर आपल्या भावना पाटीमधून अशी व्यक्त करतात.
पाट्या फक्त राग व्यक्त कारण-याच असतात असे म्हटले तर तो पुणेकरावर अन्याय होईल. कित्येक पाट्या वाहतूक नियम पाळण्यासाठी,व्यसन न करण्यासाठी,पाणी वाचवण्यासाठी संदेश देत असतात. खालची एक पाटी "५ मिसळ घेतल्यास १ Lifeboy साबण फ्री" अशी पाटी लावून पुणेकर स्वाईन फ्लू बद्दल जनजागृती करत असतात. पुण्यात राहून क्रिकेट पहायचे असेल तर पुणे वोरीयार्सलाच सपोर्ट करावा लागेल यात पुणेरीपणा आहे पण त्याचबरोबर गुटखा खाण्याच्या भव्य स्पर्धा भरवणारे पुणेकर स्पर्धेत भाग घेणा-याला मोफत नपुसंकत्व देतात यात खोचक मिश्किलपणाच नाही का? 
पुणेकर आपल्या भावना पाटीमधून व्यक्त करत होते....करतात... आणि....करत राहतील !!!! एका पुणेकरांचा या पुणेरी स्पिरिटला सलाम.

या पोस्टच्या निमित्ताने आमचीही एक पाटी :

या पोस्टमधील सर्व पाट्या ठिकठिकाणाहून जमा करण्याचा खटाटोप मी केलेला नाही. इंटरनेटवर हे सर्व मिळते फक्त शोधण्याचा त्रास घ्यावा लागतो. आम्ही हा उद्योग का केला असा प्रश्न पुण्याबाहेरच्या लोकांना पडत असेल म्हणून नमूद करतो. Marathi Paatya.com हि साईट पुन्हा क्षमस्व: (संकेतस्थळ) काही वर्षापूर्वी खास पुणेरी पाट्या साठी बनवले होते त्याला खूप प्रसिद्धी पण मिळाली होती. पण माहित नाही का ते सध्या बंद असलेले आढळले म्हणून हा उद्योग.
या पोस्टमध्ये असलेल्या पाट्यांवर आम्ही कुठलाही हक्क सांगत नाही ज्यांच्या असतील त्यांनी आपला हक्क सांगितला तरी चालेल. पुणेरी पाट्यांचा वारसा असाच पुढे चालत राहो हि सदिच्छा...

ता.क. : खाली दिलेले Comment चे Boxes शोभेसाठी नसून...आता खालपर्यंत वाचलेच आहे तर कमेंट करावी म्हणून आहे.