Wednesday, July 10, 2013

बोलक्या रेषा (Bolkya Resha)






















समजत नाही कि मी घडलो कि बिघडलो

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो
तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो
पैसा हीच शक्ती समजून ईश्वरभक्ती विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

...
सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो
सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो
भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

धन जमा करताना समाधान विसरलो
तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो
परिक्षार्थी शिक्षणात हाताचे कौशल्य विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो


टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो
जाहिरातीच्या मार्यामुळे चागलं निवडणं विसरलो
गाडी आल्यापासून चालणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो
कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो
संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

संकरीत खाल्यामुळे पदार्थांची चव विसरलो
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो
.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

परफ्युमचा वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो
चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो
जगाचा भूगोलात गावाचा इतिहास विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

बटबटीत प्रदर्शनात सौंदर्याचे दर्शन विसरलो
रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो
मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो

स्वतःमध्ये मग्न राहून दुस-‍याच्या विचार विसरलो
सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो
जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो
समजत नाही की मी घडलो की बिघडलो.

Wednesday, June 19, 2013

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते, कधी विचार करायला लावणारे असते.

'मेरा भारत महान'

"बघतोस काय ? मुजरा कर .....! "

बघतोस काय रागाने, ........ ओव्हरटेक केलय वाघाने!

"बघ, .... माझी आठवण येते का ?"

''पाहतेस काय प्रेमात पडशिल''

साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.

अं हं. घाई करायची नाही. !!!!!!!!

तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही

"गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?"

'तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'

'अहो, इकडे पण बघा ना...'

"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".

थांब लक्षुमी कुंकू लावते!

तुमचे लक्ष आमच्याकडे का?

"लायनीत घे ना भौ"

चिटके तो फटके!

राजे तुम्हि पुन्हा जन्माला या

अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल,फ्रिमॉन्ट्,हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.

१३ १३ १३ सुरूर !

"नाद खुळा"

"हाय हे असं हाय बग"

"सासरेबुवांची कृपा "

"आबा कावत्यात!"

पाहा पन प्रेमाणे

नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.

"हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"

अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.

हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...

योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..

वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

हेही दिवस जातील

नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा

घर कब आओगे?

१ १३ ६ रा

हॉर्न . ओके. प्लीज

"भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"

एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)
तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं
माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं
याचा विचार करून गाडी चालवा

एका ट्रक च्या मागे लिहले होते: राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !

एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " आणि खाली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)

एका टेम्पोच्या मागे..
आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद!

Wednesday, June 12, 2013

मोठी माणसे म्हणतात.....

1)जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत. - नारायण मूर्ती

2)यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणारनाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय. -- विश्‍वनाथन आनंद

 3)नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्‍य आहे.** * -- धीरूभाई अंबानी

 4)पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवलातर वाढायला मदत करतो. * -- जे. आर. डी. टाटा

 5)फोटोग्राफरच्य­ ­ा एका"क्‍लिक'मुळे­ जगणे चिरकाल होते.*** -- रघू राय

6)चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.* - बिल गेट्‌स

7)मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. * - कल्पना चावला

8)कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.* -- बराक ओबामा

9)माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याचीतयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच. -- आयझॅक न्यूटन

10)मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा"माणूस' होणे; हे त्याचे यश आहे. -- सर्वपल्ली राधाकृष्णन*

Tuesday, April 23, 2013

Navra Bayko