Friday, December 13, 2013

दहावी पेपर- कारणे द्या

प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या;
गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ
त्याच्याशी गप्पा मारतो , म्हणून.
------------------------------------------
प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४ ओळीत) माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते.
त्यांचे नाव तुकाराम होते.
लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.
------------------------------------------
प्रश्न - कारणे द्या;
उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते.
उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो,
तर थंडीत त्याउलट लहान होतो.
------------------------------------------
प्रश्न- खालील बाबतीत काय होईल ते सांगा-
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास!
उत्तर- ग्लास काळा होईल.
------------------------------------------
प्रश्न- मराठीत भाषांतर करा.
चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
उत्तर -चिमण्या झाडावर चहा पितात.....
------------------------------------------
धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!

संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ
या ओळिचा अर्थ काय ?
.
.
.
.
.
.
बंड्या : तु झोपुन जा आई,
मी ज्योती च्या घरी जात आहे....
.
संस्कृत चे शिक्षक कोमात
बंड्या आपला जोमात...

Saturday, November 30, 2013

एक शिकवण !



एका गाढवाची गोष्ट

एका गाढवाची गोष्ट

'का, गाढवीणबाई? अशा खिन्न का?'

'काय सांगू बाई तुला? आमच्या जोडीदार गाढवांची हकीकत कळली नाही का तुला?'

'त्या भयंकर लाथाळीची ना?' शेपूट वेळावीत गाढवीण म्हणाली.

'हो!' कुठल्याशा अध्यक्षीणबाईच्या गळयात पडलेला सुकलेला हार खुराने उडवीत पहिली गाढवीण म्हणाली. 'खरं सांगू का तुला?' 'काय?' 'हा लाथाळीचं कारण मला ठाऊक आहे. पण म्हटलं, उगीच दुसऱ्यांच्या भानगडीत आपण का पडा?' 'काय ते?' कानांना नाजुक हिसडा देत गाढवीण म्हणाली. तिच्या काळयाशार नाकपुडया थरथरत होत्या. 'विचारलंस तर सांगते बापडी! परवा काय झालं, मी आणि नाम्या कुंभाराची गाढवीण चरायला निघालो होतो. मी आपली नेहमी इथे भगिनी-समाजापुढे चरायला येते. इथे पुष्कळ अहवाल, भाषणं, प्रसिद्ध महिलांचे संदेश, वगैरे खायला मिळतात. आणि मागच्या खेपेपासून मला ही वर्तमानपत्रं पचेनाशी झाली आहेत. पण नाम्या कुंभाराच्या गाढवीणीनं आग्रह केला म्हणून वाचनालयापुढचा उकिरडा फुंकायला गेले मी! तिथे तुझे ते दोन गाढव आले होते. आणि कुणाला सांगू नकोस, पण दोघांनीही दोन निरनिराळ्या संपादकांची साप्ताहिकं खाल्ली. तेव्हापासून तिथेच त्यांची लाथाळी सुरु झाली... मागे एकदा त्या एका गाढवाने कसला मजूर पुढाऱ्याच्या भाषणाचा कागद खाल्ला होता, तेव्हा तो त्याच्या कुंभारालाच लाथा मारायला लागला होता.

'पण याला उपाय काय बाई?'

'अगं, सोपा आहे. गावात तो सिनेमा आहे ना तिथे नटींची चित्रं छापलेल्या जाहिराती वाटतात. पाच-पाच जाहिराती सकाळ- संध्याकाळ खायला घाल त्यांना. लगेच गप्प होतात की नाही पाहा.' असे म्हणून दुसरी गाढवीण 'महिला आणि क्रांती'तले उरलेले भाषण खाऊ लागली. पहिली गाढवीण सिनेमाच्या रस्त्याने धावू लागली.

'तिच्या धावण्यात एक मुक्त आनंदाचा अटूट आविष्कार होता' असे वाङमयमंदिरापुढे उभा असलेला एक गाढव नंतर कोणालासे सांगत होता.

..(-उरलंसुरलं)

Sunday, November 24, 2013

तुम्हाला पुणेकर व्हायचं का?

 PU. LA. The Great !!!!
तुम्हाला पुणेकर व्हायचं का?

...आता तुम्हाला पुणेकर व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही. पण मुख्य सल्ला असा, की पुन्हा विचार करा अगदी आग्रहच असेल, तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे, आणि एकदा तयारी झाली, की त्या सारखी मजा नाही ,तुम्हाला सांगतो.


पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक बाबतीमध्ये मतभेद व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो. म्हणजे आता "अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" या विषयावरती, आपण स्वतः पुणे महानगरपालिकेत, उंदीर मारायच्या विभागात आहोत नोकरीला, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे.अमेरिकेची आर्थिक आघाडी- ठोका.


दिवसातून एकदा तरी "चक चक पूर्वीचे पुणं राहिलं नाही, पूर्वीचे पुणं राहिलं नाही" हे म्हणायलाच पाहिजे. हे वाक्य म्हणायला वयाची अट नाही. इथे म्हणजे दहा वर्षाचा मुलगा सुद्धा चाळीशीच्या अनुभवाचे गाठोडं असल्यासारखं ते चारचौघांपुढे उघडत असतो. त्यामुळे "च्यायला, आमच्या वेळी हे असलं नव्हतं" हे वाक्य कॉलेज, कचेरी, ओमकारेश्वर, पेनशनर मारुतीची टेकडी, मंडई आणि शिशुविहार, कुठेही ऐकायला मिळेल, "आमच्या वेळी ते तसा नव्हतं!"


You can read complete article HERE

Sunday, November 3, 2013

इंटरव्यू : नसेल घ्यायचे तर नाहीच घेणार

External-एका विमानात ५० विटा असतात,
जर तु एक विट काढुन फेकली तर किती विटा राहतील..??
.
.
Student: सोप्प आहे ४९ विटा राहणार सर..
.
External: अगदि बरोबर आता मला साँग जर मला हत्ती फ्रिजमध्ये ठेवायचा आहे ३
स्टेपमध्ये तर कसा ठेवु..??
.
.
Student : फ्रिज उघडायचं,
हत्ती आत टाकायच आणि फ्रिजच दार बँद करायचं..
.
External: योग्य उत्तर ..
आता मला फ्रिजमध्ये हरीण ठेवायचा आहे ते पण फक्त ४ स्टेपमध्ये.. तर कसा ठेवणार
.
.
Student.- फ्रिजच दार ऊघडा, हत्ती बाहेर काढा, हरीण आत ठेवा,
आणि फ्रिजच दार लावा सर..
.
.
Ext- सिँहाचा वाढदिवसाची पार्टी असते, सगळे प्राणि येतात बरं..
पण एक प्राणी का येत नाही..??
.
.
Student- : कारण तो एक प्राणी हरीण असतो जो फ्रिजमध्ये असतो
.
ext: एका वृध्द बाईला एक नदी पोहुन पार करायची असते,
पण ती नदी नेहमी मगर मच्छने पुर्ण भरलेली असते तर ती नदी कशी पार
करणार..??
.
.
Student- ती वृध्द बाई पोहुनच नदी पार करणार कारण सगळे प्राणि पार्टीला गेलेले असतात सर..
.
.
exter-: अतिउत्तम .. माझा शेवटचा प्रश्न आहे की , नदी पार करुन पण
ती बाई मरते , कस काय..?

Student -(गोँधळुन -): Hmmm,
सर मला वाटत तिला हार्ट अँटक आला असेल..

External - नाही ! चुकल उत्तर, तिचा डोक्यात ती विट पडते जी विमानातुन
फेकलेली असते.... आता तु जाऊ शकतोस..!!
.
Moral :
तुम्ही हवी तेवढी तयारी करा पण एकदा जर external ने मारायची ठरवली तर
तो मारतोच...
 नसेल घ्यायचे तर नाहीच घेणार....