मी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more
Thursday, December 19, 2013
हल्लीची तरुण मुलं
फुल टू धमाल
वडील अडाणी असतात
आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent)
उभारतात आणि त्यात झोपी जातात.
काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात
वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय
दिसतंय..?
मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.
वडील: ते तुला काय सांगत आहेत?
मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात
कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत
कि आपला तंबू चोरीला गेला..
( शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो)
Friday, December 13, 2013
हे साले मित्र सगळे असेच असतात
चिडवून सतावून जीव नकोसा करतात, तरीही नेहमी हवेसेच वाटतात.
हे साले मित्र सगळे असेच असतात....
पण... एखाद्या दिवशी डबा नाही आणला, तरी आपलेच ताट इतरांपेक्षा जास्त भरते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...
तीन में पाँच - बिस्किट के ल चहाची अशी ओर्डर सुटते, बिल भरण्याची वेळ आली कि सर्वांचीच पांगा पांग होते ,
मात्र अचानक कधी बाबाना admit करावे लागते, आहोत आम्ही पाठीशी म्हणत advance नकळत भरले जाते.
हे साले मित्र सगळे असेच असतात ...
हे साले मित्र सगळे असेच असतात, चिडवून सतावून जीव नकोसा करतात, तरीही नेहमी हवेसेच वाटतात.
दहावी पेपर- कारणे द्या
प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या;
गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ
त्याच्याशी गप्पा मारतो , म्हणून.
------------------------------------------
प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४ ओळीत) माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते.
त्यांचे नाव तुकाराम होते.
लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.
------------------------------------------
प्रश्न - कारणे द्या;
उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते.
उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो,
तर थंडीत त्याउलट लहान होतो.
------------------------------------------
प्रश्न- खालील बाबतीत काय होईल ते सांगा-
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास!
उत्तर- ग्लास काळा होईल.
------------------------------------------
प्रश्न- मराठीत भाषांतर करा.
चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
उत्तर -चिमण्या झाडावर चहा पितात.....
------------------------------------------
धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!
संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ
या ओळिचा अर्थ काय ?
.
.
.
.
.
.
बंड्या : तु झोपुन जा आई,
मी ज्योती च्या घरी जात आहे....
.
संस्कृत चे शिक्षक कोमात
बंड्या आपला जोमात...