मुलीच्या गालावर प्रेमाने गुलाब मारल्यावर :-
English Girl :-"Darling YouAre So Naughty!!
उर्दू :- नहीं करो जानू...
सिख :- तुसी बडे रोमँटिक हो.... . . .
मराठमोळी मुलगी:-अबे रताळ्या डोळ्यात गेलं असतं ना. . . .
जुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत असत
कोणीतरी..
पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असत
कोणीतरी..
कोणालातरी हसतांना लपुन बघत असत
कोणीतरी..
दिवे सगळे विझल्यावर का जळत असत
कोणीतरी..
सगळ जग झोपेत
असतांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत
असत कोणीतरी..
कुणी येणार नाही तरी वाट बघत असत
कोणीतरी..
माणसांच्या या इतक्या गर्दीत का एकट असत
कोणीतरी.
/////
बंड्या : अरे लग्नानंतर तुझं दारू पिणं वाढलं कसं?
गण्या : काय करणार, माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बायकोचा आग्रह.
बंड्या : काय सांगतोस काय!
गण्या : मग काय… सकाळ संध्याकाळ तीचं आपलं एकच पालुपद… दारू-सोडा, दारू-सोडा.
मग काय करणार, तिच्या समाधानासाठी दारू-सोडा घेऊन बसावंच लागायचं ना
फिल्म करायला उजेड पाहिजे,
फिल्म बघायला अंधार पाहिजे,
"प्रेम"करायला दम पाहीजे
आणी"तुमच्या साठी काय पण"
म्हनायला देवयानी सारखी बायको पाहिजे
///////////
बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.
राजु : हो बाबा.
बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?
राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना.
त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल.
म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे....
एका झाडा खाली पोपट वाघ आणि डुक्कर राहत होते..
त्यांची खूप मैत्री होती, ते एक मेका शिवाय राहू शकत नव्हते.. .
एके दिवशी वादळ आल, आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडले..
.
आणि या प्रसंगा मध्ये पोपट मरण पावले. .
आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ आजारी पडला आणि त्या आजारात
त्याचा मृत्यू झाला.
.
.
आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे डुक्कर सुद्धा त्या परीस्तीतीत जिवंत
राहू शकत नव्हता, आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी आपले प्राण सोडले...
.
.
खूप दिवसांनी ज्या ठिकाणी पोपट वाघ आणि डुक्कर मरण पावले होते
त्या ठिकाणी एक'मोहाचे' ( 'मव्हाचे') झाड रुजू लागले...
.
पुढे मव्हाच्या झाडापासून मानवाने''दारू'' बनवली.
..
..
आणि म्हणूनच ज्या वेळी माणूस दारू पितो त्यावेळी
पहिला त्याचा पोपट होतो..
आणि पोपटा सारख बोलू लागतो...
.
थोड्या वेळाने तो वाघ होतो..
आणि कुणालाही न घबराता तो वाट्टेल ते बोलू लागतो, कुणाचेच ऐकत नाही.. .
.
सरते शेवटी त्याचा डुक्कर होतो.
आणि मग ज्या प्रमाणे डुक्कर लोळतो.. त्याच प्रमाणे तो रस्तावर, गटारात लोळतो.......
प्रेमभंग झाल्यावर न चुकता करायचे “प्रेमभंग
व्रत”
माझ्या मित्रांनो हे व्रत खाली दिल्या प्रमाणे
करायचं…
१. पहिली गोष्ट म्हणजे
तुमचा चेहरा नेहमी बारा वाजल्यासारखा ठेवायचा..म्हण
जे चहा/ सिगरेट चा खर्च मित्रच करतात..!
२.पंधरा दिवस दाढी करू नये…
दुखः दाखवण्याचा हा एक हुकमी उपाय आहे..!
३. शक्य तोवर आंघोळ करू नये,अन् केस तर विंचरू
नयेच चांगला इफेक्ट होतो..!
४. हिंदी गम
च्या गाण्याच्या सीडी ऐकाव्यात ..गझल वैगरे
मस्त मोहोल क्रिएट करतात..!
५.अधून मधून दर्द भारी शायरी सांगायची व
विनाकारण आभाळाकडे बघायचं म्हणजे डोळ्यात
पाणी पण येत..!
६. आणी शेवटी तिच लग्न असेल
त्या दिवशी थोडी घेवून व मित्रांना पाजून
या व्रताची सांगता करावी..!
“हे व्रत थोडं कठीण आहे पण केल्यास नक्कीच
फायदा होतो व पुढच प्रेम लवकर पदरात पडत…!”
जर हे चित्रपट
मराठी मध्ये dubbed केले तर,
यांची नावे काय असतील..?
वाचा..
KUCH KUCH HOTA HAI..
कसतरी होतेय!
HOLLOW MAN..
पोकळ माणुस!
DIE ANOTHER DAY..
नंतर कधीतरी मर!
GONE WITH THE WIND..
गेला उडत!!
SUPERMAN..
लई भारी माणुस!!
SCORPION KING..
तात्या विँचु!
THE MUMMY RETURNS..
आई परत आली!
MISSION IMPOSSIBLE..
नाही जमत!
MISSION IMPOSSIBLE 2..
एकदा सांगितला ना नाही जमत!
MAN IN BLACK..
काळे माणसं!
MAN IN BLACK 2..
एकदम काळे माणसं!
पप्पा - आज चिकन आणलाय पण लिंबू नाही
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या- जाऊ द्या न आता..नवीन विम बर
आलाय त्यात १०० लिम्बांची शक्ती आहे तेच
टाका दोन थेंब...
गण्या - मैत्री करणार काय ?
.
.
.
चिंगी - माझे पप्पा परवानगी देणार नाही.
.
.
गण्या - वा लय भारी ...
जसे माझ्या पप्पा ने मला पोरी पटवण्याचा लायसन काढून दिलाय..
दिनू आणी प्रेयसी दोघे 'झेड ब्रिज' वर बसलेले असतात.
प्रेयसी: दारू पिल्यावर ना, तू खूप हंड्सम दिसतो रे...
दिनू : हो खरंच.? पण मी तर आज पिवून नाही आलोय..!
...
प्रेयसी: गप् ए शेंबड्या...मी तर पिवून आलेय ना....!
चम्प्या :- आई मी कसा जन्मलो..? .
आई :- अरे मी एका पातेल्यात एक फुल ठेवलं .. काही दिवसात त्यापासून तू बनलास..! .
चम्प्याने पण एका पातेल्यात फुल ठेवलं आणि काही दिवसात बघतो टर त्यात एक बेडूक..
चम्प्या च्या बेडुक कडे बघुन म्हणतो... . .
"असं वाटतंय कि तुला आताच चिरडून टाकावं... पण काय करणार.. मुलगा आहेसतू माझा..!!!"
लोक म्हणतात प्रेमात खूप त्रास होतो.
.
.
.
.
.
.
.
.
.
च्यायला, त्यांच्या तोंडावर ENGINEERING चे
पुस्तकं फेका आणि अभ्यास करायला सांगा..
मग कळेल खरा त्रास केंव्हा होतो..!!
एक गर्भारशी (प्रेगनंट)बाई पुरुष डॉक्टर कडे
जाते.
.
.
डॉक्टर : काय बाई, कितवा महिना?
.
.
बाई (लाजून) : इश्य...!!!, आठवा.
.
.
.
.
.
.
डॉक्टर (आणखी लाजून) : अहो, मी कसा आठवू?
तुम्हीच आठवा..!
शंभराच्या पाच नोटानोकर-
‘साहेब मला केराच्या टोपलीत
शंभराच्या पाचनोटा सापडल्या,
हे घ्या.
’मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या,
नकली नोटा आहेत त्या’
_
_
_
_
नोकर – ‘म्हणूनच परत करीत आहे.
झंप्या : आपल्या दातांचं रक्षण कोण करत?
डेँटीस्ट : कोलगेट
झंप्या : कशी ??
डेँटीस्ट : ते आपल्या दातांना किडन्यापासून वाचवत.
झंप्या : (डोके खाजवून ) पण किडन्या तर पोटात
असतात ना....
पेन म्हणतो पेन्सिल ला मी तुझ्यावर प्रेम
करतो .....
पेन म्हणतो पेन्सिल ला मी तुझ्यावर प्रेम
करतो .....
.
.
.
.
.
पेन्सिल म्हणते पेन ला माझ्या वर प्रेम करतोस मग
.
.
.
.
.
.
.
.
.
वहीवर का लाईन मारतोस...
चम्या एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या - अबे एक तास झाला..
जेवतो येस तू..
अजून किती चरशील?
चम्या - अबे मी पण परेशान झालोय..
अजून तीन तास जेवायचंय..
झंप्या - ३ तास?
चम्या - हि बघ पत्रिका..
जेवणाची वेळ...
७ ते ११
शिक्षक :
या जगात जर कोणतीही व्यक्ती ते काम करू शकते
तर ते तुम्ही केले पाहिजे
आणि जर या जगात कोणत्याही व्यक्ती ला ते काम
जमत नसेल तर ते तुम्ही केले पाहिजे .
मी :
या जगात जर कोणतीही व्यक्ती ते काम करू शकते
तर ते त्यालाच करू द्या
आणि जर या जगात कोणत्याही व्यक्ती ला ते काम
जमत नसेल तर मी का करू?
मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग
कोणाचा येतो?????
(बंड्या उठला आणि म्हणाला)
बंड्या : राजाराम मोहनरॉय....
मास्तर : का रे बंड्या ????
बंड्या : कारण, त्यांनी 'बालविवाह' बंद केला.....
त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज
आम्ही जोडीने शाळेत आलो असतो
एक पोल्ट्रीफार्म ऑफिसर जवळ जवळ असलेल्या ३ पोल्ट्रीफार्म वर इन्सपेक्शन करायला जातो....!!!
ऑफिसर : तुम्ही कोंबड्यांना काय खाद्य देता??
मालक : बाजरी....
ऑफिसर : चुकीचं खाद्य देता तुम्ही...अटक करा यांना..!!
.
.
दुसर्या मालकाला ऑफिसर विचारतो : तुम्ही कोंबड्यांना काय खाद्य देता??
मालक : तांदूळ
ऑफिसर : चुकीचं खाद्य देता तुम्ही...अटक करा यांना..!!
.
.
शेजारी मक्या उभा असतो, ऑफिसर तिथे जातो आणि त्याला पण विचारतो;
ऑफिसर : तुम्ही कोंबड्यांना काय खाद्य देता??
मक्या : मी तर कोंबड्यांना ५-५ रुपय देतो आणि सांगतो जे आवडेल ते खा...
खि...खि....खि...खि...
( पाटलांचा मुलगा मुंबईला शिकायला गेल आणि तिकडून त्याने रात्री बापाला e-mail केला। )
" ति. बाबा,
शि. सा. न.
मी इकडे खुप छान आहे. काळजी नसावी।
मला फ़क्त वाईट वाटते की माझे सर्व मित्र, शिक्षक लोकल ट्रेन ने येतात व
मी माज्या नविन स्कार्पियो(Diesel) मधून येतो।"
( सकाळी बाबांचा मेल आला होता )
"प्रिय बाब्या,
फार वाईट वाटते की सर्व मित्र, शिक्षक लोकल ट्रेन ने येतातव तू स्कार्पियो मधून येतो मी आजच तुला पैसे पाठवतो, तू पण लोकल ट्रेन घेउन टाक.
कुठे कमी पडायच नाय "