Wednesday, March 12, 2014

Monday, March 10, 2014

वपुर्झा - व. पु. काळे (Vapurza by V. P. Kale)

Vapurza - V.P.Kale (Va. Pu. Kale)

मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही
बारीक असतात,
पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..!
तुटले तर श्वासानेही तुटतील,
नाहीतर वज्राघातेनेही तुटणार
नाहीत..!!
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
संवाद दोनच माणसांचा होतो,
त्याच्यात तिसरा माणूस आला
की त्या गप्पा होतात..!!
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असत
कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..!
म्हणूनच खडक झिजतात
प्रवाह रुंदावत जातो..!!
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
जाळायला काही नसलं तर
पेटलेली काडीसुद्धा अपोआप
विझते..!!
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
खर्च झाल्याच दु:ख नसतं,
हिशोब लागला नाही की त्रास
होतो..!!
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते
शेवटपर्यंत असतात..!
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर हे असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा
असतो, कधी पैसा तर कधी
माणस..!
या तिन्ही गोष्टी पलीकडचा
प्रोब्लेम
अस्तित्वातच नसतो..!!
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
आठवणी या मुंग्यांच्या
वारुळाप्रमाणे असतात..!
वारूळ पाहून आतमध्ये किती
मुंग्या असतील याचा अदमास
घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की
एकामागोमाग असंख्य मुंग्या
बाहेर पडतात. आठवणींचही
तसंच आहे..!!
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी
घाबरलेला असतो, बरा झाल्यावर
शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

Sunday, March 9, 2014

राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली?


राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली? भारतातील प्रत्येक भाषेतील , प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा छापलेली असते. पण आजवर ती कुणी लिहिली , तेच ठाऊक नव्हते. अगदी पाठ्यपुस्तक मंडळालादेखील. परंतु गेल्या वर्षी या प्रतिज्ञेच्या कर्त्याचे नाव अचानक उजेडात आले. त्याची शोधकथा... देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एकसमान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते. अनेक वर्षांपासून आपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत असतो. परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ? कधी लिहिली ? ती केव्हापासून देशभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली , याची माहिती जवळपास कोणालाच दिसत नाही. मीही ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणत आलो. 


बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा धडा किंवा कविता वाचली की , त्या पाठाखाली किंवा धड्याखाली त्या-त्या लेखकाचे , कवीचे नाव दिलेले असते. त्यामुळे मला बालपणापासूनच पाठ्यपुस्तकातली ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल , असा प्रश्न पडला होता. मला शिकविणाऱ्या प्रत्येक वर्गातील शिक्षकाला मी हा प्रश्न विचारीत असे. परंतु कुणीच मला उत्तर देऊ शकले नाही. पुढे बऱ्याच शिक्षणाधिकाऱ्यांना , विद्वानांना , पाठ्यपुस्तक मंडळातील तज्ज्ञांना , शिक्षणमंत्री , साहित्यिक , लेखक , अ. भा. मराठी साहित्य महामंडळावरील सदस्य , तसेच जवळपास प्रत्येक शिक्षणतज्ज्ञाला या प्रश्नाचे उत्तर विचारले. सगळीकडूनच नकारघंटा आली. काहींनी सानेगुरुजी , यदुनाथ थत्ते असावेत असे सांगितले. पण समग्र सानेगुरुजी वाचल्यावरही संदर्भ लागला नाही. यदुनाथ थत्तेंनी या प्रतिज्ञेच्या आठ वाक्यांचा सविस्तर अर्थ विशद करणारे ' प्रतिज्ञा ' नावाचे पुस्तकच लिहिले आहे. या पुस्तकातही या प्रतिज्ञेच्या लेखकाचा कुठे उल्लेख आढळला नाही. पाठ्यपुस्तक मंडळातील काही व्यक्तींनी सुचविले की , ती केव्हापासून पाठ्यपुस्तकात आली , याचा आमच्याकडे संदर्भच नाही. त्यामुळे ती कदाचित पाठ्यपुस्तक मंडळानेच कधीतरी मनात आले म्हणून तयार करून छापली असेल व पुढे तिचा हिंदी व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाला असेल! परंतु प्रत्यक्ष शोधानंतर ते तसे नसल्याचे सिद्ध झाले. ' भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत... ' ही प्रतिज्ञा भारतीय पातळीवर प्रत्येक राज्याच्या राजभाषेत भाषांतरित झालेली आहे. भारतात लिपी असणाऱ्या सर्व भाषांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ती दिसते. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून मी या प्रतिज्ञेच्या जनकाचा प्रश्नाचा शोध घेत होतो आणि शेवटी एकदाचा त्याच्या उगमापर्यंत पोहोचलो! आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये तेलगू भाषेत ही प्रतिज्ञा पहिल्यांदा लिहिली. परंतु त्यांचा नामोल्लेखही पाठ्यपुस्तकात कुठे आढळत नाही , याची खंत वाटते. आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावच्या पेदेमरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत , तेलगू , इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते. ते नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ म्हणूनही परिचित होते. याचबरोबर विशाखापट्टणम् जिल्ह्याचे अनेक वर्षं ते जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांची ' कालाभरवाहू ' नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले , स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये लिहिली. त्यांच्या शिक्षण खात्यातील एका मित्राला ही कल्पना खूपच आवडली. त्याने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी. व्ही. जी. राजू यांना ही प्रतिज्ञा दाखविली. शिक्षणमंत्र्यांनाही ती आवडली आणि त्यांनी ती शाळाशाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील शिक्षणखाते कार्य करीत असते. या खात्याच्या वतीने शिक्षणामध्ये सातत्याने नवनव्या सुधारणा सुचविल्या जातात. यासाठी ' डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया ' या समितीची स्थापना केलेली आहे. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतात. या डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडियाची ३१वी सभा तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री एम. सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली ११-१२ ऑक्टोबर १९६४ला बेंगळुरू येथे झाली होती. या मिटिंगच्या वृत्तांतामध्ये (डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया - ए हिस्टॉरिकल सर्व्हे ऑफ एज्युकेशन डॉक्युमेंट बिफोर अॅण्ड आफ्टर इंडिपेन्डन्ट - या पुस्तकाच्या पान १४० वर) मुद्दा क्र. १८ मध्ये उल्लेख आढळतो की , विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित जागृत राहण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार शाळा-महाविद्यालयांमध्ये , तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी. याला अनसुरूनच पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली India is My Country, All Indians are my brothers & sisters... ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला व पुढे असेही सूचित करण्यात आले की , ही प्रतिज्ञा देशपातळीवर २६ जानेवारी १९६५ पासून लागू करावी. या प्रतिज्ञेचा देशपातळीवरील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आणि १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. तसंच , या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता , तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये प्रथम तेलगू भाषेत लिहिली होती. 
२६ जानेवारी २०१२ला या प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव सुब्बारावांच्या मित्र परिवाराने साजरा केला. तेव्हा ' टाइम्स ऑफ इंडिया ' आणि दैनिक ' हिंदू ' या इंग्रजी वृत्तपत्रांत त्याविषयीची छोटीशी बातमी प्रकाशित झाली. या बातमीमुळेच माझ्यासारख्या आजच्या पिढीतील अनेकांना आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा खरा लेखक कोण , याची माहिती मिळाली. 
आपले राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जसे अनुक्रमे रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जाते. तशीच ही राष्ट्रीय प्रतिज्ञाही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जायला हवी. सुब्बारावांचे नाव या राष्ट्रीय प्रतिज्ञेशी जोडले जायला हवे. कारण प्रतिज्ञेचा जो आशय आहे , जे विचार आहेत ते प्रचंड विवेकवादी , समतावादी , एकात्म समाज घडविण्याचा वस्तुपाठ दर्शवितात. हा राष्ट्रीय प्रतिभेचा अमूल्य वारसा या प्रतिज्ञेच्या माध्यमातून भविष्यातही भावी पिढ्यांसाठी आपण जतन करणार आहोतच. यासाठी तरी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या प्रतिभेचा सम्मान म्हणून या प्रतिज्ञेच्या खाली त्यांची नाममुद्रा असणे गरजेचे वाटते , म्हणजे भविष्यात आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा लेखक कोण ? हा प्रश्न इतरांना पडणार नाही. याचे उत्तर प्रत्येक भारतीय नागरिकाजवळ असेल.

Friday, February 28, 2014

निवड - परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत : एक अप्रतिम सुन्दर लेख

CHOICE : A Nice Marathi Moral Story

निवड...
एक अप्रतिम सुन्दर लेख....प्रत्येकाने जरुर वाचावा असा.......कृपा करून वेळ
काढून वाचा.. आवडल्यास शेअर करावा.
शाळेने पत्रक काढलं,' यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक
मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे
ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल !
आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे,
खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक
विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री
केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात .
गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण
गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. तीन - चार दिवस नुसता अंदाज
बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे ;पण लहान
मुलांमधे अडचणीचं .शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची
आणि गाडीनेच घरी जायची.
मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना
विचारलं ," मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?"
क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले," सर आपल्या वर्गातला तो
मयूर आहे नं, तो सर्वात गरीब आहे."
मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता.
"कशावरून म्हणता?"
" सर. त्याचा सदरा दोन- तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय. त्याने शिवलाय; पण फ़ाटलेला
शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा
, मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही
डबा उघडतो . तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो.सर,ती भाकरीही
कालचीच असते.भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब
आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी ."
मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली . पण मला ते ऐकू येणे
शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले
द्यावेत? कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं
होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही
मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं,
" पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर.असं अक्षर असावं हे माझे स्वप्न
होते.उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि
अखेर करून लिहिलेली उत्तरे........." चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत
यॆई.
माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे
.
असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये,
या गोष्टीचीच मला खंत वाटली .जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि
मला त्याचा पत्ताही नसतो......अरेरे!..., मी खूप कमी पडतोय. मयूर , गेल्या सहलीला
आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती ; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण
त्याला साधं विचारलंसुद्धा नाही.
असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ
पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला
मुकला होता तो.
हा आनंद मी हिरावला होता.यादीत मयूरचे
नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच
नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!
शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं
नाव.
आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी.आता शंकाच नव्हती.त्याची गरीबी
बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले
नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन
टाकले
'मयूर जाधव, सातवी अ,अनुक्रमांक बेचाळीस'
डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले,
" खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची
फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश...इत्यादी सर्व या रकमेत सामावणार
आहे."
मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं,
" सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं
तर-मयूर जाधवच आहे!"
एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो.मयूरला मिळणारी
मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे
रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही.
दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो.
देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता.त्यावर 'गरीब
असूनही आदर्श ' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो
होतो .इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला.
त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता.
राग आवरावा तसा करारी चेहरा...
" सर, रागवू नका; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका."
" अरे, काय बोलतोयस तुला समजतय का?"
" चुकतही असेन मी . वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव...!!"
त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा
,डोळ्यातलं पाणी......मला कशाचाच काही अर्थ लागेना.मी ज्याचं अभिनंदन करायच्या
तयारीत,तो असा.....?
" सर,मला मदत कशासाठी? गरीब म्हणून?
मी तर श्रीमंत आहे."
त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती.येतानाच त्याचे अनवाणी
पाय पाहिले होते.शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत
प्रथमच आली होती.
"अरे पण....?"
"सर,विश्वास ठेवा.मी श्रीमंत आहे.कदाचित सर्वात श्रीमंत असेन...सर,मी गरीब
आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले
तर मी आजारी पडेन आज."
अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो,
" ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत,नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे
काय?"
" सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा,
कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत.पुस्तकं मी Second Hand वापरतोय
...खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना?
मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का? सर,माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी
पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे
मलाच आहेत.सर...सर,सांगा ना,मी गरीब कसा?"
मयूर मलाच विचारत होताआता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न
थरारत होतं.
" खरयं मयूर. पण तुला या पैशाने मदतच
......."
" सर , मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फ़ी देतीये
म्हटल्यावर, मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन! "
"म्हणजे?"
" वडील घरांना रंग द्यायचे काम करतात
.Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर
नेतात.
चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो.
सर, संचयिका आहे ना शाळेची,त्यातलं माझं पासबुक बघा.पुढच्याही वर्षाची फ़ी
देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले
दिसते
.....म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं.
पण सर,मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगले काम करतात. काम म्हणज
कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात.आई धुणं-
भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते.सर,वेळ कसा जातो,दिवस
कसा संपतो ते कळतच नाही....शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त
वाचली आहेत.तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर,माझ्या
घरी याच तुम्ही,माझ्याकडे पु.ल. देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे.
........सर,आहे ना मी श्रीमंत?"
आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता.सर,
शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो.रात्री देवळात
होण्या~या भजनात मीच पेटीची साथ देतो.भजनीबुवा किती छान
गातात! ऐकताना भान हरपून जातं
."
त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता.अभावितपणे मी विचारलं,"
व्यायामशाळेतही जातोस
?"
"सर,तेवढी फ़ुरसत कुठली? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास
बैठका काढतो ."
अंगावर एक थरार उमटला...कौतुकाचा.
" मयूर मित्रा ,मला तुझा अभिमान वाटतो.तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात
आहे त्याचा .."
" म्हणूनच म्हणतो सर......!"
" हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली
; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान
मुलगा म्हणून, हे पारितोषीक तरी........."
" सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाउ द्या . मी लिंकनचं,सावरकरांचं चरित्र
वाचलं ,हेलन केलरचं चरित्र वाचलं.सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट
करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड
मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं
राहूनच
जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर.....प्लीज.....!"
वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं , कलेच्या स्पर्शानं ,कष्टानं....... त्याच्या
वाणीला प्रगल्भतेची खोली होती,संस्कारामुळे नम्रतेची झालर होती . आता मला माझ्या
समोरचा मयूर जाधव स्पष्ट
दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले
होते.
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून,
परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत!

Other Best Marathi Moral Stories :

एक धनगर

वाचलेच पाहिजे असे काही

Tuesday, February 25, 2014

Whatsapp funny marathi post message: Marathi Fun


Marathi Fun on WhatsApp





Some funny what's app posts.
मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त
राग
कोणाचा येतो?????
(बंड्या उठला आणि म्हणाला)
.
.
बंड्या : राजाराम मोहनरॉय....
मास्तर : का रे बंड्या ????
बंड्या : कारण, त्यांनी 'बालविवाह' बंद
केला.....
त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर
आज
आम्ही जोडीने शाळेत
आलो असतो .
आली लहर केला कहर...

बाबा - चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.
चंप्या - तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.

गुरूजी - सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा.  बंड्या तू सांग बरं.
बंड्या - मला कविता आवडते.
गुरूजी - वा वा. कोणती कविता आवडते?
बंड्या - ती तिस-या बाकावरची.
------------------------------------------------बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते...
नवरा : काय सांगतेस... तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो.
नवरा : अरे देवा... आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो...
_------------------------_----------------------------
कडक Insult....
गर्लफ्रेँड- आज मी कशी दिसतेय ?
आत्ताच ब्युटी पार्लर मध्येजाऊन आली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बॉयफ्रेँड- मग ??
बंद होतं का ब्युटी पार्लर?
---------------------------------------------------
बायको :
" माझी मैत्रीण येणार आहे. दोन दिवस
तुम्ही बाहेर झोपा. "
.
.
नवरा :
" बरं .. पण वचन दे ..
.
.
.
.
.
माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस
बाहेर झोपशील ..
------------------------------------------------------------
लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोशी काय बोलावं ते बंड्याला कळंत नव्हतं...
बरांच वेळ विचार करुन तो तिला म्हणाला,
तुझ्या घरी माहित्ये ना की आज तू इथेच झोपणार आहेस ते ?  
-------------------------------------------------------------
काही अनुत्तरीत प्रश्न :
१] मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्लिश पेपर पेक्षा कमी का?
२] एशियाड मधील प्रवासी एसटीतल्या प्रवाशांकडे कुत्सित नजरेने का बघतात?
३] तांबडा सिग्नल असतानाही आपल्या मागचा वाहचालक होर्न का वाजवतो?
४] लहान बाळांशी मोठी लोकं बोबडे का बोलतात?
५] उडप्याच्या हॉटेलमध्ये कांदा भजी का मिळत नाही?
६] बशीत ओतून चहा पिणाऱ्या माणसाला वेडा असल्यासारखे का पाहतात?
७] 'मीच म्हणून तुमच्याशी संसार केला' असे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला का म्हणते?
८] आपण हॉटेलात बसल्यावर तिथला पोरगा नेमकी आपल्या बाकाखालची फरशी पुसायला का येतो?
९] हॉटेलात इडली सांबारातली शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची?
१०] अज्ञानात सुख असते असे म्हणतात मग माणूस ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो?
११] कॉम्पुटर बंद करण्यासाठी स्टार्ट बटन का क्लिक करावे लागते?
१२] दोन शेजारणी खूप काम पडलंय अस म्हणत दारात उभा राहून अर्धा अर्धा तास का बोलत असतात?
१३] जाहिरातीत दाढी केल्यानंतर गालावर हात फिरायला बाईचं का लागते?
१४] अनुभवी डॉक्टर सुद्धा practice का करतात?
१५] आपला जन्म इतरांसाठी झाला असेल तर इतर लोक कशासाठी जन्मले आहेत?
Confusion hi confusion hain, solution kuchh pataa nahi...

----------------------------------------------------------
एका भाषणाच्या वेळी सोनिया बाईंनी एक
गोष्ट सांगितली......
" एक बाप होता....त्याने त्याच्या ३
मुलांना प्रत्येकी १०० रुपयेदिले
आणि संगितले
की अशी वस्तु आणा ज्याने आपली रूम भरून
जाईल.....
पहिल्या मुलाने १०० रुपयाचे लाकडं
आणले.....
पण ते पुरेशे नव्हते.. दुसर्या मुलाने १०० रुपयाचा कापूस
आणला.....पण
तो पुरेसा नव्हता...
आणि
तिसर्या मुलाने ५
रुपयाची मेणबत्ती आणली,ती पेटवली व
प्रकाशाने
पूर्ण रूम भरून गेली......"
पुढे कपिल सिब्बल उठला आणि म्हणाला ,
'तो तिसरा मुलगा म्हणजेच राहुल गांधी....
जेंव्हापसून ते देशाच्या राजकरणात उतरले
आहेत...देशाची प्रगति झाली आहे'
.
.
.
तेवढ्यात खालून 'अण्णा हजारे'
यांचा आवाज आला.....
.
.
.
"ते सर्व ठीक आहे.....पण बाकीचे ९५रुपये
कुठे
गेले ???
--------------------------------------------------------
*** शब्दांचा खेळ ***
गरीब माणुस दारु पितो,
मध्यमवर्गीय मद्यपान करतो,
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात !
काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो,
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते !
गरीब माणुस करतो ते लफडं,
मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम,
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर !
शब्दा बरोबर शब्द मांडला की कविता होते,
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते
शब्दाने शब्द वाढत गेले की लेखकाची रॉयल्टी वाढते...
--- आयुष्य हे सुंदर असतं
        हे ज्याच त्याने ठरवायचं असतं...!
स्वप्न फरारीच बघायच ...का
      अपना बजाज मधे सुख शाेधायचं
डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे.... का
       संस्कार जाेपासून सुसंस्कृत व्हायचे
आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची... का
त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा.
आयुष्य हे सुंदर असतं
        हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....!
स्वबळावर नवनवीन देश पादाक्रांत करायचे ....का
मराठी पणाच्या चौकटीत स्वतःला जखडून ठेवायचं
What's Up वर स्वता:च मनोरंजन करायचं .......का
आपल्या सानुल्यासोबत सारीपाटात रमायचं.
जोडीदारासोबत शरदाचं चांदण शिंपायच...का
समाजाच्या जोखडीत वेळोवेळी मरांयच
आयुष्य हे सुंदर असतं
      हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....!
तिन्हीसांजा देव्हा-यात दिवा लावायचा.....का
विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा.
मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची...का
निवडुंगाचे
कुंपण घालून विचार खुंटवायचे.
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं.....
का
एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं.
आयुष्य हे सुंदर असतं
        हे ज्याच त्याने ठरवायचं असतं...!
-------××××-------××××-
तो म्हणाला आज 'वॅलेनटाइन डे'
ती म्हणे,नवे काय? रोजचेच रडे
चल ना गं.. मस्त कॅण्डेललाइट डिनर घेऊ
ती म्हणे बरं..! मुलांना सोबत घेऊन जाऊ
तो लाडात.. थोडा रोमॅन्टिक !
ती मात्र जुनी.. तशीच अॅन्टिक !
त्यानं म्हटलं, आज बायको नको गं..
तुझ्यातली प्रेयसी हवी
तिने हसत म्हणाली, तुम्हांला काय..!
रोज नवी फॅण्टसी हवी
तो म्हणाला चालेल गं, इतकंही हसलीस तरी !
हाती हात घेऊन घटकाभर जवळ बसलीस तरी
त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली
आणि मधाळंसं हसत पुन्हा फुलून गेली
त्याला म्हणाली..
वेड्या........!
हा 'वॅलेनटाइन डे ' फक्त
वर्षातून एकदाच साजरा होतो..
तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र
कुठल्याही 'डे' ला लाजरा होतो..
नजरेत नजर मिसळायला
कॅण्डललाइटचं टेबल लागत नाही
अन एकरुप झालेल्या जीवांना
'वॅलेनटाइन 'चं लेबल लागत नाही
---------------------------------------------------------
वडील :- पास हो किंवा नापास, तुला Bike
मिळणारच...!
मुलगा :- नादच खुळा...
वडील :- पास झालास तर Pulsar 180 .. college
ला जायला...,
नापास झालास तर M80.. रानात वैरण
आणायला जायला आणि दुध घालायला...!!!
--------------------------------------------------------
भारताचा राष्ट्रीय खेळ, हॉकी ---धोक्यात.
भारताचा राष्ट्रीय प्राणी, बाघ ----धोक्यात.
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर ----धोक्यात.
भारत कृषिप्रधान देश ,
भारताचा शेतकरी ------ धोक्यात.
भारताची सीमारेषा ------ धोक्यात.
भारताचा सैनिक ------ धोक्यात....
भारताच आर्थिक चलन ------ धोक्यात.
भारताच पर्यावरण ------धोक्यात .भारताच विधानभवन ------ धोक्यात..
भारताच्या बस,ट्रेन,विमान----- धोक्यात
भारताची संस्कृती ------ धोक्यात.
भारताची महिला ------धोक्यात.भारताचा इतिहास/वर्तमान/भविष्य ------अंधाराततर
मग कायघंटा होत आहे " भारत निर्माण.
विचार करा जाब विचारायालाच हवा
ईतकी शेअर करा पोस्ट कि प्रत्येक जण आता जागा झालाच पाहिजे
 

For more funny Marathi post messages see our another post :

भयानक मराठी PJ - WhatsApp Jokes Collection

काही विनोद , काही कविता , काही असेच

पोस्ट आवडल्यास खाली आपले कमेंट्स करायला विसरू नका.