Whats App वर आलेले काही विनोद , काही कविता , काही असेच
Marathi Jokes, Poems and articles received on WhatsApp
अमेरिकेत एका शहरात नवरे विकत मिळण्याचे दुकान होते.… दुकान म्हणजे चक्क पाच माळ्यांची अलिशान बिल्डींग!! जसजसे एकेक माळा वर चढू तसतसे नवऱ्यांची क्वालिटी वाढत होती.!!
तर त्याचे झाले काय…
आपली चिंगी सहज फिरत फिरत अमेरिकेत जाते... आणि तिला हे दुकान दिसते... अरे वा!! "आमच्या इथे नवरा विकत मिळेल" अशी पाटी पाहून जाम खुश झाली.!! इथून मस्तपैकी एक झक्कास नवरा घेऊन जावा असा विचार करून आत शिरली...
पहिल्या माळ्यावर पाहिले तर तिथे सूचना होती... "इथल्या सर्व पुरुषांकडे जॉब आहे."
चिंगी खुश झाली.!!
पण वरच्या माळ्यावर जाउन आणखी चांगल्या क्वालिटी चा नवरा घ्यावा असा विचार केला…
दुसऱ्या माळ्यावर बोर्ड होता: "येथील सर्व पुरुषांकडे जॉब आहे आणि स्वतः चे घर आहे.!!" चिंगी जाम खुश झाली. "च्यामारी लैइ भारी" असे म्हणली. पण हावरटपणा नसेल तर ती चिंगी कसली.?
आपल्याला आणखी चांगला नवरा पायजेल असे म्हणत तिसऱ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : "इथले सर्व पुरुषांकडे जॉब व घर आहे. तसेच ते घर कामात सुद्धा मदत करतात.!!"
आता मात्र चिंगी उड्या मारू लागली.
आता हिथून ह्यापेक्षा भारीवाला नवरा घेऊनच जाणार असा विचार करून चौथ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : "इथले सर्व पुरुषांकडे जॉब , घर आहे. तसेच ते घरकामात मदत करतात आणि तुमचे पाय सुद्धा चेपून देतात."
"अहाहा कित्ती मस्त.!!" पण आणखी वरच्या माळ्यावर जाउन ह्यापेक्षा भारी नवरा मिळवावा असा विचार केला.!!
पाचव्या माळ्यावर गेली.... पण तिथे एकही पुरुष नव्हता!! एक इलेकट्रोनिक नोटीस बोर्ड होता…
"या माळ्यावर येणाऱ्या तुम्ही १५०३४७५८९ व्या स्त्री आहात.!! तुम्हाला हवा असलेला नवरा आमच्याकडेच काय पण इतर कुठेच मिळणार नाही!!
कुणीतरी खरे म्हंटले आहे… स्त्रियांना कितीही चांगल्या गोष्टी दिल्या तरी त्यांचे समाधान होत नसते!! "
====================================================================
आणखी वाचा…
आपला चिंटू सुद्धा अमेरिकेला गेलेला असतो. याच दुकानाच्या मागच्या बाजूला आणखी एक दुकान असते. बोर्ड असते "आमच्या येथे बायको विकत मिळेल"!!
सेम टू सेम बिल्डींग... ५ माळ्यांची... आणि प्रत्येक मजल्या गणिक बायकांची क्वालिटी वाढवणारी.!!
चिंटू पहिल्या माळ्यावर जातो… नोटीस बोर्ड वाचतो : "येथील स्त्रिया आपल्या नवऱ्याचे म्हणणे ऐकतात आणि उगाचच वायफळ बडबड करीत नाहीत.!!"
चिंटू जाम खुश होतो. एक चिकणी बायको निवडतो आणि लग्न करून नाशिकला घेऊन येतो!!
====================================================================
जाता जाता...
आत्ताच आलेल्या अहवालानुसार... बायको मिळण्याच्या त्या दुकानाच्या २ ऱ्या ते ५ व्या माळ्यांना आजपर्यंत एकाही पुरुषाने भेट दिलेली नाहीय!!
====================================================================
मुलगा आणि मुलगी जेवत असतात ….
मुलगा : ए ऐक ना ….
मुलगी : श्श्श्शू..... जेवताना बोलू नये ….
थोड्यावेळानी जेवण उरकल्यावर
मुलगी : हं …. आता बोल.
मुलगा : आता कप्पाळ बोलू ….!! तू झुरळ खाल्लंस लिंबाच्या लोणच्याची फोड समजून …!!!
====================================================================
एक कविता सादर करत आहे
कवितेचे नाव आहे
'एक थेंब'
(टुपूक)
धन्यवाद
====================================================================
पुणेरी विनोद
एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो,
तो nurse ला विचारतो, खायला काय आहे?
nurse : पोहे आणि उपीट तयार आहे...
मुलगा: चायला! परत पुण्यात जन्माला आलो....!!
पुणेरी boyfriend
मुलगा : I'll climb the tallest mountain, swim the deepest sea, walk on fire just for you......
मुलगी: wow, किती romantic
तू मला आत्ता भेटायला येशील का ?
मुलगा : आत्ता लगेच नको, पाऊस पडतोय, आई ओरडेल...!
एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, " थांबा मी चहा घेऊन आलो..."
१० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया...!"
स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !
स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)
पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??
पुणेरी पाटी-(तुळशीबागेतील)
मंदिर दुरूस्तीचे कामामुळे या वर्षी
रामाचा जन्म होणार नाही.
====================================================================
मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त
राग
कोणाचा येतो?????
(बंड्या उठला आणि म्हणाला)
.
.
बंड्या : राजाराम मोहनरॉय....
मास्तर : का रे बंड्या ????
बंड्या : कारण, त्यांनी 'बालविवाह' बंद
केला.....
त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर
आज
आम्ही जोडीने शाळेत
आलो असतो .
आली लहर केला कहर...
बाबा - चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.
चंप्या - तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.
गुरूजी - सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा. बंड्या तू सांग बरं.
बंड्या - मला कविता आवडते.
गुरूजी - वा वा. कोणती कविता आवडते?
बंड्या - ती तिस-या बाकावरची.
====================================================================
आयुष्यं हे बदलतं असतं !...
शाळेपासून कॉलेजपर्यंत..
चाळीपासून फ्लँटपर्यंत....
पुस्तकापासून फाईलपर्यंत ..
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..
लहाणपणापासुन
वृद्धत्वापर्यंत ......
पण,
पण,
मित्र मात्र तसेच राहतात....
.
.
.
प्रेमळं, जिवलगं, सच्चे
आणि जिवास जिव देणारे..
माझ्या आयुष्यातील सर्व
जिवलग
मित्रांच्या मैत्रीला,
आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन्
वेळेला तुमचा आरसा बनतील,
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि
सावली कधी साथ सोडत नाही..
====================================================================
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || धृ ||
आजीने घातलेल्या आंघोळीने
मन सुद्धा स्वछ होई
देवपूजा पाहताना तिची
देव सुद्धा मुग्ध होई
मायेन भरवलेल्या तिच्या घासांनी
दिवसभराची भूक भागे
तिच्या सुंदर गोष्टी-गाण्यांनी
शांत सुखाची झोप लागे
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || १ ||
७ वाजताच्या बातम्या पाहणे
हा आजोबांचा नियम असे
'बातम्या नको,कार्टून लावा'
असा आमचा गलका असे
बाजारातून घरी आल्यावर आजोबा
सारे त्यांच्याभोवती जमत असू
त्यांनी आणलेला खावू
सारे वाटून खात असू
आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || २ ||
खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही
गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे
सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ३ ||
शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई
वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !
आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ४ ||
स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले
क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || ५ ||
आजच्या मोठ्या पगारामध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही
आजच्या फोर व्हीलर long drive la
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या face बुक chatting ला नाही
गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माजे ओघळून गेले || ६
====================================================================
आज पुन्हा पगार होणार,
बँकेचा अकाउंट भरून जाणार,
मन कसं प्रसन्न प्रसन्न होणार,
मनात वेगळे वेगळे प्लान शिजणार,
काय रे देवा...........
मग विकेंड येणार,
सुरमई फ्राय आणि कोलंबीचं कालवण होणार,
थोडासा जास्ती खर्च होणार,
पण आपल्याला त्याची चिंता नसणार,
काय रे देवा...........
चार तारीख येणार,
होमलोन चा हफ्ता जाणार,
८०% अकाउंट रिकामा होणार,
थोडंस टेन्शन सुद्धा येणार,
काय रे देवा...........
पुन्हा विकेंड येणार,
या वेळेला फक्तं बोंबील आणणार,
फिश किती महाग झालंय असा विचार मनात येणार,
काय रे देवा...........
१५ तारीख येणार,
एल आय सी चे प्रिमिअम जाणार,
अकाउंट पूर्ण खिळखिळा होणार,
मनाची घालमेल वाढणार,
उरलेल्या पैशाचं प्लानिंग चालू होणार,
काय रे देवा...........
अजून एक विकेंड येणार,
फिश आता खूपच “महाग” झालेलं असणार,
आता वरणभात खाऊनच दिवस निघणार,
काय रे देवा...........
२५ तारीख येणार,
अकाउंट पूर्ण रिकामा झालेला असणार,
रिक्षा ऐवजी आता बस ने जावं लागणार,
कॉफी ऐवजी कटिंग चहा वर दिवस निघणार,
मन पुन्हा विचलित होणार,
काय रे देवा...........
३० तारीख येणार,
पुन्हा मनाला पालवी फुटणार,
पुन्हा छान छान प्लान शिजणार,
कारण......
आज पुन्हा पगार होणार..... आज पुन्हा पगार होणार......
काय रे देवा..........
====================================================================
आजच्या परिस्थितीत नेत्यांना परफेक्टपणे सुट होणारे गीत कसे असेल ते बघा: -
सोनिया गांधी: - दिल हुम हुम करे, घबराये......
मनमोहनसिंग: - आता वाजले कि बारा, मला जावू दया ना घरा....
.राहूल: - चॉकलेट लाईम ज्यूस आईसक्रीम टॉफीयां,पहले जैसे अब मेरे शौक है कहां.....
मोदी: - देखा एक ख्वॉब तो ये सिलसिले हुए...
.केजरीवाल: - अंधेरी रातों मे, सुनसान राहों पर, हर जुल्म मिटाने को.......
अडवानी: - भंवरे ने खिलाया फूल, फूल को ले गया राजकुँवर.....
जसवंतसिंग : - खिलौना जानकर तुम तो मेरा दिलतोडे जाते हो......
ममता: - बेदर्दी से प्यार का सहारा ना मिला,ऐसा बिछडा वो मुझको ना जोबारा मिला.....
अण्णा: - जाने कहाँ गये वो दिन.......
जयललीता: - बिजली गिराने मै हूँ आयी, कहते है मुझको हवाहवाई..........
सुशीलकुमार : - घालीन लोटांगन वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे......
अशोक चव्हान: - मय्या मोरी! मै नही माखन खायो...........
.कलमाडी : - तुझे याद न मेरी आयी, किसी से अब क्या कहना.............
शरद पवार : - टिक टिक वाजते डोक्यातं, धडधड वाढते ठोक्यातं........
आबा: - कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.........
उद्धव: - मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है........
राज : - आ देखे जरा, किसमे कितना है दम.........
गडकरी : - दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके......
मुंढे : - हम तुम्हे चाहते है ऐसे, मरने वालाकोई जिंदगी चाहता हो जैसे.......
अजीतदादा: - माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं...........
पृथ्वीराज: - करवटें बदलते रहे सारी रात हम,आपकी कसम हाय आपकी कसम.........
भुजबळ: - मेरे सपनों कि रा्नी कब आयेगी तू..........
राणे: - घुंगरू कि तरह बजता ही रहा हूँ मै.........
आठवले : - काठी नि घोंगडं घेवू द्या की रं, मला बी जत्रंला येवू द्या की........
मुलायम: - चांदी की सायकल सोने कि सीट, आओ चले डार्लींग चले डबलसीट..............
मायावती : - मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा,मै नागन तू सपेरा...........
.लालू : गोरी तेरा गाँव बडा प्यारा, मै तो गया मारा, आके यहाँ रे......
राजनाथ : - सपने मे मिलती है, ओ कुडी मेरी सपने मे मिलती है......
रामदेव : - चल सन्यासी मंदिर मे, तेरा चिमटा मेरी चुडीयाँ दोनों साथ बजाएंगे.....
..
..
जनता : - जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ..........
====================================================================
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.
यालाच 'जीवन' म्हणतात.......
====================================================================
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..!!
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत..!!
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात..!!
तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत..!!
वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत..!!
पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत...!!
हसायला गेल तर
रडणेही आपल असत .....!!
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..
====================================================================
Pune classic
Joshi kaku : Hello Dominos?..
Dominos : Yes Dominos how can I help you.
Joshi kaku : ghari pizza kasa banvaycha ho?
====================================================================
दोन झुरळे ICU मध्ये
एकमेकांच्या शेजारी अॅडमीट असतात...
प.झु.: काय 'बेगॉन' का...?
दु.झु.: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!!
====================================================================
आज प्रत्येकजन आपली गाडी झाडाच्या सावलीत
लावायची खटपट
करतो,
.
.
.
.
.
पण लहानस रोपट लावण्याची खटपट कुणीच करत
नाही..!
सहयोग करा....आणि एक तरी झाड लावा....¶¶ ..... े
====================================================================
Malvani Masala
बंड्याची Girl friend :" जानु,
उद्या माझो Birthday आसा
बंड्या : "Darling..!!
Advance मदेन तुका Happy Birthday,
Girl friend : " GIFT काय दितलस...??
बंड्या : "बोल तुका काय होया..???
Girl : "RING...!!
बंड्या : " ठीक आसा,
RING दितलय,
पण call उचलु नकोस...,
आधीच BALANCE कमी आसा.....!!
--------------------------------------------------
मालवण एअरवेज मधली हवाई सूंदरी एका पॅसेंजराक ईचारता: सर, आपण जेवणात काय घेतालास????
पॅसेंजर: माका, खीर, वडे,
भोपळ्याची भाजी,
वाटाण्याची उसळ, कांद्याची
भजी, वायीच कोशिंबीर
आणी डाळ भात .....!
हवाई सूंदरी: सर, आपण ईमानात आसास. आपल्या बापाशीच्या श्राद्धाचा ज्यावान जेवूक नाय इलात ..!!
---------------------------
मालवणी माणूस: ओ पुजाऱ्यानु...यंदाच माझी "बायपास" झाली असा. तो नवस फेडायला मी आज मंदिरात इलंय. जरा देवाक जोरदार गाऱ्हाणा होऊन जाऊ द्या........
पुजारी: बा देवा म्हाराजा, यांची `बाय’ यंदा 'पास' झाली असा. तशी ती दरवर्षाक होऊ दे रे म्हाराजा........
मोरूची बायको मोरूक ईचारता....बघलास शिलाचो नवरो रोज संध्याकाळी तीका फिराक घेऊन जाता, तुम्ही असा कधी केल्लास....????
मोरू - मी तीका तीन चार येळेकं ईचारलय, पण ती नाय म्हणता.
"Aali Lahar . Kela Kahar.
एका बाई ने
येणाऱ्या बसला थांबवले ...
.
Driver : कुठे जाणार ..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बाई : कुठे नाही .. पोरगा रडतोय
जरा 'पोमपोम' वाजवून दाखवा की .....!!!!
====================================================================
तुम्ही सांगाल ते
नवरा:आज जेवायला काय बनवशील?
बायको : तुम्ही सांगाल ते!?
नवरा: वरण भात कर.
बायको: कालच तर केलं होतं
नवरा: मग भाजी चपात्या कर
बायको:मुलं नाही खात ते
नवरा:मग छोले पुरी कर
बायको:पचायला जड होईल
नवरा: अंड्याची भुरजी बनव
बायको:आज गुरूवार आहे
नवरा:पराठे?
बायको: रात्री कुणी पराठे खातं का?
नवरा :चल हॅटेलमधुनच मागवु
बायको :रोज रोज बाहेरचं खाणं बरं नाही
नवरा: कढी आणि भात?
बायको :दही नाही आता
नवरा :इडली संबार?
बायको :त्याला वेळ लागेल आता आधिच सांगायचं नाही का!
नवरा :चल ठिक आहे मॅगी च बनव .त्यात वेळ नाही लागत.
बायको :हॅ ते काही जेवण आहे का?
नवरा :मग आता काय बनवशील?
बायको :तुम्ही सांगाल .....ते
====================================================================
इंटरनेटने दाखवले कि जग किती छोटे आहे ..
पण हरवलेल्या विमानाने दाखवले
पृथ्वी किती मोठी आहे ..
====================================================================