आज माझ्या जीवनाला
एक नवा सुर मिळाला
रातराणीच्या फुलांना
आज नवा गंध मिळाला
तुझ्या आज असण्याने
मन माझे धुंद आहे
याच धुंदिचा आनंद
अंगणात मंद आहे
“शब्दांमध्ये व्यक्त करणे
मला निदान शक्य नाही
भावनांच्या गुंतागुंतीत
तुला शोधणे शक्य नाही”
वसंत होता श्वासही होता
पण तेव्हा तू नव्हता
फरक आता इतकाच आहे
माझ्या मनी तू आहेस
आता प्रत्येक पावसात मला
फक्त एकच गोष्ट हवी
कुशीत मला ओढून घेशील
साथ इतकी तुझी हवी
आता माझ्या प्रत्येक गोष्टीत
एका सुखाचा भास असतो
भासाच्या त्या प्रत्येक क्षणात
तुझ्या असण्याचा नाद असतो
एकच आता मला तुला
सांगावेसे वाटते
तुझ्या हरएक दुःखात तू
मला ओढून घे
काठावरतीच आहे अजून
हळूच मला कुशीत घे
सुकलेली फुलं..
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात...............
मी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more
Monday, December 31, 2012
Wednesday, December 26, 2012
पत्नी प्रसन्न व्रत
पत्नी प्रसन्न व्रत
संसारात पत्नीच्या त्रासाला कंटाळलेला चंद्रसेन मार्गदर्शन घेण्यासाठी सोमदत्त या अनुभवी गुरुकडे गेला, तेव्हा सोमदत्ताने त्यास ‘पत्नी प्रसन्न व्रता’ची माहिती सांगितली. तो म्हणाला-
हे चंद्रसेना, मी आज तुला पत्नी प्रसन्न व्रताची सविस्तर माहिती सांगणार आहे. ती तू भक्तिभावाने श्रवण कर. या व्रताचे पालन करणार्याचा संसार सुखाचा होतो याबद्दल शंका बाळगू नकोस. या व्रतामध्ये पत्नीला प्रसन्न ठेवण्यासाठी करावयाचे विधी सांगितले आहेत. सर्व वयोगटातील विवाहित पुरुषांना हे व्रत करता येईल. या व्रतासाठी साधकाने आपली मनोदेवता आपली पत्नीच आहे, हे मनावर बिंबविणे आवश्यक आहे. अशा प्रकारची भूमिका एकदा निश्चित केली, की मग या देवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा. प्रातःकाली पत्नीदेवतेचे दर्शन घेऊनच कार्याला लागावे. निद्रादेवतेने बहाल केलेल्या सुखाची रक्तिम कांती असणार्या या देवतेचे रूप प्रातःस्मरणीय असते. हे रुपडे मनात साठवून ठेवल्यास दिवसभर कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि शारीरिक विश्रांतीची गरज उरत नाही. श्रमाला प्रतिष्ठा देणारी ही देवता आहे हे समजून घे.
या व्रतामध्ये, पतीने पत्नीआधी जागे होणे आवश्यक आहे. पत्नीदेवीच्या सेवेसाठी रात्री गोंधळ घातला असेल, तरी पहाटे तिच्या झोपेत व्यत्यय येणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. सर्वप्रथम अंथरूण, पांघरूण, उश्या इत्यादी वस्तू व्यवस्थित घड्या घालून निर्दिष्ट करण्यात आलेल्या जागेवर ठेवून द्याव्यात. पत्नीदेवतेचा स्वतःचा अवतार कसाही असला, तरी भक्त मात्र अजागळ असणे तिला आवडत नसते. यास्तव सेवकाने दाढी, आंघोळ आदी प्रातःकालीन कार्ये ती जागी होण्यापूर्वी पूर्ण करावीत आणि संपूर्ण शुचिर्भूत होऊन, प्रसन्न मुखकमलाने तिला जागे होण्याची विनंती करावी. अशा वेळी फाजील लाडात येणे, म्हणजे स्वतःच्या अपमानाला निमंत्रण होय, हे पक्के ध्यानात ठेवावे. मुखप्रक्षालन वगैरे करून पत्नी तयार होताच चहा करते. कारण, अशा चवीचा आणि मनाला व शरीराला चैतन्य प्राप्त करून देणारा चहा फक्त तिला (आणि तिच्या आईलाच) येतो, यावर उपासकाचा विश्वास असावा. रोज पत्नीच्या हातचा चहा घेताना, ‘तुझ्या हातचा चहा म्हणजे… व्वा!… क्या बात है! ‘ हे वाक्य कंटाळा न करता रोज म्हणावे. या वाक्याचा सराव होण्यासाठी सर्रास खोटे बोलता येणे आवश्यक आहे. असा चहा घेतल्यानंतर मनास चैतन्य येवो अथवा न येवो, परंतु शरीराच्या पोट नावाच्या अवयवाची चेतना जागृत होते आणि पायांना हालचाल करून घरातील कोपरा गाठण्यासाठी धावाधाव करावी लागते. तिच्या हातचा चहा घेताच तत्काळ ओक्के.. होत असले, तरी परतताच ‘ तुझ्या हातचा चहा म्हणजे… व्वा!.. क्या बात है! ‘ असे मनापासून म्हणावे.

हे चंद्रसेना, वरीलप्रमाणे पत्नी प्रसन्न व्रताचे जो निष्ठेने पालन करील, त्याच्या संसारामध्ये शांतता आणि सौख्य सदैव नांदत राहील याबद्दल तू निःशंक रहा. असे संसार घटस्फोटांपासून शेकडो योजने दूर राहतील. अशा घरांमधील संतती आज्ञाधारक, शिस्तप्रिय आणि आदर्श नागरिक होईल. या व्रताचे पालन न केल्यास, तशा संसाराचे गलबत दिशाहीन होऊन किनार्यावरील खडकावर आदळून त्याचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही हे निश्चित!
_Regards -
Ashish Vijay Kadam
Sunday, December 2, 2012

यानंतर ती साफसफाई, स्वयंपाक इत्यादी कष्टाची कामे करत असताना, आसपास घोटाळत तिच्या आई-वडिलांचा विषय काढावा. तिच्या वडिलांच्या आयुष्यातील कर्तृत्वाच्या गोष्टींचा उल्लेख करावा. त्यांच्या निर्णयामुळे आपल्या आयुष्याचे तीन-तेरा वाजलेले असले, तरी त्यांचे निर्णय किती अचूक असतात याचे कौतुक करावे. यानंतर पत्नीच्या आईच्या गृहकृत्यदक्षतेची चर्चा करावी. खरे तर तुझ्या आईचे नाव सीता, तारा, मंदोदरी, अहिल्या, द्रौपदी या पंचकन्यांच्या जोडीनेच घेणे आवश्यक आहे असा सूर लावावा. अशा चर्चेने स्वयंपाक चविष्ट होत असतो आणि ती व्रताच्या योग्य दिशेची पावती असते.
या व्रताचा भाग म्हणून, दररोज पत्नीच्या आई-वडिलांचे कौतुक केले तर व्रताचे रहस्य तिला समजून येऊ शकते आणि आपला कावा तिच्या लक्षात येऊ शकतो. दुसर्या दिवशी, तिचे भाऊ कर्तृत्ववान आहेत पण त्यांना बायका ‘ काहीतरीच ‘ मिळाल्या आहेत अशी प्रस्तावना करावी. बाकीचा प्रबंध ती पूर्ण करते. तिसर्या दिवशी ‘ तिच्या जावा आणि दीर ‘ यांच्या वागण्यामधील खोड्यांची चर्चा करावी, बाकीचा प्रबंध ती पूर्ण करते. चवथ्या दिवशी ‘ आपले आई-वडील ‘ याविषयी चर्चेला सुरुवात करून द्यावी. बाकीचे व्याख्यान पूर्ण करण्याएवढा मसाला तिच्याकडे असतो. पाचव्या दिवशी आपल्या बहिणी तथा तिच्या नणंदांचा विषय काढावा. त्या ‘ कित्ती कज्जाग ‘ आहेत यविषयी ती सहज माहिती पुरविते. सहाव्या दिवशी पुन्हा तिचे आई-वडील या विषयावर यावे आणि याच क्रमाने दररोज चर्चा करून तिला प्रसन्न आणि स्वयंपाक रुचकर करून घ्यावा.
दिवस असा आल्हाददायक गेल्यानंतर सायंकाळ फार महत्त्वाची असते. दररोज सायंकाळच्या खर्चासाठी अतिरिक्त निधीची व्यवस्था करून ठेवावी. शहरातील विविध बागांमध्ये आलटून पालटून जात जावे. पाणी-पुरी, पाव-भाजी, रगडा-पॅटीस, छोले-भटूरे वगैरे जोडीदार पदार्थ खावेत, म्हणजे आपली जोडीदारीण प्रसन्न होते आणि त्याचा प्रत्ययही लगेच येत असतो. बागेत जाण्याचे इतरही अनेक फायदे असतात. इतर महिलांची वेषभूषा अणि केशभूषा यांचा अभ्यास करण्याची संधी पत्नीला मिळत असते. साड्यांमधील नवीन पोत, मंगळसुत्रांचे डिझाईन्स, ब्लाऊझच्या बाह्यांमधील चित्र-विचित्र फॅशन्स, सँडलींची उंच किंवा कमी हिल, जरदोजी वर्कमुळे आलेला उठाव, मॅचिन्ग टिकल्यांचे बाजारात आलेले नवनवीन आकार आणि प्रकार. कर्णभूषणांमधील नावीन्य, भांगामध्ये लावायच्या सिंदुराची लांबी, पंजाबी, पतियाळा, पॅरलल या वस्त्र-प्रावरणांमधील शॉर्ट, मिडियम, लाँग प्रकार इत्यादी समकालीन परिवर्तनाची चाहूल गार्डनमध्ये लागत असते. या विविध प्रकारांमधील आपण नेमके कोणते उचलायचे याचा अभ्यास पत्नी यावेळी करू शकते. अशा अभ्यासाचा एक वेगळाच आनंद तिच्या चेहर्यावर दृग्गोचर होतो. अशा वेळी स्वतःच्या पोटात खर्चाच्या भितीने गोळा उठला, तरी चेहर्यावर मात्र प्रशंसेचे भाव असणे आवश्यक आहे, हे साधकाने विसरता कामा नये. एखाद्या नवविवाहितेकडे पाहून पत्नीने नाक मुरडले, तर आपणही आपले नाक तीनशे साठ अंशाच्या कोनातून मुरडले पाहिजे. पण बागेमध्ये फिरताना तुझे डोळे भिरभिरते नसावेत. साधकाची नजर स्थिर आणि केवळ आपल्या आराध्य देवतेवरच असणे आवश्यक आहे. क्वचित कधी ‘ मन वढाय वढाय ‘ झाले, तरी नजरेच्या वारूंना संयमाचा आवर घालणे आवश्यक आहे. अन्यथा या घटकेपावेतो केलेल्या व्रतपालनाचा नाश होऊ शकतो.
याशिवाय जेवताना छान, झक्कास, व्वा.. सुरेख.. अशा उद्गारवाचक शब्दांचा सढळ हाताने वापर करावा म्हणजे तितक्याच सढळ हाताने पदार्थ ताटामध्ये येत असतात. ‘ तुझ्या हातच्या जेवणाची चव कोणत्याही हॉटेलमधील जेवणाला नाही ‘ हे म्हटले तर खरे आणि म्हटले तर तद्दन खोटे वाक्य सर्रास वापरावे. हेच वाक्य हॉटेलमध्ये जेवायला जाण्याची वेळ आली, तर तिथेही खुबीने वापरता येते.

Wednesday, November 21, 2012
Guide to Gatari in 10 minutes - गटारी अमावास्या
गटारी अमावास्या
आषाढी अमावास्या “तमसो मा ज्योतिगर्मय”, असा संदेश देणारी, मंगलमय अशी मानली जाते...,
आषाढातील अमावास्या. हा दिवस 'दिव्यांची अमावास्या' म्हणून साजरा केला जातो.पण गेल्या काही वर्षांत आपण मात्र या अमावस्येला गटारी ठरवून, जणू काही भरपेट मांसाहार आणि मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच असलेली अमावस्या असे तिला रूप देऊन टाकले आहे. आषाढी अमावस्येनंतर श्रावण सुरू होतो, त्यामुळे मांसाशन वर्ज्य मानले जाते. पुढच्या महिन्याभरात ते मिळणार नाही, ते आताच वसूल करून घेण्याकडे आपला कल असतो.
याबद्दल आवडलेली एक पोस्ट खाली दिली आहे.
गटारी अमावास्या ??.. आषाढी अमावास्या !!!
गटारी अमावास्या साजरी करताना खूप खा प्या मजा करा पण पिऊन गाडी चालवू नका स्वताच्या व दुसऱ्याच्या जीवाला धोका करू नका
Tuesday, May 15, 2012
कृतज्ञता कशी असते ? कशी असावी ?
कृतज्ञता कशी असते ? कशी असावी ? याबद्दल वाचनात आलेली एक कथा येथे नमूद करावीशी वाटते -
एका नदीच्या पवित्र तीरावर एक अंजिराची बाग होती, त्या बागेतील अंजिराचा ताजा मेवा खाण्यास हजारो पोपट येत व बागेतच राहात. या पोपटात एक पोपट फारच सुंदर होता. एका अंजिराच्या झाडावर तो सदैव असायचा. दरवर्षी या अंजिराची मधुर फळे खाई, गंगेचे निर्मळ पाणी पिई व मोठया संतोषाने असे.
परंतु सर्वच दिवस सारखे नसतात. काही वर्षे गेल्यावर त्या वृक्षाचे सौंदर्य व सामर्थ्य नष्ट झाले. तो अंजीरवृक्ष वाळत चालला. त्या झाडास पाने फळे येतनाशी झाली. शेवटी राहता राहता सुकलेले शुष्क खोड मात्र राहिले. अंजिराच्या झाडात पुष्कळ ढोल्या होत्या व त्यातून भूस बाहेर पडत असे.
तो तांबडया चोचीचा सुंदर हिरव्या पंखाचा पोपट कोठे होता? तो पोपट आपल्या जुन्या मित्रास चिकटून राहिला. ज्या झाडाने पूर्वी आपणास सुंदर अंजीर दिले त्या झाडाला त्याच्या शेवटच्या दिवसांत पोपटाने सोडले नाही. तो झाडाची वाळलेली साल व ढोलीतून गळणारा भुसाच खाई व गंगेत उतरून तृषा भागवी.
त्या पोपटाची निष्ठा देवाने पाहिली. एका हंसाचे रूप धारण करून भगवान ब्रह्मदेव त्या अंजीरबागेत आले. हंसरूपी ब्रह्मदेव पोपटास म्हणाले, ''शुका,जेथे सुंदर फळे वगैरे असतात तेथे पाखरे राहतात, तू वेडयासारखा या वाळलेल्या खुंटावरच का बसून राहतोस?''
पोपट म्हणाला, ''हे हंसा, हा वृक्ष व मी दोघे बालपणापासून मित्र-मित्र आहो. हा वृक्ष अंगात शक्ती व सौंदर्य असेपर्यंत माझे पोषण करी - मला अंजीर देई. यावज्जीव ज्याने मजवर प्रेम केले, त्याला मी कसा सोडू? मी कृतघ्न कसा होऊ? मी येथेच मरेन पण उडून अन्यत्र जाणार नाही.''
ब्रह्मदेवास आनंद झाला. त्याने आपले स्वरूप प्रगट केले व आपल्या कृपेने त्या वाळलेल्या झाडास पानेफुले आणलीण तो वृक्ष सुंदर दिसू लागला. मरेपर्यंत तो पोपट त्याच झाडावर राहिला.
सारांश, पशुपक्षीसुध्दा कृतज्ञता व प्रेम दाखवतात मग विचारशील मनुष्याने किती थोरपणाने वागले पाहिजे बरे?

Subscribe to:
Posts (Atom)