Tuesday, September 9, 2014

नरेंद्र मोदी यांचा शिक्षक दिन संदेश | Narendra Modi Teacher's Day Message



नमोंची नवीन कल्पक खेळी
निमित्त शिक्षक दिनाचे
संवाद साधला मुलांशी यावेळी 
संयोजन प्रसार माध्यमांचे


अठरा लक्ष शाळा सामील 
मुलामुलींनी आणली बहार
प्रथमच अनुभवला देशाने
पंतप्रधानांशी थेट संवादाचा थरार


प्रारंभीचे बोल नेमके 
ठाम प्रेरक बोधक वक्तव्य 
सांगितले शाळकरी मुलांना 
तुमच्या हातीच देशाचे भवितव्य


उत्तरोत्तर रंगला जश्न
प्रश्नोत्तराचा तास 
मुलांचे विविधरंगी प्रश्न 
अन् मोदींचे उत्तर खास


विचारता कशी वाटते राजधानी 
आलात मायभूमी सोडून 
म्हणाले व्यस्त कामातच
दिल्ली पहायचे गेले राहून


विषय येता जपान भेटीचा
जिद्द शिस्त स्वावलंबनाने केले स्तिमित
देशप्रेम एकोपा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा
घडवू आपला देश असाच इच्छा अपरिमीत


यातून काय लाभ पुसता
न मो झाले व्यथित
ध्येय असता देशकार्याचे
लाभ नसावा मनात


नाचा बागडा भरपूर खेळा
फावला वेळ द्या वाचनास
वने उपवने डोंगरांच्या माळा
पाऊस वारा ऊन चांदणे दाखवा लोचनास


समारोपाचे शब्दही समर्पक
फिटले पारणे मुलांचे 
मानले आभार माध्यमांचे
न् सर्व उपस्थित जनांचे


माळी राबतो अन् फुलते बाग
जशी सुंदर फुले मिळती देवाला 
तशीच घडवून पिढी उद्याची
करू अर्पण राष्ट्राला ॥

No comments:

Post a Comment