Showing posts with label नवरा बायको. Show all posts
Showing posts with label नवरा बायको. Show all posts

Friday, July 17, 2015

तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?


लग्नाला बारा वर्ष झाल्यावर
अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ..
."तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"
तो बावचळला ... गोंधळला ...
आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !
प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ...
तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी
हा प्रश्न यायचाआणि त्याच्याकडे ही
एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ..
.पण मग लग्न झालं ..
.संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता
सोडवता ही असली तोंडी परीक्षा
पार विस्मरणात गेली ...
आणि काल परवा अचानक हा
गुगली पडला ...
त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा
ती पोळ्या करत होती ..हातात लाटणं ...
समोर तापलेला तवा ...
त्यानं संभाव्य धोका ओळखला ..
आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे .
.संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...'
असं म्हणून तो कामावर सटकला ... !
तो घरातून बाहेर पडला खरा ...
पण घर काही डोक्यातून बाहेर
पडलं नव्हतं .. !
अख्खा दिवस शब्दांची जुळवा
जुळव करण्यात गेला ...
कठीण असतं हो ...
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं
की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं ..
तो विचार करत होता ..काय सांगावं .. ?
मी राजा .. तू माझी राणी
वगैरे काही म्हणावं का ...नको ..
फार फिल्मी वाटतं ..तू खूप छान आहेस ..
.असं म्हणावं ... नको ...
तिला ते फारच रुक्ष वाटण्याची
शक्यता आहे .
.समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...
तर ती नक्की म्हणेल ..
.राजकारण्यां सारखी उत्तरं देऊ नकोस ...
त्याला काहीच सुचेना ...
बायकोला आवडेल असं वागणं
आणि तिला पटेल असं बोलणं ...
हे दोन्ही शिकवणारे क्लासेस
असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ..
.त्याच्या मनात असले भलभलते
विचार येत होते ..सूर्य मावळला ...
घरी जायची वेळ झाली ..
आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या
उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ...
याची त्याला खात्री होती ...
घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या
विद्यार्थ्या सारखा त्याचा चेहरा झाला होता ...
त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षे प्रमाणे तिनं दार उघडलंच नाही ..
त्याच्या मुलानं दार उघडलं ...आणि
पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा
घमघमाट नाकात शिरला ...
मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ...
"भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय
धुवून या ..."
तो मान डोलावून आत गेला ...आणि
पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ...
बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ..
त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं
तिच्याकडे पाहिलं ...
तिनं तोंडभर हसून विचारलं ..
"काही सुचलं ... ?
"त्यानं नकारार्थी मान हलवली ...
तशी ती पटकन टाळी वाजवून
आनंदानं म्हणाली ...
"मलाही नाही सुचलं ... !
"तो पुन्हा गोंधळला ...इतकी
अनपेक्षित प्रतिक्रिया ... ?
आणि ती बोलतच होती ...
"काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं
मला विचारलं ...
तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ?
"सात दिवस विचार केला ..पण
मला काही सांगताच येईना ..
.मग भीति वाटली ...
माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ?
अपराधी वाटायला लागलं -
काय करावं कळेना ...
मला स्वतः विषयी शंका होती
पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम
कणभर ही आटलेलं नाही याची
खात्री होती.
म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ..
.वाटलं ..तुला उत्तर देता आलं तर
आपण 'Fault' मध्ये आहोत ..
पण नाही ... तुलाही उत्तर देता
आलं नाही ...म्हणजे आपण आता
अशा वळणावर आहोत ...
जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं'
सुरु झालंय ..
.आता शब्द सापडत नाहीत ...
आणि त्याची गरजही वाटत नाही ...
कारण आता एकमेकांसमोर स्वतःला
सिध्द करण्याची धडपड संपलीय ...
"असं म्हणून तिनं एक कांदा भजी
त्याला भरवली ...""
त्याच्या बारा वर्षाच्या संसारा मधला
सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होत...!!!


लेखक: अनामिक
WhatsApp वर वाचनात आले आणि आवडले म्हणून शेअर केले आहे . लेखकाचेचे नाव कळल्यास श्रेय देण्यात येईल.

Friday, June 13, 2014

|| बायको नावाचं यंञ || - Marathi bayako....

वटपोर्णिमा आली आणि मी बायको या विषयावर काही कविता शोधत  होतो. आणि मला असे आढळले कि आपल्या इंटरनेट वरील ब-र्याच मित्रांनी खूप काही लिहून ठेवले आहे. कविता , विनोद आणि खूप काही.
म्हणूनच हि पोष्ट डेडिकेटेड टू ...

|| बायको नावाचं यंञ ||


बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र...!
सकाळच्या गजराबरोबर सेवेस हजर,
पेस्ट आणि ब्रश दिसेल, पहिले जिथे जाईल नजर,
गरम पाणी, श्यांपु, टॉवेल, साबण, असेल सुसज्ज बाथरुम,
अंगातल्या कपड्याबरोबर चहा असेल हजर,
असंच असतं रोज सकाळचं सत्र..!
बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र...!
ऑफीसला जातांना गरमागरम डबा, आणि गोड मुका,
संध्याकाळी परत स्वागत, घालून पोटात दिवसभरच्या चुका,
हातातली बॅग टेबलावर जाते, संध्याकाळच्या चहा बरोबर,
'अहो ऐकले का' म्हणून ऐकू येतात गोड गोड हाका,
तिच जाणो तिचे हे अजब तंत्र..!
बायको म्हणजे देवाने घडलेले अप्रतीम यंत्र...!‌
रुचकर जेवणा बरोबर गप्पांची फोडणी असते,
डोळा लागे पर्यंत भांड्याशी तीचे युद्ध सुरुच असते,
सगळ्या घरावर शेवटचा हात मारुन,
पदराला हात पुसत गालात खुदकन हसते,आणि
कानात पुटपुटते प्रेमाचा मंत्र..!
बायको म्हणजे देवाने घडलेले अप्रतीम यंत्र..
जेवले का हो.. म्हणून आठवण करून देणारे,
मनातल्या भावना लगेच जाणून घेणारे,
जीवनाच्या वाटेवर ऊन असो वा सावली,
नेहमीच सोबत देणारे, आधार होणारे,
असे आहे बायको नावाचे यंत्र...!

-------------------------------- काही विनोद या बायको नावाच्या यंत्रावर -----------------
मागच्या वर्षी मी बसमध्ये
दोन स्त्रियांमधली ऐकलेली चर्चा.
त्यातली एक दुसरीला सांगत होती -
"अगं, काल (वटपौर्णिमेच्या दिवशी) मला
रजाच मिळाली नाही.
शेवटी मी आमच्या कामवालीला सांगितलं,
जा गं जरा माझ्या वाट्याच्या
चकरा तू मार गं वडा ला ह्या वर्षी.
ती पण बिचारी गेली गं बाई आणि
आनंदाने चकरा मारून आली.
अश्या कामवाल्या मिळायला पण भाग्य लागतं गं. "
 
------------------------------------------------------------------------------------------
 
गंगुबाई :- फौजदार साहेब;
सापडतील का हो आमचे हे ?
चार दिवस झाले गायब आहेत;
फौजदार :- काही काळजी करू नका
कालच पर्वती जवळ त्यांचे मोजे सापडलेत: त्याचा वास आम्ही कुत्र्याला दिलाय....
.
.
.
.
.
कुत्रा शुद्धीवर आला की आपण तपास सुरू करू!! 

----------------------------------------------------------------------------------------------------

बायको : अहो ऐकलत का, ब-याच दिवसंपासुन तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे.
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो.
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा.

-------------------------------------------------------------------------------------------------

  


आणि जाता जाता खालिल छोटासा किस्सा नक्की वाचा आणी सुखी संसाराचे सूत्र ध्यानात ठेवा.

एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!
एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य
केल ??
नवरा-
आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो,
घोडेस्वारी करताना माझी बायको
ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने
उडी मारुन
बायकोला खाली पाडली..
ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली "हे तुझ
पहिल्यांदा झाल",
थोडावेळाने
पुन्हा तेच घडल. ती परत बोलली " हे तुझ
दुसर्यांदा झाल"
आणि जेव्हा ते
तिसऱ्याँदा घडलं तेव्हा तिने बंदुक
काढली आणि घोड्यावर
गोळी झाडली.
मी ओरडुन बोललो, ए बावळट, तु
घोड्याला मारलस पागल.
तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली "हे तुझ
पहिल्यांदा झालं".
आणि तेव्हापासुन आम्ही आनंदी संसार करतो
तेव्हा  स्वत: च्याच  बायकोचा आदर करा ..!