सौमित्र : कविता
मी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more
Wednesday, February 20, 2013
Saturday, January 5, 2013
चितळ्यांची बाकरवडी
"चितळ्यांची बाकरवडी"
ऐकीव पण इंटरेस्टिंग…चितळ्यांचं कुमठेकर रस्त्यावरील दुकान. वेळ रात्री आठ वाजता म्हणाजे दुकान बंद होण्याची.
मालक चितळे स्वत: कुलूप लावायच्या तयारीत..त्याच क्षणी एक माणूस बंद होणार्या शटरच्या खालून जवळपास लोळणघेत आत घुसला…चितळ्यांनी त्याला आडवायचा प्रयत्न केला पण तरीही तो चिवट माणूसशेवटी घुसलाच.
चितळ्यांनी खवळून त्याला काय पाहिजे म्हणून विचारलं…” बाकरवडी..” अपेक्षित उत्तर आले.
”किती वाजले घड्याळात…? आठ वाजले ते दिसत नाही. का घड्याळ चुकीची वेळ दाखवतंय..तसं असेल तर बाकरवडी ऐवजी घड्याळ घ्या… ” चितळे त्याच्यावर वतागले.
” मला बाकरवडी हवीय..”" मिळणार नाही.. दुकान बंद झालेय… उद्या या..”" बाकरवडी..”" शक्य नाही… आता बाहेर पडा आधी… “चितळ्यांचा संताप अनावर झाला.
तो माणूस बाहेर पडत नाही हे बघूनचितळ्यांनी शटर ओढले आणि तो माणूस आणि चितळे स्वत: दुकानात कोंडले गेले.
दोन मिनिटांनी आतला वाद वाढला तशी बाहेर गर्दी जमा झाली.गर्दी वाढतच गेली तसे वादही वाढले. मग आतून मारामारीचे,आपटाआपटीचे आवाज ऐकायला येऊ लागले.. काहीतरी फुटल्याचे आवाजआणि माग कुणाचातरी जोरात ओरडण्याचा आवाज…गर्दी अवाक होऊन बघत होती.इतक्यात शटर परत किलकिले झाले आणि तो माणूस जिवाच्या आकांतानेबाहेर पडला आणि पळायला लागला…
मागोमाग चितळे बाहेर आले. चिडलेले, घामेजलेले पण तरीही चेहर्यावर एक समाधान घेऊन…” काय झालं हो…?”
गर्दीतून कुणीतरी विचारले.” बाकरवडी पाहिजे होती… आठ वाजल्यानंतर आत आला ..आणि नाही म्हटले तर हातघाईवरच यायला लागला…मग दाखवले चौदावे रत्न… आठ वाजता बाकरवडी मागतो म्हणजे काय…वेळेचे भान आहे की नाही..”" कोण होता हो…?” गर्दीतील उस्तुक प्रेक्षकाने विचारले…” होता कुणीतरी मद्रासचा भामटा … “शिवाजी गायकवाड” म्हणून… “चितळ्यांनी शटर ओढून कुलूप लावले आणि ते घराकडे निघाले…! ;-p ;-p ;-p
Monday, December 31, 2012
आज माझ्या जीवनाला एक नवा सुर मिळाला
आज माझ्या जीवनाला
एक नवा सुर मिळाला
रातराणीच्या फुलांना
आज नवा गंध मिळाला
तुझ्या आज असण्याने
मन माझे धुंद आहे
याच धुंदिचा आनंद
अंगणात मंद आहे
“शब्दांमध्ये व्यक्त करणे
मला निदान शक्य नाही
भावनांच्या गुंतागुंतीत
तुला शोधणे शक्य नाही”
वसंत होता श्वासही होता
पण तेव्हा तू नव्हता
फरक आता इतकाच आहे
माझ्या मनी तू आहेस
आता प्रत्येक पावसात मला
फक्त एकच गोष्ट हवी
कुशीत मला ओढून घेशील
साथ इतकी तुझी हवी
आता माझ्या प्रत्येक गोष्टीत
एका सुखाचा भास असतो
भासाच्या त्या प्रत्येक क्षणात
तुझ्या असण्याचा नाद असतो
एकच आता मला तुला
सांगावेसे वाटते
तुझ्या हरएक दुःखात तू
मला ओढून घे
काठावरतीच आहे अजून
हळूच मला कुशीत घे
सुकलेली फुलं..
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात...............

Wednesday, December 26, 2012
पत्नी प्रसन्न व्रत
पत्नी प्रसन्न व्रत
संसारात पत्नीच्या त्रासाला कंटाळलेला चंद्रसेन मार्गदर्शन घेण्यासाठी सोमदत्त या अनुभवी गुरुकडे गेला, तेव्हा सोमदत्ताने त्यास ‘पत्नी प्रसन्न व्रता’ची माहिती सांगितली. तो म्हणाला-
हे चंद्रसेना, मी आज तुला पत्नी प्रसन्न व्रताची सविस्तर माहिती सांगणार आहे. ती तू भक्तिभावाने श्रवण कर. या व्रताचे पालन करणार्याचा संसार सुखाचा होतो याबद्दल शंका बाळगू नकोस. या व्रतामध्ये पत्नीला प्रसन्न ठेवण्यासाठी करावयाचे विधी सांगितले आहेत. सर्व वयोगटातील विवाहित पुरुषांना हे व्रत करता येईल. या व्रतासाठी साधकाने आपली मनोदेवता आपली पत्नीच आहे, हे मनावर बिंबविणे आवश्यक आहे. अशा प्रकारची भूमिका एकदा निश्चित केली, की मग या देवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा. प्रातःकाली पत्नीदेवतेचे दर्शन घेऊनच कार्याला लागावे. निद्रादेवतेने बहाल केलेल्या सुखाची रक्तिम कांती असणार्या या देवतेचे रूप प्रातःस्मरणीय असते. हे रुपडे मनात साठवून ठेवल्यास दिवसभर कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि शारीरिक विश्रांतीची गरज उरत नाही. श्रमाला प्रतिष्ठा देणारी ही देवता आहे हे समजून घे.
या व्रतामध्ये, पतीने पत्नीआधी जागे होणे आवश्यक आहे. पत्नीदेवीच्या सेवेसाठी रात्री गोंधळ घातला असेल, तरी पहाटे तिच्या झोपेत व्यत्यय येणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. सर्वप्रथम अंथरूण, पांघरूण, उश्या इत्यादी वस्तू व्यवस्थित घड्या घालून निर्दिष्ट करण्यात आलेल्या जागेवर ठेवून द्याव्यात. पत्नीदेवतेचा स्वतःचा अवतार कसाही असला, तरी भक्त मात्र अजागळ असणे तिला आवडत नसते. यास्तव सेवकाने दाढी, आंघोळ आदी प्रातःकालीन कार्ये ती जागी होण्यापूर्वी पूर्ण करावीत आणि संपूर्ण शुचिर्भूत होऊन, प्रसन्न मुखकमलाने तिला जागे होण्याची विनंती करावी. अशा वेळी फाजील लाडात येणे, म्हणजे स्वतःच्या अपमानाला निमंत्रण होय, हे पक्के ध्यानात ठेवावे. मुखप्रक्षालन वगैरे करून पत्नी तयार होताच चहा करते. कारण, अशा चवीचा आणि मनाला व शरीराला चैतन्य प्राप्त करून देणारा चहा फक्त तिला (आणि तिच्या आईलाच) येतो, यावर उपासकाचा विश्वास असावा. रोज पत्नीच्या हातचा चहा घेताना, ‘तुझ्या हातचा चहा म्हणजे… व्वा!… क्या बात है! ‘ हे वाक्य कंटाळा न करता रोज म्हणावे. या वाक्याचा सराव होण्यासाठी सर्रास खोटे बोलता येणे आवश्यक आहे. असा चहा घेतल्यानंतर मनास चैतन्य येवो अथवा न येवो, परंतु शरीराच्या पोट नावाच्या अवयवाची चेतना जागृत होते आणि पायांना हालचाल करून घरातील कोपरा गाठण्यासाठी धावाधाव करावी लागते. तिच्या हातचा चहा घेताच तत्काळ ओक्के.. होत असले, तरी परतताच ‘ तुझ्या हातचा चहा म्हणजे… व्वा!.. क्या बात है! ‘ असे मनापासून म्हणावे.

हे चंद्रसेना, वरीलप्रमाणे पत्नी प्रसन्न व्रताचे जो निष्ठेने पालन करील, त्याच्या संसारामध्ये शांतता आणि सौख्य सदैव नांदत राहील याबद्दल तू निःशंक रहा. असे संसार घटस्फोटांपासून शेकडो योजने दूर राहतील. अशा घरांमधील संतती आज्ञाधारक, शिस्तप्रिय आणि आदर्श नागरिक होईल. या व्रताचे पालन न केल्यास, तशा संसाराचे गलबत दिशाहीन होऊन किनार्यावरील खडकावर आदळून त्याचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही हे निश्चित!
_Regards -
Ashish Vijay Kadam
Subscribe to:
Posts (Atom)