Thursday, December 19, 2013

फुल टू धमाल

फुल टू धमाल
वडील अडाणी असतात
आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent)
उभारतात आणि त्यात झोपी जातात.
काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात
वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय
दिसतंय..?
मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.
वडील: ते तुला काय सांगत आहेत?
मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात
कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत
कि आपला तंबू चोरीला गेला..
( शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो)

Friday, December 13, 2013

हे साले मित्र सगळे असेच असतात

हे साले मित्र सगळे असेच असतात,
चिडवून सतावून जीव नकोसा करतात,  तरीही नेहमी हवेसेच वाटतात.
लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून ' आयटम सही है' म्हणून चिडवतात , लग्ना नंतर तीलाच आदराने वहिनी अशी हाक  मारतात .े 
हे साले मित्र सगळे असेच असतात....
जेवताना एकमेकांच्या  डब्यावर सगळ्यांचीच नजर असते,  खास  पदार्थ  सर्वाना पुरेल ,याची मात्र खात्री नसते.
पण... एखाद्या दिवशी डबा नाही आणला, तरी  आपलेच ताट  इतरांपेक्षा जास्त भरते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...
नाक्यावारती गप्पा मारताना..
तीन में पाँच - बिस्किट के ल चहाची अशी ओर्डर सुटते, बिल भरण्याची वेळ आली कि सर्वांचीच पांगा पांग होते ,
मात्र अचानक कधी बाबाना admit करावे  लागते,  आहोत आम्ही पाठीशी म्हणत advance नकळत भरले जाते.
हे  साले मित्र  सगळे  असेच असतात ...
अवचित एखादा  प्रसंग ओढावला तर सख्खे नातेवाईक ही पाठ फिरवतात, अशावेळी छळनारे हेच मित्र पाठीशी  भक्कमपणे उभे राहतात, रक्ताच्या  नात्या पेक्षा ही मैत्रीचे नाते  श्रेष्ठ  ठरवितात.
हे साले मित्र सगळे असेच असतात, चिडवून सतावून जीव नकोसा करतात,  तरीही नेहमी हवेसेच वाटतात.

दहावी पेपर- कारणे द्या

प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या;
गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ
त्याच्याशी गप्पा मारतो , म्हणून.
------------------------------------------
प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४ ओळीत) माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते.
त्यांचे नाव तुकाराम होते.
लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.
------------------------------------------
प्रश्न - कारणे द्या;
उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते.
उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो,
तर थंडीत त्याउलट लहान होतो.
------------------------------------------
प्रश्न- खालील बाबतीत काय होईल ते सांगा-
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास!
उत्तर- ग्लास काळा होईल.
------------------------------------------
प्रश्न- मराठीत भाषांतर करा.
चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
उत्तर -चिमण्या झाडावर चहा पितात.....
------------------------------------------
धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!

संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ
या ओळिचा अर्थ काय ?
.
.
.
.
.
.
बंड्या : तु झोपुन जा आई,
मी ज्योती च्या घरी जात आहे....
.
संस्कृत चे शिक्षक कोमात
बंड्या आपला जोमात...

Saturday, November 30, 2013

एक शिकवण !



एका गाढवाची गोष्ट

एका गाढवाची गोष्ट

'का, गाढवीणबाई? अशा खिन्न का?'

'काय सांगू बाई तुला? आमच्या जोडीदार गाढवांची हकीकत कळली नाही का तुला?'

'त्या भयंकर लाथाळीची ना?' शेपूट वेळावीत गाढवीण म्हणाली.

'हो!' कुठल्याशा अध्यक्षीणबाईच्या गळयात पडलेला सुकलेला हार खुराने उडवीत पहिली गाढवीण म्हणाली. 'खरं सांगू का तुला?' 'काय?' 'हा लाथाळीचं कारण मला ठाऊक आहे. पण म्हटलं, उगीच दुसऱ्यांच्या भानगडीत आपण का पडा?' 'काय ते?' कानांना नाजुक हिसडा देत गाढवीण म्हणाली. तिच्या काळयाशार नाकपुडया थरथरत होत्या. 'विचारलंस तर सांगते बापडी! परवा काय झालं, मी आणि नाम्या कुंभाराची गाढवीण चरायला निघालो होतो. मी आपली नेहमी इथे भगिनी-समाजापुढे चरायला येते. इथे पुष्कळ अहवाल, भाषणं, प्रसिद्ध महिलांचे संदेश, वगैरे खायला मिळतात. आणि मागच्या खेपेपासून मला ही वर्तमानपत्रं पचेनाशी झाली आहेत. पण नाम्या कुंभाराच्या गाढवीणीनं आग्रह केला म्हणून वाचनालयापुढचा उकिरडा फुंकायला गेले मी! तिथे तुझे ते दोन गाढव आले होते. आणि कुणाला सांगू नकोस, पण दोघांनीही दोन निरनिराळ्या संपादकांची साप्ताहिकं खाल्ली. तेव्हापासून तिथेच त्यांची लाथाळी सुरु झाली... मागे एकदा त्या एका गाढवाने कसला मजूर पुढाऱ्याच्या भाषणाचा कागद खाल्ला होता, तेव्हा तो त्याच्या कुंभारालाच लाथा मारायला लागला होता.

'पण याला उपाय काय बाई?'

'अगं, सोपा आहे. गावात तो सिनेमा आहे ना तिथे नटींची चित्रं छापलेल्या जाहिराती वाटतात. पाच-पाच जाहिराती सकाळ- संध्याकाळ खायला घाल त्यांना. लगेच गप्प होतात की नाही पाहा.' असे म्हणून दुसरी गाढवीण 'महिला आणि क्रांती'तले उरलेले भाषण खाऊ लागली. पहिली गाढवीण सिनेमाच्या रस्त्याने धावू लागली.

'तिच्या धावण्यात एक मुक्त आनंदाचा अटूट आविष्कार होता' असे वाङमयमंदिरापुढे उभा असलेला एक गाढव नंतर कोणालासे सांगत होता.

..(-उरलंसुरलं)