वाचण्यात आलेली एक सुंदर कविता
Need small break... Marathi Poem
थोडा ब्रेक हवाय...
थकलोय मी फार,
थोडा break हवाय यार.
धावपळीतून थोडेतरी क्षण विश्रांतीचे चार,
थोडा break हवाय यार.
किती वाटलं ओझं तरीही
ते माझंच आहे,
जरी ते माझंच असलं तरी
ओझ ते ओझंच आहे.
थोडावेळ तरी उतरवून
ठेवू का हा भार ?
थोडा break हवाय यार.
ढिगभराच्या कष्टामधून
मुठभरसं सुख हवंय.....
घास सुखाचा खाण्यासाठी निवांत वेळ कुठंय.
आज थोडं थांबू द्या,
उद्या होईन ना मी तयार.
थोडा break हवाय यार.
future च्या plans मुळे
present वरच पडलंय पाणी...
ambitions चा गळ टाकून अदृश्य बसलंय कोणी.
home loan फेडता फेडता
Home मधेच alone झालोय.....
corporate targets पूर्ण करून emotionless zone झालोय.
before forty सर्व पार करायचय distance is so far.
थोडा break हवाय यार.
कळलंच नाही कधी पाऊस गेला
कधी थंडी आली
आणि काय काय झाले बदल.....
कळलंच नाही कधी झाली आपलेपणाची पानगळ...
गर्दीत ओळखीच्यापैकी कुणालाच ओळखता येत नाही....
तेव्हा VanHusen चा shirt हि थेंबभराच सुख देत नाही.
कळत नाही कधी
झालो इतका परका....
smile च्या formality मुळे प्रत्येकजण,
दिसतो एक सारखा.
हा status,
कि space सबकुच वाटतेय बेकार....
खरंच थोडा break हवाय यार...
थोडा break हवाय यार...
Poet : Unknown Yet
No comments:
Post a Comment