Saturday, August 30, 2014

Meaning Of Shri Ganesha's Aarti - आपल्या लाडक्या गणेशाच्या आरती चा अर्थ

.

आपल्या लाडक्या गणेशाच्या आरती चा अर्थ

 Meaning Of Shri Ganesha's Aarti
आरती चा अर्थ समजुन ती म्हणल्यावर अजुन
चांगला देवा प्रतीचा  भाव चांगला होतो.
आणि हा अर्थ गणपती बसायच्या आत सगळ्या
पर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करा.


सुखकर्ता दु:खहर्ता.
म्हणजे :- (सुख देणारा दुःख हरण करणारा)
नुरवी
म्हणजे :-दुःखाचा समुळ नाश करतो.
पुरवी प्रेम कृपा जयाची.
म्हणजे :-त्याची कृपा झाली की प्रेमवर्षाव
भक्ताला लाभ होतो.
सर्वांगी सुन्दर उटी शेंदुराची ।।
म्हणजे:-  गणेश सर्वांगाने सुंदर आहे.
त्याने शेंदुराची उटी लावली आहे ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।।
म्हणजे :- त्याच्या कंठात मोत्याची माळ
झळाळत आहे ।।१।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे  मन : कामना पुरती ।।धृ।।
म्हणजे:-हे देवा ,तुझा जयजयकार असो !
तु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस । तुझ्या केवळ
दर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ।।धृ।।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
म्हणजे:- हे गौरीकुमारा रत्न जडवलेला
मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
म्हणजे :-कुंकू आणि केशर मिश्रित
चंदनाची उटी तु लावली आहे ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
म्हणजे :-हिरयानी जडलेला मुकुट तुझ्या
मस्तकावर शोभून दिसत आहे.
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।।२।।
म्हणजे :-तुझ्या पायांतील वाळ्यांतील
घूंगरां चा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे ।।२।।
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
म्हणजे :-मोठे पोट असणारया ,पीतांबर
नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला.
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
म्हणजे :- सरळ सोंड व वाकडे तोंड असणारया,म्हणजे
वक्रमार्गाने (वाईट मार्गाने)
चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुण
त्याना सरळ मार्गावर आणणारया, त्रिनयना
(३ नेत्र असणारया).
दास रामाचा वाट पाहे सदना ।
म्हणजे :- हे गणपते मी रामाचा दास
( समर्थ रामदासस्वामी) माझ्या घरी मी तुझी
आतुरतेने वाट पहात आहे.
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।३ ।।
म्हणजे :- हे सुरवरवंदना - सर्वश्रेष्ठ देवां कडून वंदिल्या जाणारया हे गजानना, सर्व
संकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ कर.
निर्वाणी - अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी
तु  माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्राथना .

     -समर्थ रामदास स्वामी.
(संदर्भ :- आरतीसंग्रह अर्थासह सनातन लघुग्रंथ ).

लक्षात ठेवा 'संकटी' पावावे संकष्टी नाही

No comments:

Post a Comment