Wednesday, February 5, 2014

Sukh - सुख A Nice Book By Mr. Ganesh Shinde

Sukh सुख


सुख 
सुख कशाला म्हणतात. ते आज कसं हरवलं आहे ? का हरवलं आहे ?
आपल्या पासून दूर असलेल्या वस्तूंच आपल्याला आकर्षण असते. आणि त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण धडपडत असतो. आणि आपल्या जवळ असलेल्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही.......
गणेश शिंदे यांच्याच आवाजात ऐका. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा व प्ले बटणवर क्लिक करा.

A Very Nice Book By Mr. Ganesh Shinde.
A small sound clip of the same book - Sukh ,in his own voice is here.
Its a must read book. You can listen to this sound clip and experience the same.



Saturday, February 1, 2014

फाळणी - Poem By Saurabh Vaishampayan

PHALANI-
Marathi Poem By Saurabh Vaishampayan

"फाळणी"
परवाच एका स्फोटात मेलो
पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो
स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता
सरळ जाण्याचा हाच एक फायदा होता ---१
स्वर्गात जाताच टिळक भेटले
नमस्कार म्हणताच प्रसन्न हसले
,-- टिळकांनी विचारले...
कय रे स्वातंत्र्यानंतर काही बदललंय का नाही?
म्हटलं, छे हो, सरकारचं डोकं ठिकाणावर नाही
तिथून लगबगीने सुभाषबाबु आले
विचारु लागले खाली नेमके काय झाले? -- २
मी म्हणालो, नेताजी काय काय म्हणुन घडतय
हल्ली
फक्त आमदारच म्हणतात चलो दिल्ली!
नेताजी, आजही आम्ही स्वातंत्र्यासाठी रक्तच
देतो,
फक्त 'खुन' आमचं असतं आणि आझाद काश्मिर
होतो! --३
तितक्यात... दुरवर सावरकर दिसले म्हणुन
धावलो,
म्हटलं 'तात्या' आज जन्माचं पुण्य पावलो
म्हटलं सध्या तरी सगळं कसं निवांत आहे
स्वर्गात कॉंग्रेस वाला नाही तर सगळं कसं शांत
आहे. --४
त्यांनाच विचारलं..
तात्या इथे सध्या शिवराय कुठे हो राहतात?
म्हणाले, ते पहा सौधातुन आपल्याकडेच पाह्तात!
'छत्रपतिंचा विजय असो'म्हणुन चटकन हात
जोडले
पण घडलं भलतच, ते माझ्यावरच ओरडले,
-काय रे? कोणत्या जेम्स लेनने म्हणे
बत्तमिजी केली?
तुमची अक्कल तेव्हा सांगा कोठे चरायला गेली?
--५
मान वर करायची माझी हिम्मत होत नव्हती
आणि महाराजांची नजर माझ्यावरून ढळत नव्हती!
कबुल आहे महाराज, तुमची स्वप्नं
आम्हाला कळलीच नाही
पैसा सोडुन आमची नजर, दुसरीकडे वळलीच नाही
पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे सावज हेरतात
ब्र म्हणायचा अवकाश, लगेच गाढवांचे नांगर
फिरतात. --६
सगळं ऐकुन महाराजांच्या गालावरचे कल्ले थरारले
आमचं केविलवाणं जगणं बघुन डोळ्यांत
पाणी तरारले,
क्षणभर राजेपण विसरुन ते दुःखाने थरथरले,
आणि मग आमचं अस वागणं बघुन रागाने
बिथरले. --७
पाय लटपटले...
वाटलं आता कम्बख्ति भरलीच म्हणुन समज,
चुकीची शिक्षा, आता गर्दन मारलीच म्हणुन
समज
पण मेलेल्याला मारायला ते 'खुर्चीतले नेते'
नव्हते,
न्याय-कठोर असले, तरी ह्रदय त्यांचे 'रीते'
नव्हते. --८
म्हणाले, नांव सांग फक्त, खाली जाऊन समाचार
घेतो,
सांगितलं खाली 'लोकशाही'त प्रत्येकाचा विचार
होतो,
खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो
आणि पैसेवाला दुस-यांच्या जिवाशी खेळतो --९
फक्त एकच काळवीट मारले म्हणत आपले
माजोरडे नाक उडवतो,
कोणीही आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडतो
महाराजांनी मुश्किलीने डोळ्यांतलं पाणी अडवलं,
कळलं हेच पातक आम्ही आयुष्यभर घडवलं.
--१०
मान खाली घालुन मग तसाच पुढे गेलो...
अहो आश्चर्यम! स्वर्गामध्ये औरंग्या भेटला
म्हणे काफरांना मारुन तर स्वर्ग गाठला.
जिन्हा सुद्धा होता तिथेच,
म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखांवर
जाईल,
आणि एके दिवशी मग
स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल... --११
कवी- सौरभ वैशंपायन

Out dated झालंय आयुष्य - Marathi Poem


ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार
(शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना
पहिला नंबर मिळाला. (Award winning Marathi Poem by Mr. Bablu Vadar)

Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही
जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे
hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website
एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute
computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय
floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही
विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते  facebook................


Sunday, January 19, 2014

Best Cartoons by Balasaheb Thackeray

Best Cartoons by Bal Thackeray

महाराष्ट्राचा वाघ जेव्हा हातात ब्रश घेतो व कागदावर रेषा काढतो तेव्हा त्यांच्या  वाणिप्रमाणेच कागदसुद्धा आपल्याला विचार करायला भाग पाडतो. त्यांच्या कुंचल्यामधून साकार झालेल्या व मला इंटरनेटवर दिसलेल्या काही कलाकृती इथे खास त्यांच्या चाहत्यांसाठी ठेवत आहे. सोबत त्या ज्या वेबसाईटवर पाहिल्या त्याची लिंक आहे.




















http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-different-strokes-of-bal-thackeray/20121119.htm

http://archive.mid-day.com/photos/news/between-the-lines/bal-thackeray-cartoons-1/

 

http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-different-strokes-of-bal-thackeray/20121119.htm#1

http://archive.mid-day.com/photos/news/between-the-lines/bal-thackeray-cartoons-5/


http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-different-strokes-of-bal-thackeray/20121119.htm#1








 

महाराष्ट्राच्या या वाघाला आणि त्यांच्या कलेला मानाचा मुजरा.

Friday, January 10, 2014

मराठी Girlfriend ची ठळक वैशिष्ट्ये…

Characteristics of Marathi Girlfriend.


१. जर तिची ओळख तुम्ही “माझी Girlfriend”
म्हणून करून दिली तर
ती रागावते.
२. चारचौघांसमोर जर तुम्ही तिला मिठी मारली तर
ती “जन गण मन”
गायला सुरु करते.
३. तिच्या आईला आपण “मावशी” किंवा “काकू”
म्हणतो.
४. समजा जर भयंकर जोराचं वादळ सुटलं
आणि विजा कडाडल्या, तर
हिंदी सिनेमातल्या नायिकेप्रमाणे ती तुम्हाला कधीच
मिठी मारणार नाही.
५. तुमच्याबद्दल जर तिला कोणी विचारले तर लाजेने
ती लालबुंद होते.
६. ती सहसा जीन्स आणि टाइट टी शर्ट वापरत
नाही पण हे मात्र गॄहीत धरून
चालते की तिचं करिअर तुमच्या करिअरइतकंच
महत्त्त्वाचं आहे.
७. तिला शाळेतल्या सगळ्या कविता आठवतात.
८. ती नेहमी “अमके अमके” सरांबद्दल बोलते….
आणि तुम्ही मनातल्या मनात
म्हणता….” काय पकवते आहे”.
९. राखी पौर्णिमेच्या दिवशी ती तुम्हाला भेटत नाही.
१०. तिचा भाऊ कधीच तुमचा मित्र नसतो.
११. घरात तुमच्या आवडीचा पदार्थ केलेला असेल
तर ती आठवणीने डब्यात घेउन येते.
१२. तुमची DATING कुठल्या तरी रेस्तौरन्त मधे
नसून
चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजा किंवा सिद्धीविनायकाच्या मंदिराजवळ
असते …

That is Called Marathi Girl friend