प्रिय " बाबा " यांस ,
मी मराठी: - हा कुठलाही फ़ुकटचा कोड कॉपी करुन देण्यासाठी बनविन्यात आलेला नाही. तसेच जे लोकांना एखादा विनोद एकणे,वाचणे म्हणजे वेळेचा अपव्यय (मराठीत टाईमपास) वाटतो त्यांच्यासाठी सुधा नाही. या ब्लॉगवरील सर्व साहित्या हे कुठल्या ना कुठल्या मेलधुन आलेले आहे व ते एका ठीकाणी ठेवायचे म्हणुन हा सगळा उद्योग केलेला आहे.(कानात ह्ळुच :- सर्व चोरलेले आहे) दोन घडी हसायचे असेल तरच इथे वेळ घालवा अन्यथा गुगल आहेच..... Marathi Poems, Marathi Jokes, Marathi Poems, Marathi Shayari and more
Thursday, August 21, 2014
A Letter To Dad...वडीलांस पत्र ..........
प्रिय " बाबा " यांस ,
Monday, August 18, 2014
किंग आर्थर नावाचा एक राजा होता. एका बेसावध क्षणी त्याच्या शेजारच्या राज्याच्या राज्याने त्याच्यावर हल्ला केला व त्यास कैद करून तुरुंगात बंदिस्त केले. पण तरुण आर्थरच्या विचारांनी त्याचे मतपरिवर्तन झाले अन त्याने आर्थरला जीवदान द्यायचे ठरवले. पण त्यासाठी त्याने आर्थरसमोर एक आव्हानात्मक अट ठेवली की तो आर्थरला एक प्रश्न विचारेल अन वर्षभरासाठी मुक्त करेल. तोवर जर आर्थर त्याचे उत्तर देऊ शकला तर आर्थरला कायमचे अभय नाही तर मृत्युदंड. तर तो प्रश्न होता की स्त्रियांना नेमके काय पाहिजे?
या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता मी मी म्हणणाऱ्यांनी हात टेकले होते तर तरुण आर्थरकडून हे उत्तर शोधणे जाणे म्हणजे चमत्कारच ठरला असता. पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वतःच्या राज्यात परतला. तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली त्यात त्याची राणी, नावाजलेले विद्वान, दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राज विदुषकाचेही मत घेतले. पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. पण काही जणांनी सुचवले की राजधानीच्या शहराबाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट, तिच्याशी सल्लामसलत कर, ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल. पण तिचा सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिद्ध होती.
हाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले. चेटकिणीने आर्थरचा प्रश्न नीट ऐकून घेतला व धूर्तपणे उत्तरली, "मी या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन पण त्याबदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्णा करावी लागेल; तुझा मित्र लॅन्सलॉटला माझ्याबरोबर लग्न करावे लागेल." सर लॅनस्लॉट आर्थरचा जवळचा मित्र होता व त्याची ओळख एक कुलीन व्यक्तिमत्त्व व शूर योद्धा अशी होती. तिची हि मागणी ऐकून आर्थर सर्वार्थाने हादरला. ती चेटकीण जख्खड म्हातारी व दिसायला अत्यंत कुरूप होती. तिच्या मुखात केवळ एकच सुळा होता. तिच्या कंठातून चित्रविचित्र आवाज येत राहायचे व ति जिथे जाईल तिथे दुर्गंध पसरायचा. आर्थरने तिची मागणी धुडकावून लावली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मित्राला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायचे पाप त्याला माथी घ्यायचे नव्हते. पण लॅन्सलॉटला जेव्हा हे कळले त्याने तडक चेटकिणीचा मागणी पूर्ण करण्याचा हट्ट आर्थरकडे धरला. तो म्हणाला माझ्या मित्राच्या प्राणांपुढे हा त्याग काहीच नाही. नाईलाजाने का होईना आर्थरने लॅन्सलॉटचे म्हणणे मान्य केले व लॅनस्लॉट व चेटकीण यांच्या विवाहाची घोषणा झाली.
तेव्हा चेटकिणीने आर्थरचा जीव वाचवणारे उत्तर दिले की "स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो". हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एका महान सत्याला उघड केले आहे. अन शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनांतून मुक्त केले. या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.
विवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरतच लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मंचकावर चेटकिणीऐवजी एक रूपगर्विता तरुणी बसली होती. धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की हा बदल कसा काय झाला? त्यावर ती म्हणाली की मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी त्या विकृत चेटकिणीच्या रूपात राहीन व उरलेला अर्धा काळ या रूपात. आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रूपात राहायचे अन कोणत्या वेळी या रूपात राहायचे हे तुला ठरवायचे आहे.
यावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुद्ध पर्यायांमुळे विचारांचे द्वंद्व सुरू झाले. दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पत्नी म्हणून मिरवता येईल पण रात्री एकांतात काय ? अन त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल ?
आता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे. तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता ?
तुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉटचे उत्तर वाचा.
कुलीन लॅन्सलॉट चेटकिणीला म्हणाला की आजपासून जरी तू माझी पत्नी असली तरी केव्हा कसे राहायचे हे ठरविण्याचा हक्क पूर्णपणे तुझाच आहे. तुला जेव्हा जसे आवडेल तेव्हा तू तशी राहा माझी कसलीही हरकत राहणार नाही. हे ऐकून चेटकीण लॅन्सलॉटवर खूप खूष झाली व तिने त्याला वचन दिले की ती चेटकिणीच्या रूपाचा कायमचा त्याग करेल कारण लॅनस्लॉटने तिला आदराने वागवले व तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क तिला दिला.
तात्पय॔:
बायकोला मनाप्रमाणे वागुद्या, नाहीतर गाठ चेटकीणीशी आहे.
😋😅
Saturday, August 16, 2014
लेखक : चंद्रशेखर गोखले यांची.. एंक खूप छान कथा...
A nice marathi story by Chandrashekhar Gokhale
ब्रोकरच्या थ्रू तिच्या वडिलानीच ते घर विकत घेतलं..
पून्हा घराची एक किल्ली त्याच्या हातात देत म्हणाले... मी माझ्या लेकीला ओळखतो तसा तुलाही..
सगळ्या गोष्टी भावनेच्या भरात करतोस... अगदी माझ्या लेकीशी लग्न सुद्धा..
पून्हा भावनेच्या भरात एकत्र यावसं वाटलं तर?
तसं व्हायला नको.. म्हणून ही रिकामी वास्तू तुझ्या हवाली करतो.. कधी वाटलं तर येऊन बसत जा
भरल्या घरा पेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी...
भावनेपेक्षा विचार जास्त ठाम असतात विचारांवर ठाम झालास तर घेतल्या निर्णयाचा पश्र्चाताप होणार नाही.. निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत दे
नाहीतर येऊन माझी मुलगी परत घेऊन जा...
आणि खरच तो ढळत्या दुपारी रिकाम्या घरात बसायला लागला.. कलंडणारी ऊन्ह आपल्या घरात अशी ऐसपैस पसरतात त्याला माहीतच नव्हतं.. मावळतीचा वारा अख्ख्या घराचा ताबा घेतो याची त्याला कल्प्नाच नव्हती..
एक चूकून राहिलेलं कँलेंडर होतं भिंतीवर वार्याने फडफडत होतं त्या फडफडण्याचा आवाज सुद्धा त्याला नवा होता... त्याने जवळ जाऊन बघितलं कसल्या कसल्या नोंदी त्यावर तिने करून ठेवल्या होत्या..कसली बीलं देण्याची तारीख, दूधाचा हिशोब, कामवालीचे खाडे,पेस्ट कंट्रोलची तारीख...सिलेंडर संपल्याची तारीख, ग्राहकचं सामान येण्याची तारीख...,इस्त्रीचे कपडे त्याचा हिशोब
या कशातच तो सहभागी नव्हता... अगदी तिच्या महिन्याच्या तारखा... तारीख पुढे गेलीतर....
त्याला गलबलूनच आलं या कशा कशातच आपण सहभागी नव्हतो.. ती एकटीचा डाव खेळत राहीली आणि आपण फक्त..तक्रार करत राहिलो..त्याला कँलेंडर समोर उभं राहणं शक्य होईना
तो बेडरूम मधे आला त्याने खिडकी उघडली खिडकीत तिने हौसेनं लावलेली शेवंती होती वाळून वाळून झूरायला आलेली तिला भिजवयला तो आतूर झाला कातर झाला.. पाणी घालायला भांड नव्हतं त्याने कूंडीच सींक मधे नेली यथेछ्च पाणी शिंपडलं तहानलेली शेवंती गटा गटा पाणी प्यायली.. आणि तोच तृप्त झाला..
तेव्ह्ढ्यात लँच कीने दार उघडल्याचा आवाज आला ती आली होती शेवंतीसारखीच .... तिला समोर बघून तो उनमळून गेला ... काय अवस्था करून घेतली आहे हिने... हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं आलं नाही? ... की आपण लक्षात घेतलं नाही?
जिद्दीला पेटून भांडते तेंव्हा ती कुठल्याही टोकाला पोहोचते हे काय आपल्याला लग्नाआधी माहीत नव्हतं?...
दोघांची नजरा नजर झाली... दोघे क्षणभरासाठी स्तब्ध
ती म्हणाली मी ही शेवंतीच न्यायला आले होते...
तो म्हणाला आत्ताच पाणी दिलय... तिचं निथळणं संपेपर्यंत थांब...
आणि ती थांबली...
Saturday, August 2, 2014
थोडा ब्रेक हवाय... Need small break... Marathi Poem
Tuesday, July 29, 2014
१०) संपूर्ण वारी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही. ह्या कीर्तन सेवा श्री हैबतबाबांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार पाडत आहेत.