Sunday, March 8, 2015

जागतिक महिला दिन साजरा करताय ? तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटुन घेऊ नका.



उद्या कदाचित तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटुन घेऊ नका. कारण ती काहीच चुकीचं विचारत नाही.
विचार करायला लावणारा ,
ह्रदयाला भिडवणारा.......
तिचा फक्त एकच प्रश्न .......
देह माझा ,
हळद तुझ्या नावाची .
हात माझा ,
मेहंदी तुझ्या नावाची .
भांग माझा ,
सिंदूर तुझ्या नावाचा .
माथा माझा ,
बिंदिया तुझ्या नावाची .
नाक माझे ,
नथ तुझ्या नावाची .
गळा माझा ,
मंगळसूत्र तुझ्या नावाचे .
मनगट माझे ,
(बांगड्या) चुडा तुझ्या नावाच्या .
पाय माझे ,
जोडवी तुझ्या नावाची .
आणि हो.....
वडीलधा-यांच्या
पाया मी पडते ,
आणि ......
अखंड सौभाग्यवती भव ।
आशिर्वाद मात्र तुला.
वटपौर्णिमेचे व्रत माझे ,
आयुष्याचे वरदान तुला .
घराची काळजी घ्यायची मी,
दरवाजावर नावाची प्लेट तुझी.
नाव माझे ,
पण त्यापुढे ऒळख तुझी .
इतकच काय .......
ऊदर माझे ,
रक्त माझे ,
दूध माझे,
आणि मुलं ?
मुलं तुझ्या नावाची .
माझं सगळच तर,
तुझ्या नावाचं......
तक्रार नाही ...
प्लिज रागाऊही नकोस,
अत्यंत नम्रपणे
एक प्रश्न विचारतेय..
एवढच सांग.....
तुझ्याकडे  काय आहे का रे,
माझ्या नावाचं ?


°°°आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी°°°
°°°तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी°°°
°°°अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते°°°
°°°स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते°°°
°°°अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का°°°
°°°तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का°°°
°°°कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे°°°
°°°वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे°°°
°°°भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने°°°
°°°स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे°°°
°°°साडी मस्त शोभतीये आज--मनमोकळी दाद दे°°°
°°°सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने°°°
°°°मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे°°°
°°°वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे°°°
°°°वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे°°°
°°°पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे°°°
°°°झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे°°°
°°°जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे°°°
°°°हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे°°°
°°°नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे°°°
°°°अशी काहीशी साथ दे°°°
°°°मित्रत्वाचा हात दे°°°

आज ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतातील महिला ज्यांनी जगभर आपल्या क्षेत्रात भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करून भारतीय महिलांचा ठसा उमटवला त्यापैकी काहींचे कर्तुत्व खालील छायाचित्रामधून देत आहोत. हि सर्व संधर्भ छायाचित्रे MKCL (महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ) यांच्या टीमने त्यांच्या साठी संकलित केलेली आहेत त्याबद्दल MKCL चे धन्यवाद.









या सर्व महिलांना तसेच तमाम स्त्रीत्व आणि त्यांच्या महान कार्याला आमचा मानाचा मुजरा आणि सादर प्रणाम.

Thursday, March 5, 2015

आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी !

आजोबा आता तुमचा जमाना गेला आता आमच्या नवीन म्हणी ऐका...


आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी
१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !
२) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !
३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !
४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !
५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !
६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध् ये !
७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !
८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !
९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !
१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !
११) जागा लहान फ़र्निचर महान !
१२) उचलला मोबाईल लावला कानाला !
१३) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !
१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं !
१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !
१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी !
१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !
१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !
१९) चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला !
२०) आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा !
२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !
२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !
२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !
२४) एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो !
२५) सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना !
२६) वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला !
२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले !
२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !
२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता !
३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता !
३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार !
३२) मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका !
३३) न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला !
३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !
३५) पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये !
३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !
३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही !
३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा !
३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल !
४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही !
४१) रिकामा माळी ढेकळ फोडी !
४२) घरोघरी मॉडर्न पोरी !
४३) ओठापेक्षा लिपस्टीक जड !
४४) नाकापेक्षा चष्मा जड !
४५) अपुर्या कपडयाला फॅशनचा आधार !
४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !
४७) गोष्ट एक चित्रपट अनेक !
४८) काम कमी फाईली फार!
४९) लाच घे पण जाच आवर !
५०) मंत्र्याच पोर गावाला घोर !
५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे !
५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !
५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !
५४) रिकामी मुलगी शृंगार करी!
५५) प्रेमात पडला हुंडयास मुकला !
५६) दुरुन पाहुणे साजरे !
५७) ऑफीसात प्यून शहाणा !
५८) सत्ता नको पण खैरनार आवर !
५९) एक ना धड भाराभर पक्ष !
६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !
६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !
६२) तोंडाला पदर गावाला गजर !
६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !
६४) रात्र थोडी डास फार !
६५) शिर सलामत तो रोज हजामत !
६६) नेता छोठा कटआऊट मोठा !
६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!
६८) दैव देते आयकर नेत !
६९) डीग्री लहान वशिला महान!

Friday, February 13, 2015

याचा अर्थ तुम्ही मरताय. हळूहळू. Die Slowly by Pablo Neruda


तुम्ही प्रवासाला नाही जात,
भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत,
तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

स्वत:चं मन मारून,
तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं,
तर ते ही नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही बोलत नाही,
अंगावर चढवत नाही,
नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत,
नाही तुटत पोटात,
नाहीच येत पाणी डोळ्यात.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.
या कामात मन रमत नाही,
असं वाटतं; 
तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी, 
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ तुम्ही मरताय.
हळूहळू.

- पाब्लो नेरुदा
नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध कवी

Don't know who translated this English poem in Marathi but its great work.
More about this Poet can be found at http://en.wikipedia.org/wiki/Pablo_Neruda
 

Thursday, January 29, 2015

१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या

१०१ पुणेरी पाट्या

हा विषय पुण्यातल्या लोकांसाठी नवीन नाही.
दुकान, सोसायटी, हॉटेल, चौक , कट्टा,रिक्षा, ट्रक, एवढेच काय पाया-या चढण्याचा जिना असो कि अगदी सार्वजनिक मुता-ऱ्या व शौचालये वा एखादे घराचा दरवाजा असो. खास पुणेरी तिरकस शैलीतील पाट्या म्हणजे एक संशोधनाचा विषय ठरू शकतो.
पाट्या लिहिण्याची एक खास पुणेरी शैली आहे. पाटीमधून आपल्याला जो संदेश द्यायचा आहे तो तर पुणेकर देतातच पण वाचणा-याला आपल्या तिरकस व खोचक वाक्यामधून विचार करायला लावतात. पुणेकर महानगर पालिकेला सुद्धा पाटीमधून संदेश देत असतात.



अस्वच्छता करणारे , सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे,कचरा टाकणारे, अन्न वाया घालवणारे याबद्दलचा आपला राग पुणेकर पाटीमधून असा व्यक्त करतात.
दुकाने , हॉटेल (माफ करा उपाहारगृहे) ,कार्यालये हे तर पुणेरी पाट्या लावण्याचे खास ठिकाण. पार्किग कुठे व कुणी करू नये, चोकशी कुठे करावी ? करावी कि करू नये ? याचे मार्गदर्शन कारण-या काही पाट्या.
मंगल कार्यालयात येणा-या स्त्रीयांना दागिन्यांची काळजी घेण्याची सूचना देणारी पाटी पुणेकरांची दक्षता दाखवते तर दुसरी पाटी वाड्याच्या जागी इमारती बंधना-या बिल्डरला सज्जड द्मसुद्धा देते.
मोकळ्या जागेत गप्पा मारणारे,नो पार्किंगमध्ये पार्किंग करणारे इतकेच काय पण पत्ता विचारणारे , दुसर-याच्या दारातील पण आपल्या दारात वहाण काढणारे पाहुणे व आपल्याच घरी दुध टाकणारा दुधवालासुद्धा पाटीतून सुटत नाही.
सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणारे, टेनिस कोर्टवर बूट न घालताना खेळणारे, फोटो खराब आला म्हणून तक्रार करणारे, दोघात एक मिसळ खाणारे , गार्डन व मंदिरात कुत्रा घेऊन येणारे हे सर्व पाट्यांचे लक्ष ठरतात.
पुणेरी पाट्या फक्त पेठामधूनच दिसतात असे नाही. कित्येक पुणेरी रिक्शावालेसुधा आपल्या गिराहीकाला हळू गप्पा मारणे ,सुटे पैसे देणे ,अश्लील चाळे न करण्याबद्दल पाटीमधून सुचवत असतात आणि वरून आम्हाला आरशात दिसतेय हे नमूद करायला ते विसरत नाहीत.
पुणेकर महानगर पालिकेला सुद्धा पाटीमधून संदेश देत असतात. मग महापालिकेने रस्ता दुरुस्त केला नाही तर पुणेकर आपल्या भावना पाटीमधून अशी व्यक्त करतात.
पाट्या फक्त राग व्यक्त कारण-याच असतात असे म्हटले तर तो पुणेकरावर अन्याय होईल. कित्येक पाट्या वाहतूक नियम पाळण्यासाठी,व्यसन न करण्यासाठी,पाणी वाचवण्यासाठी संदेश देत असतात. खालची एक पाटी "५ मिसळ घेतल्यास १ Lifeboy साबण फ्री" अशी पाटी लावून पुणेकर स्वाईन फ्लू बद्दल जनजागृती करत असतात. पुण्यात राहून क्रिकेट पहायचे असेल तर पुणे वोरीयार्सलाच सपोर्ट करावा लागेल यात पुणेरीपणा आहे पण त्याचबरोबर गुटखा खाण्याच्या भव्य स्पर्धा भरवणारे पुणेकर स्पर्धेत भाग घेणा-याला मोफत नपुसंकत्व देतात यात खोचक मिश्किलपणाच नाही का? 
पुणेकर आपल्या भावना पाटीमधून व्यक्त करत होते....करतात... आणि....करत राहतील !!!! एका पुणेकरांचा या पुणेरी स्पिरिटला सलाम.

या पोस्टच्या निमित्ताने आमचीही एक पाटी :

या पोस्टमधील सर्व पाट्या ठिकठिकाणाहून जमा करण्याचा खटाटोप मी केलेला नाही. इंटरनेटवर हे सर्व मिळते फक्त शोधण्याचा त्रास घ्यावा लागतो. आम्ही हा उद्योग का केला असा प्रश्न पुण्याबाहेरच्या लोकांना पडत असेल म्हणून नमूद करतो. Marathi Paatya.com हि साईट पुन्हा क्षमस्व: (संकेतस्थळ) काही वर्षापूर्वी खास पुणेरी पाट्या साठी बनवले होते त्याला खूप प्रसिद्धी पण मिळाली होती. पण माहित नाही का ते सध्या बंद असलेले आढळले म्हणून हा उद्योग.
या पोस्टमध्ये असलेल्या पाट्यांवर आम्ही कुठलाही हक्क सांगत नाही ज्यांच्या असतील त्यांनी आपला हक्क सांगितला तरी चालेल. पुणेरी पाट्यांचा वारसा असाच पुढे चालत राहो हि सदिच्छा...

ता.क. : खाली दिलेले Comment चे Boxes शोभेसाठी नसून...आता खालपर्यंत वाचलेच आहे तर कमेंट करावी म्हणून आहे.

Wednesday, January 28, 2015

आज पुन्हा पगार होणार.....


आज पुन्हा पगार होणार.....



आज पुन्हा पगार होणार,
बँकेचा अकाउंट भरून जाणार,
मन कसं प्रसन्न प्रसन्न होणार,
मनात वेगळे वेगळे प्लान शिजणार,
काय रे देवा...........

मग विकेंड येणार,
सुरमई फ्राय आणि कोलंबीचं कालवण होणार,
थोडासा जास्ती खर्च होणार,
पण आपल्याला त्याची चिंता नसणार,
काय रे देवा...........

चार तारीख येणार,
होमलोन चा हफ्ता जाणार,
८०% अकाउंट रिकामा होणार,
थोडंस टेन्शन सुद्धा येणार,
काय रे देवा...........

पुन्हा विकेंड येणार,
या वेळेला फक्तं बोंबील आणणार,
फिश किती महाग झालंय असा विचार मनात येणार,
काय रे देवा...........

१५ तारीख येणार,
एल आय सी चे प्रिमिअम जाणार,
अकाउंट पूर्ण खिळखिळा होणार,
मनाची घालमेल वाढणार,
उरलेल्या पैशाचं प्लानिंग चालू होणार,
काय रे देवा...........

अजून एक विकेंड येणार,
फिश आता खूपच “महाग” झालेलं असणार,
आता वरणभात खाऊनच दिवस निघणार,
काय रे देवा...........
२५ तारीख येणार,
अकाउंट पूर्ण रिकामा झालेला असणार,
रिक्षा ऐवजी आता बस ने जावं लागणार,
कॉफी ऐवजी कटिंग चहा वर दिवस निघणार,
मन पुन्हा विचलित होणार,
काय रे देवा...........

३० तारीख येणार,
पुन्हा मनाला पालवी फुटणार,
पुन्हा छान छान प्लान शिजणार,
कारण......
आज पुन्हा पगार होणार..... आज पुन्हा पगार होणार......
काय रे देवा..........