Friday, April 3, 2015

Do You Punish Your Kids ? - तुम्ही तुमच्या मुलांना मारता किंवा शिक्षा देता का ?

 तुम्ही तुमच्या मुलांना मारता किंवा शिक्षा देता का ?


पालक सभेत असा एक प्रश्न विचारून बघावा, ‘कोणाची मुलं हट्टी आहेत, त्यांनी हात वर करा.’ सगळे हात वर होतात. असं विचारलं की ‘कोणाची मुलं नीट जेवत नाहीत?’ तरी सगळे हात वर! मी आणखी एक प्रश्न विचारते, ‘इथे असे कोणी पालक आहेत का ज्यांनी आपल्या मुलांना कधी मारलं नाही?’ बहुतेक वेळेला एकही हात वर होत नाही. मग विचारावं की ‘ठीक आहे. आता दुसरा प्रश्न विचारते. असे कोणी पालक आहेत का की ज्यांना आपल्या मुलांना मारून बरं वाटतं? आनंद होतो? त्यांनी हात वर करा.’ पुन्हा एकही हात वर होत नाही. पालक सांगू लागतात, ‘मुलांना मारलं की मग आपल्यालाच वाईट वाटतं. रडू येतं मग रडून झोपलेल्या मुलाच्या डोक्यावर आम्ही हात फिरवत बसतो. तो उठला की त्याच्या आवडीचं काही खायला करतो.’
एकदा असं झालं की पहिल्या प्रश्नाला एका पालकाने हात वर केला. ते म्हणाले, ‘मी माझ्या मुलांना कधीच मारलेलं नाही.’ मला फार नवल वाटलं. मी म्हटलं, ‘तुम्ही पुढे येता का? आम्हाला सांगा तरी तुम्ही असं कसं वागता ते?’ ते पुढे आले. हातात माईक घेतला आणि म्हणाले,‘ ते डिपार्टमेंट त्याच्या आईकडे दिलंय.’ आणि हशा-टाळ्यांच्या गजरात जागेवर जाऊन बसले. आणखी एका बाबांना स्फूर्ती आली. ते आले आणि म्हणाले, ‘मी कामामुळे बाहेरगावी असतो. त्यामुळे मारायला मला मुलं भेटतच नाहीत.’ पुन्हा मोठा हशा झाला. क्वचित काही पालक भेटतात न मारणारे आणि कुणी सांगतं, ‘आम्हाला आमच्या आईवडिलांनी कधीच मारलं नाही त्यामुळे आम्हाला पण मारावंसं वाटत नाही.’ कुणी म्हणतात, ‘लहानपणी भरपूर मार खाल्ला त्यामुळे ठरवलं की मुलांना आपण मारायचं नाही.’ काही असं सांगतात की ‘मारायची गरज नाही. समजावून सांगितलं की मुलं ऐकतात.’
मला असं विचारावंसं वाटतं, ‘तुम्हाला मुलांना मारल्यावर जर वाईट वाटतं, रडू येतं, तरी का मारता मुलांना?’ पालक सांगतात, ‘राग येतो त्यांचा. राग आवरता येत नाही. कधी इतर कुठलातरी राग मुलांवर निघतो. वडय़ाचं तेल वांग्यावर म्हणतात- तसं!’
 असं आपण जेव्हा म्हणतो की आम्हाला राग आवरत नाही तेव्हा आपण लबाड वागत असतो. काय लबाडी करतो आपण? एकच चूक मुलांनी केली की त्याला मिळतो मार आणि वडिलांनी, आजी आजोबांनी, काकांनी केली तर? तर लगेच आपण राग आवरतो.
  मग एखाद्या छोटय़ा मुलीला मी माइकपाशी बोलावते. तिला विचारते, ‘‘अगदी सोप्पा प्रश्न आहे बरं का. घाबरू नको. छान उत्तर दे.’’ ती हो म्हणते, पण तिच्या चेहऱ्यावर ताण दिसतो. मग मी तिला म्हणते, ‘‘समज ही एक भाजीची वाटी आहे. ती अशी खोलीच्या मधेच ठेवलीय. तिकडून तू धावत धावत आलीस आणि तुझा पाय वाटीला लागला. वाटी उडाली आणि सगळी भाजी सांडून गेली तर तुझी आई काय करेल?’’ अर्ध मिनीट ती विचार करते आणि म्हणते, ‘‘आई आधी एक धपाटा घालेल आणि म्हणेल, दिसत नाही तुला? आता भरून ठेव ती भाजी.’’ सगळे पालक हसतात. तिला मी म्हणते, ‘‘छान उत्तर दिलंस. आता दुसरा सोप्पा प्रश्न. समज ती भाजीची वाटी तशीच आहे आणि तू धावत धावत नाही आलीस. तुझे बाबा चालत आले. त्यांचा पाय वाटीला लागला. भाजी सांडली. आता आई काय करेल?’’ मुलीला आता गंमत वाटते आणि उत्तर द्यायला उत्साह वाटतो. ती म्हणते, ‘‘बाबांना आई काहीच म्हणणार नाही. धपाटापण घालणार नाही. उलट म्हणेल, मी भरते ती भाजी. तुम्ही जा कामाला. माझंच चुकलं. वाटी उचलून नाही ठेवली.’’ पालक पुन्हा जोरदार हसतात. मुलीला मी शाबासकी देते. छोटं बक्षीस देते.
आपलं असं ठरलेलंच असतं की चूक लहान मुलाच्या हातून झाली तर त्याला लगेच मारायचं आणि मोठय़ा माणसांना मात्र माफ! जो आपल्याला उलट मारू शकतो त्याला आपण मारायला जात नाही! लहान मूल काय बिचारं करणार?
   मुलं बालभवनात सांगतात ते पालकांनी ऐकावं, ‘‘आज ना बाबांनी मला खूप मारलं. मला आज आत्महत्या करावीशी वाटते आहे.’’
‘‘आज आईनी मला उगाचच मारलं. मला घरातून पळून जावंसं वाटतंय.’’
‘‘आज दोघं मला खूप रागावले. मला असं वाटतंय की जगात माझं कुणीच नाही.’’
इतकं जर मुलांना वाईट वाटतं तर का मारायचं मुलांना? ‘छडी लागे छमछम’ वर अनेक पालकांचा विश्वास असतो. मारलं नाही तर मुलं बिघडतात अशी त्यांच्या मनात भीती असते. काही पालक तर हमखास असं सांगतात, ‘‘मी लहानपणी फार वात्रट होतो. आमच्या एका सरांनी मला मला खूप बदडलं म्हणूनच मी सुधारलो!’’
    मुलं मात्र कितीदा सांगतात, ‘‘मारू नका ना! समजावून सांगा. आम्हाला कळतं.’’
    पण आपल्या मन:स्थितीचं काय करायचं? कधी समजा सुट्टीचे दिवस आहेत. आवडते पाहुणे घरात आलेत. सर्वाच्या तब्येती उत्तम आहेत. पशाचा काही प्रश्न नाही. घरात काही भांडण नाही अशा आनंदाच्या वातावरणात मुलांनी काही दंगा केला, नासधूस केली, आगळीक केली तर आपण उदारपणे म्हणतो, ‘‘जाऊ दे, जाऊ दे. भरून टाका ते. आपल्याला आता बागेत जायचंय.’’
आणि याऐवजी समजा मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळालेत, आपल्याला बरं नाही, पशांची चणचण आहे, घरात भांडणं झालीयत, आपला मूड खराब आहे अशा वेळी मुलाच्या हातून चमचा खाली पडला तरी आपल्याला संताप आवरत नाही. त्याला मार तर बसतोच वर दहा बोलणी ऐकून घ्यावी लागतात. हा आपला मूड म्हणजे एखाद्या ग्लासातल्या पाण्याच्या पातळीसारखा असतो. अप्रिय गोष्टी घडल्या की पातळी खाली जाते. आणि आपली सहनशक्ती कमी कमी होते. आवडीच्या गोष्टी घडल्या तर पातळी वर जाते. आपली सहनशक्ती चांगली असते.
तेव्हा एक लक्षात ठेवायचं, मुलं जोवर १४-१५ वर्षांची होत नाहीत तोपर्यंत ही पाण्याची पातळी निर्धारपूर्वक वर ठेवायची आणि मुलांना मारायला हात उठेल तेव्हा दुसऱ्या हातानं हात धरायचा आणि स्वत:ला विचारायचं, ‘‘याची जरूर आहे का?’’ ९९ टक्के वेळा तुम्हाला उत्तर मिळेल- ‘‘जरूर नाही. मारू नको. समजावून सांग.’’
    तेव्हा प्रश्न संयमाचा आहे. मारणं हा आपला शॉर्टकट असतो. खरं तर कोण समजावून सांगत बसणार? घाईच्या वेळी मुलं हट्ट करतात. वेळ नसतो. मग घाला दोन धपाटे. आणि मुलं इतकी चिवट असतात की ती आपला अंत पाहतात. खरंच आहे! तुम्ही रस्सीखेच सुरू केलीत तर मुलं कधीच हरणार नाहीत. तुम्हालाच आपल्या हातातला दोर सोडून देण्याचा शहाणपणा करावा लागतो.

 मुलांशी संवाद वाढवण्यासाठी एक गोष्ट करता येईल. रात्री मूल झोपत असेल तेव्हा वेळ काढून त्याच्याजवळ बसा. त्याला गोष्ट सांगा. गप्पा मारा. आणि त्याला हे सांगा की आज दुपारी तू जो दुकानात हट्ट केलास, मला अमुक पाहिजे म्हणून आणि रडायला लागलास ते मला आवडलं नाही. किती खेळणी आहेत तुझ्याकडे! तरी हट्ट करायचा का? मूलपण सांगेल त्याला तेच खेळणं का हवं होतं ते. तुम्हीही सांगा तुम्ही ते का नको म्हणालात ते आणि सारखं आपल्याला हवं ते त्या क्षणी मिळत नाही, धीर धरावा, वाट पहावी. कधी नाही मिळालं तर नाही! हट्ट करू नये. तमाशे तर नाहीच करायचे हे त्याला, तिला पटवून द्या. हे संवादाचं कौशल्य, प्रामाणिकपणे बोलणं मुलापर्यंत पोचतं. त्याला कळतं आई उगाचच ‘नाही’ म्हणत नाही. त्यामागे कारणं असतात आणि मूलही मनात विचार करू लागेल.
निसर्ग आपल्या हाती लहान मूल देतो. ते अननुभवी असतं, आकारानं छोटं असतं पण त्याचं आणि आपलं नातं कायम तसंच राहणार नसतं. एक वेळ अशी येणार असते की ते शरीरानं आपल्याहून ताकदवान असेल, मानसिकदृष्टय़ा आपण त्याच्यावर अवलंबून असू, कदाचित आíथक बाजूनंही आपल्याला त्याची मदत असेल अशा वेळी आपण त्याच्या लहानपणी जर आपली पालकत्वाची सत्ता अविचारानं वापरली असेल तर त्यानं कसं वागावं आपल्याशी?
 पालकत्वाची सत्ता ही न वापरण्यासाठी असते. ती चांगल्यासाठी जरूर वापरावी पण मारण्यासाठी, अपमान करण्यासाठी, अडवणूक करण्यासाठी कधीही वापरू नये. पटतंय ना? 


ता.क. :What's App वर आलेला लेख चांगला वाटला म्हणून इथे शेयर केला. लेखक सापडल्यास नाव टाकूच.

Sunday, March 29, 2015

What's app marathi jokes and PJ मराठी विनोद

Whatsapp वर आलेले काही विनोद


माझी आणी दिपिका पादुकोण
ची एक
सारखी सवय आहे....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी तिला कधी फोन
करत नाही,
आणी ती पण
मला कधी फोन करत
नाही....
गेली उडत....

मुलगा : मी माझ्या गर्लफ़्रेंड ला गेली ३ वर्षे दररोज
पत्रं पाठवली.
मित्र : मग ? काय झालं शेवटी ?
मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं !

एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू
डोक्याला आणि खांद्याला लावत होता..
बायको : अव्हा.. हे काय करताय ? शाम्पू
डोक्यालाच लावायचा असतू....
पाटील : आग
येडे ...हा काय...साधा शाम्पू ...नाही..., हा तर
head &
shoulder आहे.......

प्रपोज करण्याची नवीन पद्धत.
मिकू : तुझं नाव गूगल आहे का?
चिंकी : नाही ..का?
मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे
म्हणून विचारलं....

कॉलेजमध्ये नविनच आलेली मुलगी बाजुला बेँचवर
बसलेल्या मुलाला विचारते.
मुलगी- काय रे नाव काय तुझं?
मुलगा- नुसतं तोंडाने सांगु कि घेऊन दाखवु?
मुलगी- म्हणजे! असं कोणतं नाव आहे जे तु घेउन
दाखवणार आहेस?
...मुलगा- " पप्पी "!!.........:P

प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते..
मात्र 16 यशस्वी स्त्रीयांच्या मागे 1 पुरुष असतो.
.
.
.
.
....
.
.
हे आम्ही चक दे इंडीया मध्ये पाहिले..

गंपूचा पाय काळानिळा पडला.
डॉक्टर : याचा अर्थ, पायाला संसर्ग झाला आहे.
कापावा लागेल. लाकडी पाय बसवावा लागेल.
ऑपरेशननंतर त्याला लाकडी पाय बसवण्यात आला.
पण तोही काळानिळा पडू लागला.
...
डॉक्टर : याचा अर्थ, जीन्सचा रंग जातो आहे

हृदयाच्या ऑपरेशनला 'बायपास' का म्हणतात?
??
कारण, ऑपरेशन ठीक झालं तर 'पास'.. नाही तर
'बाय'!

गण्या बसस्टॉपवर उभा होता .
एक मोटर सायकल स्वार
त्याच्यापाशी आला आणि त्यानेविचारले ,
''लिफ्ट हवी आहे का ?"
.
.
'गण्या - ''नोथँक्स !माझे घर तळमजल्यावरच आहे !!

4G वापरणारा पहिला भारतीय कोण ?
.
.
.
अनिल कपूर.
.........
कसे ?
aG ,oG, lo G, sunoG

Tamil remake of Aamir's Ghulam
Rajnikant runs on the railway track.
D train is now... at 1 mtr dist & guess wat?...
.
.
.......
.
.
.
.
.
.
Train jumps to next track......... :D :D

शिक्षक बंड्याला विचारतात-
"अशी तीन ठिकाणं सांग की जिथे माणूस मरत
नाही."
बंड्या - स्वर्ग, नरक आणि
.........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
स्टार प्लस!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Naya hai yeh.. 
गुरुजि:- बंड्य...आज डब्याला
काय आणल आहेस.....
बंड्या :- गुरुजी.. पुरणपोळी
आणली आहे ...
गुरुजि:- मला देशील का तुझा डबा ..
.मी आज डबा आणला नाही ...
बंड्या :-हो देईन....
गुरुजि:-पण तुझ्या आई न
विचारल्यावर.
काय सांगशील..
बंड्या :- सांगीन कुत्र्या ने
खाल्ला म्हणून....
--------'-----'--''--'''--------------
मुलगा - मला तुझी आठवण आली
कि मी तुझा फोटो बघतो
मुलगी- अय्या, आणि माझा आवाज
ऐकावसं वाटलं तर तू काय करतोस ??
मुलगा- शेजारच्या कुत्रीला दगड
मारतो
-----------------------------------------
Newly married पती :---
माझे लग्ना आधी 10 affairs
होते ...
हुशार बायको :-- मला माहित होते
की जेव्हा कुंडली मध्ये 36 चे 36 गुण
जुळ्ले आहेत, मग सवयी पण
नक्की जूळतिल ....
Wife Rocks !!! Husband Shocks !!!!!
----------------------
मास्तर :---- कॉफ़ी शॉप आणी वाइन
शॉप मध्ये काय फरक आहे ??
विद्यार्थी :--- सोप्प आहे सर ..,
प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये
होते...आणी शेवट वाइन शॉप मध्ये ...
----------------------------
शादी के 5 साल बाद , व्हलेन टाईन के
दिन पती ने बीबी के लीये सफेद गुलाब
लाया ....
बीबी :-- ये क्या सफेद गुलाब ? व्हलेन
टाइन के दिन रेड रोज देते है ना ??...
पती :-- अब जिन्दगी में , प्यार से
ज्यादा शांती की जरूरत है !!!!!
---------------------------------
पती --अपने मैरिज सर्टिफिकेट को एक
घंटे से देख रहा था
बीबी :- तुम 1 घंटे से क्या देख रहे
हो ??
पती :- expiry date ढूंढ रहा था !!
सालोने लिखी नही 
-------------------------------------
नवरा (बायकोला चिडवत ) :-
काल रात्री माझ्या स्वप्नात एक
सुंदर मुलगी आली होती...
बायको :- एकटीच आली असेल....
नवरा :- हो तुला कस माहीत...?
बायको :- कारण
तिचा नवरा माझ्या स्वप्नात
आला होता..
--------------------------------
नवरा :-राजा दशरथ ला ३
राण्या होत्या .
बायको :-मग ????
नवरा :-मी पण २ लग्न करू
शकतो अजून .
बायको :-विचार
करा ..द्रौपदीला ५
नवरे होते .
नवरा :-sorry
गम्मत केली ग .
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
आजोबा - अरे
बन्या जरा माझी कवळी आण.
बन्या - अहो आजोबा अजून स्वयंपाक
झाला नाहीये!!
आजोबा - माहितीये रे.......
... समोरच्या गोखले आजींना स्माईल
द्यायची आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
!!!!!!!!!
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
एकदा नवरा बायको Discovery बघत
असतात.
channel वर म्हैस दिसते....
नवरा बायकोला : ती बघ
तुझी नातेवाईक
.
....
.
.
.
.
.
.
.
बायको : Aiyyaaaaaa...
सासूबाई !!!!!
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
पत्रकाराने एका जखमीला विचारले,"
जेव्हा बॉंम्ब
पडला तेव्हा तो फुटला होता का?"
जखमी रागाने म्हणाला,"
नाही.......बॉम्ब रेंगत रेंगत
माझ्याजवळ आला आणि प्रेमाने
म्हणाला
.
.
....
.
.
.
.
.
"धप्पा"!!!!!!!!
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
बायको - अहो ऐकलंत का, मला वाटतं
आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात
पडली आहे.
नवरा - कशावरून???
.
....
.
.
.
.
बायको - अहो आजकाल
ती पॉकेटमनी मागत नाहीये.
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡ ♡
हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत
यायला आज उशीर का झाला?
बंड्या - काय करणार बाईक खराब
झाली होती सर.
हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं
का गधड्या???
...
बंड्या - मी म्हटलं होतं सर पण
तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ.

Sunday, March 8, 2015

जागतिक महिला दिन साजरा करताय ? तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटुन घेऊ नका.



उद्या कदाचित तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटुन घेऊ नका. कारण ती काहीच चुकीचं विचारत नाही.
विचार करायला लावणारा ,
ह्रदयाला भिडवणारा.......
तिचा फक्त एकच प्रश्न .......
देह माझा ,
हळद तुझ्या नावाची .
हात माझा ,
मेहंदी तुझ्या नावाची .
भांग माझा ,
सिंदूर तुझ्या नावाचा .
माथा माझा ,
बिंदिया तुझ्या नावाची .
नाक माझे ,
नथ तुझ्या नावाची .
गळा माझा ,
मंगळसूत्र तुझ्या नावाचे .
मनगट माझे ,
(बांगड्या) चुडा तुझ्या नावाच्या .
पाय माझे ,
जोडवी तुझ्या नावाची .
आणि हो.....
वडीलधा-यांच्या
पाया मी पडते ,
आणि ......
अखंड सौभाग्यवती भव ।
आशिर्वाद मात्र तुला.
वटपौर्णिमेचे व्रत माझे ,
आयुष्याचे वरदान तुला .
घराची काळजी घ्यायची मी,
दरवाजावर नावाची प्लेट तुझी.
नाव माझे ,
पण त्यापुढे ऒळख तुझी .
इतकच काय .......
ऊदर माझे ,
रक्त माझे ,
दूध माझे,
आणि मुलं ?
मुलं तुझ्या नावाची .
माझं सगळच तर,
तुझ्या नावाचं......
तक्रार नाही ...
प्लिज रागाऊही नकोस,
अत्यंत नम्रपणे
एक प्रश्न विचारतेय..
एवढच सांग.....
तुझ्याकडे  काय आहे का रे,
माझ्या नावाचं ?


°°°आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी°°°
°°°तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी°°°
°°°अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते°°°
°°°स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते°°°
°°°अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का°°°
°°°तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का°°°
°°°कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे°°°
°°°वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे°°°
°°°भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने°°°
°°°स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे°°°
°°°साडी मस्त शोभतीये आज--मनमोकळी दाद दे°°°
°°°सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने°°°
°°°मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे°°°
°°°वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे°°°
°°°वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे°°°
°°°पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे°°°
°°°झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे°°°
°°°जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे°°°
°°°हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे°°°
°°°नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे°°°
°°°अशी काहीशी साथ दे°°°
°°°मित्रत्वाचा हात दे°°°

आज ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतातील महिला ज्यांनी जगभर आपल्या क्षेत्रात भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करून भारतीय महिलांचा ठसा उमटवला त्यापैकी काहींचे कर्तुत्व खालील छायाचित्रामधून देत आहोत. हि सर्व संधर्भ छायाचित्रे MKCL (महाराष्ट्र ज्ञान महामंडळ ) यांच्या टीमने त्यांच्या साठी संकलित केलेली आहेत त्याबद्दल MKCL चे धन्यवाद.









या सर्व महिलांना तसेच तमाम स्त्रीत्व आणि त्यांच्या महान कार्याला आमचा मानाचा मुजरा आणि सादर प्रणाम.

Thursday, March 5, 2015

आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी !

आजोबा आता तुमचा जमाना गेला आता आमच्या नवीन म्हणी ऐका...


आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी
१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !
२) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !
३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !
४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !
५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !
६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध् ये !
७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !
८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !
९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !
१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !
११) जागा लहान फ़र्निचर महान !
१२) उचलला मोबाईल लावला कानाला !
१३) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !
१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं !
१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !
१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी !
१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !
१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !
१९) चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला !
२०) आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा !
२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !
२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !
२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !
२४) एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो !
२५) सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना !
२६) वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला !
२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले !
२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !
२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता !
३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता !
३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार !
३२) मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका !
३३) न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला !
३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !
३५) पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये !
३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !
३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही !
३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा !
३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल !
४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही !
४१) रिकामा माळी ढेकळ फोडी !
४२) घरोघरी मॉडर्न पोरी !
४३) ओठापेक्षा लिपस्टीक जड !
४४) नाकापेक्षा चष्मा जड !
४५) अपुर्या कपडयाला फॅशनचा आधार !
४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !
४७) गोष्ट एक चित्रपट अनेक !
४८) काम कमी फाईली फार!
४९) लाच घे पण जाच आवर !
५०) मंत्र्याच पोर गावाला घोर !
५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे !
५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !
५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !
५४) रिकामी मुलगी शृंगार करी!
५५) प्रेमात पडला हुंडयास मुकला !
५६) दुरुन पाहुणे साजरे !
५७) ऑफीसात प्यून शहाणा !
५८) सत्ता नको पण खैरनार आवर !
५९) एक ना धड भाराभर पक्ष !
६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !
६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !
६२) तोंडाला पदर गावाला गजर !
६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !
६४) रात्र थोडी डास फार !
६५) शिर सलामत तो रोज हजामत !
६६) नेता छोठा कटआऊट मोठा !
६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!
६८) दैव देते आयकर नेत !
६९) डीग्री लहान वशिला महान!

Friday, February 13, 2015

याचा अर्थ तुम्ही मरताय. हळूहळू. Die Slowly by Pablo Neruda


तुम्ही प्रवासाला नाही जात,
भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत,
तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

स्वत:चं मन मारून,
तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं,
तर ते ही नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही बोलत नाही,
अंगावर चढवत नाही,
नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत,
नाही तुटत पोटात,
नाहीच येत पाणी डोळ्यात.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.
या कामात मन रमत नाही,
असं वाटतं; 
तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी, 
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ तुम्ही मरताय.
हळूहळू.

- पाब्लो नेरुदा
नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध कवी

Don't know who translated this English poem in Marathi but its great work.
More about this Poet can be found at http://en.wikipedia.org/wiki/Pablo_Neruda