Friday, February 13, 2015

याचा अर्थ तुम्ही मरताय. हळूहळू. Die Slowly by Pablo Neruda


तुम्ही प्रवासाला नाही जात,
भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत,
तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

स्वत:चं मन मारून,
तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं,
तर ते ही नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही बोलत नाही,
अंगावर चढवत नाही,
नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत,
नाही तुटत पोटात,
नाहीच येत पाणी डोळ्यात.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.
या कामात मन रमत नाही,
असं वाटतं; 
तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी, 
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ तुम्ही मरताय.
हळूहळू.

- पाब्लो नेरुदा
नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध कवी

Don't know who translated this English poem in Marathi but its great work.
More about this Poet can be found at http://en.wikipedia.org/wiki/Pablo_Neruda
 

Thursday, January 29, 2015

१०१ Puneri Paatya - पुणेरी पाट्या

१०१ पुणेरी पाट्या

हा विषय पुण्यातल्या लोकांसाठी नवीन नाही.
दुकान, सोसायटी, हॉटेल, चौक , कट्टा,रिक्षा, ट्रक, एवढेच काय पाया-या चढण्याचा जिना असो कि अगदी सार्वजनिक मुता-ऱ्या व शौचालये वा एखादे घराचा दरवाजा असो. खास पुणेरी तिरकस शैलीतील पाट्या म्हणजे एक संशोधनाचा विषय ठरू शकतो.
पाट्या लिहिण्याची एक खास पुणेरी शैली आहे. पाटीमधून आपल्याला जो संदेश द्यायचा आहे तो तर पुणेकर देतातच पण वाचणा-याला आपल्या तिरकस व खोचक वाक्यामधून विचार करायला लावतात. पुणेकर महानगर पालिकेला सुद्धा पाटीमधून संदेश देत असतात.



अस्वच्छता करणारे , सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे,कचरा टाकणारे, अन्न वाया घालवणारे याबद्दलचा आपला राग पुणेकर पाटीमधून असा व्यक्त करतात.
दुकाने , हॉटेल (माफ करा उपाहारगृहे) ,कार्यालये हे तर पुणेरी पाट्या लावण्याचे खास ठिकाण. पार्किग कुठे व कुणी करू नये, चोकशी कुठे करावी ? करावी कि करू नये ? याचे मार्गदर्शन कारण-या काही पाट्या.
मंगल कार्यालयात येणा-या स्त्रीयांना दागिन्यांची काळजी घेण्याची सूचना देणारी पाटी पुणेकरांची दक्षता दाखवते तर दुसरी पाटी वाड्याच्या जागी इमारती बंधना-या बिल्डरला सज्जड द्मसुद्धा देते.
मोकळ्या जागेत गप्पा मारणारे,नो पार्किंगमध्ये पार्किंग करणारे इतकेच काय पण पत्ता विचारणारे , दुसर-याच्या दारातील पण आपल्या दारात वहाण काढणारे पाहुणे व आपल्याच घरी दुध टाकणारा दुधवालासुद्धा पाटीतून सुटत नाही.
सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणारे, टेनिस कोर्टवर बूट न घालताना खेळणारे, फोटो खराब आला म्हणून तक्रार करणारे, दोघात एक मिसळ खाणारे , गार्डन व मंदिरात कुत्रा घेऊन येणारे हे सर्व पाट्यांचे लक्ष ठरतात.
पुणेरी पाट्या फक्त पेठामधूनच दिसतात असे नाही. कित्येक पुणेरी रिक्शावालेसुधा आपल्या गिराहीकाला हळू गप्पा मारणे ,सुटे पैसे देणे ,अश्लील चाळे न करण्याबद्दल पाटीमधून सुचवत असतात आणि वरून आम्हाला आरशात दिसतेय हे नमूद करायला ते विसरत नाहीत.
पुणेकर महानगर पालिकेला सुद्धा पाटीमधून संदेश देत असतात. मग महापालिकेने रस्ता दुरुस्त केला नाही तर पुणेकर आपल्या भावना पाटीमधून अशी व्यक्त करतात.
पाट्या फक्त राग व्यक्त कारण-याच असतात असे म्हटले तर तो पुणेकरावर अन्याय होईल. कित्येक पाट्या वाहतूक नियम पाळण्यासाठी,व्यसन न करण्यासाठी,पाणी वाचवण्यासाठी संदेश देत असतात. खालची एक पाटी "५ मिसळ घेतल्यास १ Lifeboy साबण फ्री" अशी पाटी लावून पुणेकर स्वाईन फ्लू बद्दल जनजागृती करत असतात. पुण्यात राहून क्रिकेट पहायचे असेल तर पुणे वोरीयार्सलाच सपोर्ट करावा लागेल यात पुणेरीपणा आहे पण त्याचबरोबर गुटखा खाण्याच्या भव्य स्पर्धा भरवणारे पुणेकर स्पर्धेत भाग घेणा-याला मोफत नपुसंकत्व देतात यात खोचक मिश्किलपणाच नाही का? 
पुणेकर आपल्या भावना पाटीमधून व्यक्त करत होते....करतात... आणि....करत राहतील !!!! एका पुणेकरांचा या पुणेरी स्पिरिटला सलाम.

या पोस्टच्या निमित्ताने आमचीही एक पाटी :

या पोस्टमधील सर्व पाट्या ठिकठिकाणाहून जमा करण्याचा खटाटोप मी केलेला नाही. इंटरनेटवर हे सर्व मिळते फक्त शोधण्याचा त्रास घ्यावा लागतो. आम्ही हा उद्योग का केला असा प्रश्न पुण्याबाहेरच्या लोकांना पडत असेल म्हणून नमूद करतो. Marathi Paatya.com हि साईट पुन्हा क्षमस्व: (संकेतस्थळ) काही वर्षापूर्वी खास पुणेरी पाट्या साठी बनवले होते त्याला खूप प्रसिद्धी पण मिळाली होती. पण माहित नाही का ते सध्या बंद असलेले आढळले म्हणून हा उद्योग.
या पोस्टमध्ये असलेल्या पाट्यांवर आम्ही कुठलाही हक्क सांगत नाही ज्यांच्या असतील त्यांनी आपला हक्क सांगितला तरी चालेल. पुणेरी पाट्यांचा वारसा असाच पुढे चालत राहो हि सदिच्छा...

ता.क. : खाली दिलेले Comment चे Boxes शोभेसाठी नसून...आता खालपर्यंत वाचलेच आहे तर कमेंट करावी म्हणून आहे.

Wednesday, January 28, 2015

आज पुन्हा पगार होणार.....


आज पुन्हा पगार होणार.....



आज पुन्हा पगार होणार,
बँकेचा अकाउंट भरून जाणार,
मन कसं प्रसन्न प्रसन्न होणार,
मनात वेगळे वेगळे प्लान शिजणार,
काय रे देवा...........

मग विकेंड येणार,
सुरमई फ्राय आणि कोलंबीचं कालवण होणार,
थोडासा जास्ती खर्च होणार,
पण आपल्याला त्याची चिंता नसणार,
काय रे देवा...........

चार तारीख येणार,
होमलोन चा हफ्ता जाणार,
८०% अकाउंट रिकामा होणार,
थोडंस टेन्शन सुद्धा येणार,
काय रे देवा...........

पुन्हा विकेंड येणार,
या वेळेला फक्तं बोंबील आणणार,
फिश किती महाग झालंय असा विचार मनात येणार,
काय रे देवा...........

१५ तारीख येणार,
एल आय सी चे प्रिमिअम जाणार,
अकाउंट पूर्ण खिळखिळा होणार,
मनाची घालमेल वाढणार,
उरलेल्या पैशाचं प्लानिंग चालू होणार,
काय रे देवा...........

अजून एक विकेंड येणार,
फिश आता खूपच “महाग” झालेलं असणार,
आता वरणभात खाऊनच दिवस निघणार,
काय रे देवा...........
२५ तारीख येणार,
अकाउंट पूर्ण रिकामा झालेला असणार,
रिक्षा ऐवजी आता बस ने जावं लागणार,
कॉफी ऐवजी कटिंग चहा वर दिवस निघणार,
मन पुन्हा विचलित होणार,
काय रे देवा...........

३० तारीख येणार,
पुन्हा मनाला पालवी फुटणार,
पुन्हा छान छान प्लान शिजणार,
कारण......
आज पुन्हा पगार होणार..... आज पुन्हा पगार होणार......
काय रे देवा..........

Thursday, January 8, 2015

ही त्याची गोष्ट... "तो"

ही त्याची गोष्ट..." तो "  
( नक्की वाचा...नक्की आवडेल)

पहिली ते दहावी, खेळायचे-बागडायचे,हसायचे-खिदळायचे दिवस कसे भूरकन उडून जातात.
या दिवसात फारशी काही अपेक्षा नसते
जे काही मिळेल त्यात मन खुश असते
मग येते बारावीचे वर्ष
अभ्यास आणि क्लास यात हेही दोन
वर्षे निघून जातात
मग सुरु होते, college admission ची लगबग,
इथे नको तिथे, तिथे नको इथे अस करत करत,
एकदाच admission होत
आणि सुरु होतो कॉलेजचा आडदांड अभ्यासक्रम
लेक्चर, प्रैक्टिकल, ओरल, एक्स्ट्रा क्लास
पैश्याची चणचण, उधारी उसनवारी,अस करत करत, कस बस
रडत-खडत, ढकलत एकदाच
घोड़ गंगेत न्हात आणि " तो " पास होतो
आयुष्याची अशी विस वर्षे हवेत वीरून जातात
मग सुरु होतो नोकरीचा शोध
ही नको ती, लांब नको जवळ
अस करत दोन-तिन नोकरया
धरत सोडत, शेवटी एक नक्की होते
आणि थोडास स्थिर-स्थावर व्हायला सुरुवात होते.
आणि हातात पडतो पहिल्या पगाराचा चेक,
तो बैंकेत जमा होतो आणि सुरु होतो
अकाउंट मध्ये जमा होणारा काही शुन्याचा, न संपणारा खेळ.
अशी दोन-तिन वर्षे जातात, " तो " थोड़ा स्थिरावतो
बैंकेत आणखी काही शुन्य जमा झालेले असतात.
एव्हाना वयाने  पंचविशी गाठलेली असते.
लग्नाविषयीची चर्चा सुरु होते; पण त्या आधीच
एखादी पटलेली असते किंवा पटवलेली असते
मग यथावकाश अक्षदा पडतात आणि
संसाराचा राम-रगाडा चालु होतो.
लग्नाची ही पहिली दोन-तिन वर्षे मात्र छान गुलाबी, मऊ, तरल आणि स्वप्नाळू असतात
हातात हात घालून गप्पा मारायचे असतात,नवनवीन स्वप्न रंगवायची असतात.
पण हे ही दिवसही पटकन उडून जातात आणि कदाचित ह्याच काळात बैंकेतील शुन्य थोडेसे कमी होतात, कारण थोड़ी हौस-मौज केली जाते, थोड हिंडन-फिरण होत, खरेदी होते
मग हळूच चाहुल लागते बाळाची
आणि वर्ष भरातच पाळणा हलू लागतो
सर्व लक्ष आता बाळावर केन्द्रित होते
त्याच खाण-पिण, उठ-बस, शी-शु
त्याची खेळणी, त्याचे कपड़े, त्याचे लाड कौतुक...वेळ कसा फटाफट निघून जातो
एव्हाना तिचा हाथ नकळत त्याच्या हातून सूटलेला सतो, गप्पा मारन, हिंडन-फिरण केंव्हाच बंद झालेले असत, पण दोघांच्याही हे लक्षात येत नाही.

अशातच तिशीचा उंबरठा ओलांडलेला जातो.
बाळ मोठ होत जात..ती बाळात गुरफटत जाते आणि तो आपल्या कामात.
घराचा हप्ता,गाडीचा हप्ता आणि त्यात बाळाची जबाबदारी; त्याच्या शिक्षणाची, भविष्याची सोय आणि त्याच बरोबर बैंकेत शून्य वाढवायचे टेंशन.
तो पूर्ण पणे स्व:तला कामात झोकुन देतो.
बाळाचे शाळेत admission होते, तो मोठा होवू लागतो. तिचा सगळा वेळ बाळाचे उठ-बस करता करता संपतो.
एव्हाना पस्तिशी आलेली आसते,
स्व:तच घर असत, गाडी असते.
बैंकेत बर्यापैकी शून्य जमा झालेले असतात पण तरी ही काही तरी कमी असते आणि पण ते काय ते समजत नसते, त्यामुळे तिची चिडचिड वाढलेली असते
आणि त्याचा ही वैताग वाढत जातो आणि तो मग दर वीकेंड ला ' एकच प्याला ' सुरु करतो
दिवासामागुन दिवस जात असतात ; मूल मोठ होत असत, त्याच स्व:तच एक विश्व तयार होत असत..
त्याचीही दहावी येते आणि जाते
 
तो पर्यन्त दोघांनीही चाळीशी ओलांडलेली असते.
बैंकेत शुन्यांची भर पडतच असते.
एका निवांत क्षणी,त्याला मग ते जुने दिवस आठवतात
वेळ साधुन "तो" तिला म्हणतो, अग, ये ज़रा अशी समोर, बस जवळ; पुन्हा एकदा हातात हात घालून गप्पा मारू, कुठ तरी फिरायला जावू...
ती ज़रा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे बघून म्हणते ' कुठल्या वयात काहीही सुचत तुम्हाला ; ढीगभर काम पडलीयत मला आणि तुम्हाला गप्पा सुचतायत '
कमरेला पदर खोचुन ती निघून जाते..
मग येते पंचेचाळीशी, डोळ्यावर चश्मा चढलेला असतो; एक दोन सुरुकुत्या डोकावत असतात, केस आपला काळा सोडू लागलेले असतात...मूल आता college मध्ये असत.. बैंकेत शून्य वाढत असतात...तिन आपल नाव भजनी मंडळात मध्ये घातलेल असत... आणि ह्याचे वीकेंड चे ' एकच प्याला ' चे कार्यक्रम सुरुच असतात...
मूल college मधून बाहेर पडत...आपल्या पायावर उभ राहत, आता त्याला पंख फुटलेले असतात आणि एक दिवस ते दूर परदेशी उडून जात..
आता त्याच्या केसांनी काळ्या रंगाची आणि काही ठिकाणी डोक्याची साथ सोडलेली असते...तिलाही चश्मा लागलेला असतो. आता "तो" तिला म्हातारी म्हणु लागतो, कारण हाच म्हातारा झालेला असतो..
 
पंच्च्चावन सोडून 'साठी' कड़े वाटचाल सुरु होते... बैंकेत आता किती शून्य आहेत हे ही त्याला माहीत नसत..एकच प्यालाचे कार्यक्रम एव्हाना आपोआप बंद होत आलेले असतात...
औषध-गोळ्या यांच्या वेळ वार ठरलेले असतात...डॉक्टरांच्या तारखाही ठरलेल्या असतात...मूल मोठ झाल्यावर लागतील म्हणून घेतलेल चार-पाच खोल्यांच घर अंगावर येत असत..
आता मूल कधीतरी परत येतील ही वाट बघन तेवढच काय ते हातात असत...
आणि तो एक दिवस येतो...म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते...म्हातारा लांबून हे बघत असतो आणि तसंध्याकाळची वेळ असते म्हातारा झोपळयावर मंद झोके घेत बसलेला असतो...म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते...म्हातारा लांबून हे बघत असतो आणि तेवढ्यात फोन वाजतो...तो लगबगीने जावून फोन घेतो, समोरुन मुलगा बोलत असतो..मुलगा आपल्या लग्नाची बातमी देतो आणि परदेशीच राहणार असेही सांगतो. म्हातारा थोड़ा गड़बड़तो, काय बोलावे हे त्याला सुचतच नाही, म्हातारा मुलाला बैंकेतल्या शुन्या विषयी काय करायच ते विचारतो... आता परदेशातल्या शुन्याच्या मानाने म्हातार्याचे शून्य म्हणजे मुलाच्या दृष्टीने चिल्लरच असते...तो म्हातार्याला एक सल्ला देतो ' एक काम करा त्याचा एक ट्रस्ट करा आणि वृद्धाश्रमाला दया आणि तुम्हीही तिथेच रहा ' पुढच थोडस जुजबी बोलून मुलगा फ़ोन ठेवून देतो.
म्हातारा पुन्हा झोपळयावर येवून बसतो, म्हातारीची दिवाबत्ती होत आलेली असते
" तो " तिला हाक मारतो ' अग ये आज पुन्हा हातात हात घालून गप्पा मारू '
म्हातारी चक्क म्हणते ' हो आलेच '
 
म्हातार्याला विश्वासच वाटत नाही, आनंदाने त्याचा चेहरा उजळून निघतो.
 
त्याच्या डोळ्यात अश्रु दाटून येतात, त्याच्या एका डोळ्यातून एक अश्रु खाली येतो
तो गालावर येतो आणि अचानक थिजुन जातो, डोळ्यातल तेज कमी कमी होत जात...आणि ते निस्तेज होतात...
म्हातारी आपल आटपुन म्हातार्या शेजारी झोपाळयावर येवून बसते आणि म्हणते बोला काय बोलायचय.. पण म्हातारा काहीच बोलत नाही..ती म्हातार्याला हात लावते..शरीर थंड गार पडलेले असते आणि डोळे एकटक म्हातीराला बघत असतात
क्षणभर म्हातारी हादरते; सुन्न होते, तिला काय कराव हेच सुचत नाही, पण एक-दोन मिनिटात ती लगेच सवारते...
हळूच उठते, पुन्हा देवघरापाशी जाते, एक उदबत्ती लावते, देवाला नमस्कार करते; आणि पुन्हा झोपाळयावर येवून बसते.
म्हातार्याचा थंडगार हात  घेते आणि म्हणते ' चला कुठे जायचय फिरायला' आणि काय गप्पा मारायच्यात तुम्हाला? बोला...'
अस म्हणत, म्हातारीचे डोळे पाणवतात, एकटक नजरेन ती म्हातार्याकडे बघत असते आणि हळूच तिच्या डोळ्यातले अश्रु गोठून जातात.
आणि म्हातारीची मान अलगद म्हातार्याच्या  खांद्यावर पड़ते.
झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो.
झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो.....

Thursday, January 1, 2015

Bolkya Resha - Navra Bayko Special बोलक्या रेषा - नवरा बायको स्पेशल


Bolkya Resha - Navra Bayko Special 

बोलक्या रेषा - नवरा बायको स्पेशल

नवरा बायको हा एक गहन विषय आहे. या विषयावर आपल्या बोलक्या रेशामधून हास्याचे कारंजे फुलवण्याचे काम चित्रकार श्री. घनश्याम देशमुख यांनी केले आहे. 
अशाच निवडक नवरा बायकोच्या हास्य रेषा इथे देत आहोत.
























या सर्व कलाकृती श्री. घनश्याम देशमुख यांच्या असून मला आवडलेल्या रेषा इथे एकत्रित करून ठेवल्या आहेत. घनश्याम देशमुख यांचे व्यंगचित्रकरी मधील योगदान वाढतच असून त्यांचा बोलक्या रेषा हा चित्रप्रकार खूप प्रसिद्ध होत आहे. या कलाकाराला आमचा सलाम.
घनश्याम देशमुख यांच्या सर्व रेषांचा आनंद घेण्यासाठी खालील लिंकवर किंवा त्यांच्या चित्रावर क्लिक करा.
http://www.bolkyaresha.marathi-unlimited.in/

या ब्लॉगवर आणखी काही पोष्ट आहेत ज्या अशाच बोलक्या रेषा मधून तुम्हाला हसवतील.
http://www.marathisaahitya.blogspot.in/2013/07/bolkya-resha.html

तसेच नवरा बायको या गहन विषयावरील पोष्ट आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर सापडेल.
http://www.marathisaahitya.blogspot.in/2013/04/navra-bayko.html


या कलाकाराला दाद देण्यासाठी खाली comment करायला विसरू नका.